YCMOU मुक्त विद्यापीठाचे प्रवेश सुरू, ऑनलाइन अर्ज करण्याची विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत संधी – YCMOU Admission 2024

YCMOU Admission 2024

YCMOU Admission 2024

विद्यापीठाच्या दूरस्थ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना मानव्यविद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन, विज्ञान, आरोग्यविज्ञान, निरंतर शिक्षण, संगणकशास्त्र, कृषी विज्ञान शाखेतील पदविका, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेशाची संधी मिळणार आहे. ही प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना ३१ जुलैपर्यंत नोंदणी करता येणार आहे, अशी माहिती विद्यापीठाच्या प्रशासनाने दिली आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) निर्णयानुसार दूरस्थ आणि ऑनलाइन पद्धतीने मिळणाऱ्या पदवीला आता नियमित पद्धतीने चालणाऱ्या पदवी अभ्यासक्रमाची समकक्षता दिली आहे. त्यामुळे दूरस्थ किंवा ऑलाइन पद्धतीने शिक्षण घेण्याला विद्यार्थ्यांचा कल वाढत आहे. विद्यापीठ किंवा महाविद्यालयात पूर्ण वेळ पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्यांना, या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून पदवीचे शिक्षण घेता येते. शिक्षण मुक्त विद्यापीठाकडून चालविण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांचे शुल्क तुलनेने फारच कमी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना नाममात्र शुल्कात शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध होते. नोकरी किंवा काम करताना, शिक्षण पूर्ण करण्याची संधी उपलब्ध होते .

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शनिवारी आणि रविवारी अभ्यास केंद्रात विषयनिहाय मार्गदर्शन केले जातेः शैक्षणिक साहित्यही पुरविण्यात येते. या पार्श्वभूमीवर मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कमी शुल्कात चांगले शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध आहे, असे विद्यापीठाच्या प्रशासनाने सांगितले. या वेबसाइटवर माहिती उपलब्ध मुक्त विद्यापीठाच्या विविध दूरस्थ अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांना मुक्त विद्यापीठाच्या वेबसाइटवरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरावे लागतील. त्यानंतर अभ्यासक्रमानुसार अभ्यास केंद्र निवडण्याची आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेची सविस्तर माहिती मुक्त विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना जवळच्या अभ्यास केंद्रात आणि विद्यापीठाच्या विभागीय केंद्रात मिळेल.

 

 


 

YCMOU MBA CET 2021: The schedule for the online entrance exams for this course, which is run by an open university, has been announced. Accordingly, the application process of students has also started. As per the instructions of the university, students have been given till September 14 to apply online for the online entrance examination for the MBA course. Further details are as follows:-

मुक्त विद्यापीठामार्फत राबविल्या जाणाऱ्या या शिक्षणक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन प्रवेश परीक्षांसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. विद्यापीठाच्या सूचनेनुसार एमबीए अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना १४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

मुक्त विद्यापीठामार्फत राबविल्या जाणाऱ्या या शिक्षणक्रमासाठी घेतल्या जाणाऱ्या ऑनलाइन प्रवेश परीक्षांसाठीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची अर्ज प्रक्रियाही सुरू झाली आहे. विद्यापीठाच्या सूचनेनुसार एमबीए अभ्यासक्रमाच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यास विद्यार्थ्यांना १४ सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांना मॉक टेस्ट देण्याची सुविधाही विद्यापीठाने उपलब्ध करून दिली आहे. त्याबाबत स्वतंत्रपणे माहिती जाहीर केली जाणार आहे. तसेच प्रवेश परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना संबंधित अभ्यास केंद्रात ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

The date of the CET has not been announced by the university yet and a separate online notification will be released. The university has also extended the deadline for online admission to the BEd Special Education course. Students can apply online till August 31 for this course.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड