योजना दूत बनण्यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा जाणून घ्या, कोणती कागदपत्र आवश्यक, पूर्ण माहिती!

Yojana Doot Online Application Form Online Apply

महाराष्ट्र राज्यातील होतकरू उमेदवारांना नोकरीची एक मोठी संधी सरकार तर्फे उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेत राज्यातील विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी “योजना दूत भारती” योजने अंतर्गत एकूण ५०,००० योजना दूतांची भरती केली जाणार आहे. राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम योजना दूतांचे असेल. या उपक्रमामुळे तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच, योजना दूतांना दरमहा १०,००० रुपये वेतन दिले जाईल. हि आपल्या साठी एक नोकरीची संधीच आहे.  राज्य सरकारतर्फे राबवल्या जाणाऱ्या सामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सरकारने मुख्यमंत्री योजनादूत हा उपक्रम राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडू काही तरुण-तरुणींची निवड केली जाणार आहे. निवड केलेल्या योजनादूतांना सरकारच्या योजना सामान्यांना समजावून सांगायच्या आहेत. या कामासाठी सरकारतर्फे त्यांना प्रतिमहिना 10 हजार रुपये दिले जाणार आहेत. निवड झाल्यानंतर सहा महिन्यांसाठी तरुणांना हे मानधन दिले जाणार आहे. सरकार राज्यभरातून अशा 50 हजार योजनादूतांची निवड करणार आहे. त्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 

Yojana Doot Online Application Form Online

 

महाराष्ट्र सरकार अंतर्गत 50 हजार तरुणांना नोकरीची संधी! पात्रता, कागदपत्रे, कामे, निवड प्रक्रिया…

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

“योजना दूत” बनण्यासाठी अर्ज करण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स अनुसरा:

1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइटला भेट द्या: सर्वप्रथम, राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर जा, लिंक खाली दिलेली आहे.
2. नोंदणी करा: वेबसाइटवर नोंदणीसाठीचा फॉर्म भरा. आवश्यक असलेली माहिती जसे की नाव, संपर्क तपशील, शैक्षणिक पात्रता आणि इतर आवश्यक माहिती भरा.

3. माहिती व दस्तऐवज जमा करा: अर्ज करताना तुमची शैक्षणिक कागदपत्रे, ओळखपत्र, फोटो आणि इतर संबंधित कागदपत्रे अपलोड करा.

4. अर्ज सादर करा: सर्व माहिती व्यवस्थित भरल्यानंतर आणि आवश्यक कागदपत्रे जोडल्यावर अर्ज सादर करा.

5. तपासणी आणि मुलाखत: अर्जाची तपासणी झाल्यानंतर निवडलेल्या उमेदवारांची मुलाखत किंवा पुढील प्रक्रिया होईल.

6. निवड: अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर निवडलेले उमेदवार “योजना दूत” म्हणून नियुक्त केले जातील आणि त्यांना कामाबाबतचे मार्गदर्शन दिले जाईल.

 

लक्षात ठेवा मित्रानो, तुम्ही अर्ज करताना शासकीय सूचनांचे आणि वेळापत्रकाचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

आता जाणून घेऊया निवड प्रक्रिया, निकष आणि फायदे

इच्छुक उमेदवाराला मुख्यमंत्री योजनादूत व्हायचे असेल तर त्याला विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करावा लागेल. त्यासाठी आधारकार्ड, पासपोर्ट साईज फोटो, पदवीचे प्रमाणपत्र, रहिवासी दाखला (सक्षम यंत्रणेच्या सही, शिक्क्यासह), वैयक्तिक बँख खात्याचा तपशील, असणे गरजेचे आहे. उमेदवारांना योजनादूतच्या https://www.mahayojanadoot.org/ या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करता येईल.

• वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
• कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असावा.
• उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक.
• उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
• उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक.
• उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बैंक खाते आधार संलग्न असावे.
उमेदवार नोंदणी प्रक्रिया योजनादूत पोर्टलवर ‘उमेदवार नोंदणी’ वर क्लिक करा.
उपक्रमाचे उदित आधार क्रमांक प्रविष्ट करा आणि OTP पाठवलेल्या नोंदणीकृत फोनची पडताळणी करा.
उमेदवार नोंदणी
• प्रत्यक्ष कामाचा अनुभव.
• दलाचा भाग होण्याची संधी
• विद्यावेतनातून युवकांना आर्थिक साहाय्य.
• शिकण्याबरोबरच कौशल्य विकास.
• सरकारी कामकाजाचा अनुभव.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड