देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीत होणार विप्रो मध्ये १२,००० पदांची मोठी भरती! | Wipro Recruitment 2025

Wipro Recruitment 2025

Wipro Recruitment 2025

देशातील दोन आघाडीच्या आयटी कंपन्यांनी कॅम्पसमधून सुमारे 32,000 कर्मचाऱ्यांची भरती करण्याची योजना आखली आहे. Infosys आर्थिक वर्ष 2026 मध्ये 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे, तर विप्रोने 10,000 ते 12,000 फ्रेशर्सची नियुक्ती करण्याची योजना आखली आहे. शुक्रवारी तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर करताना विप्रोने ही माहिती दिली. आयटी क्षेत्रांत मागणी वाढत असल्याचे हे संकेत आहेत. विप्रोचे अधिकारी सौरभ गोविल म्हणाले की, कंपनी दरवर्षी 10,000-12,000 फ्रेशर्सची भरती करेल. ते म्हणाले की, यावर्षी कॅम्पसमधून 10,000 फ्रेशर्सची भरती केली जाईल. तिसऱ्या तिमाहीत, कंपनीने कॅम्पसमधून सुमारे 7,000 फ्रेशर्स भरती केली आहे.

 

पुढील तिमाहीत 2,500-3,000 फ्रेशर्सची भरती करण्याची योजना आहे. ते म्हणाले की, आम्ही जेवढे काम देऊ शकतो तेवढ्याच ऑफर देत आहोत. नवीन भरतीसाठी विप्रो कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापरण्याची देखील योजना आखत आहे. चालू आर्थिक वर्ष 2024-25 च्या तिसऱ्या तिमाहीत विप्रोचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 24.4 टक्क्यांनी वाढून सुमारे 3,354 कोटी रुपये झाला आहे. विप्रोने शुक्रवारी शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले की, कंपनीचा महसूल 0.5 टक्क्यांनी वाढून सुमारे 22,319 कोटी रुपये झाला आहे. Infosys आणि TCS सारख्या भारतातील इतर मोठ्या आयटी कंपन्याही येत्या आर्थिक वर्षात फ्रेशर्सची भरती करणार आहेत. Infosys ने FY26 मध्ये 20,000 हून अधिक फ्रेशर्सची भरती करण्याची घोषणा केली आहे, तर TCS ने देखील भरती वाढवण्याचे संकेत दिले आहेत.

 


आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

देशातील प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रो नवीन कर्मचारी भरती करण्याच्या तयारीत आहे. गेल्या सहा तिमाहीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीने केवळ 337 नवीन कर्मचारी भरती केले होते. विप्रो कंपनी नवीन पदवीधरांना नोकरी देण्यासाठी कॉलेज कॅम्पसला भेट देणार आहे. यामध्ये फक्त मोठ्याच नाहीतर छोट्या कॉलेजमधूनही कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. विप्रो कंपनी सुमारे 22,000 फ्रेशर्स भरती करण्याची शक्यता आहे. ही नोकर भरती प्रोजेक्ट इंजिनीयर पदासाठी करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 

विप्रो कंपनी तीन भागात कॅम्पसमधून फ्रेशर्सची नियुक्ती करते. पहिल्या श्रेणीत ‘स्टार’ फ्रेशर्स येतात, ज्या अंतर्गत पदवीधरांना वर्षाला सुमारे 10.5 लाख पगार दिला जातो. यानंतर ‘टर्बो’ श्रेणी आहे, ज्या अंतर्गत पदवीधरांना वर्षाला 6.5 लाखांपेक्षा जास्त वेतन दिले जाते. सर्वात कमी श्रेणी म्हणजे ‘एलिट’, ज्या अंतर्गत पदवीधरांना वर्षाला 3.5 लाख पगार दिला जातो. विप्रो नवीन पदवीधरांना पत्र देईल जे मुलाखती आणि इतर पाच फेऱ्या पूर्ण करतील. निवडलेल्या पदवीधरांना नंतर 8-12 आठवड्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरच पदवीधरांना विप्रोमध्ये ऑनबोर्ड केले जाईल.मागील दोन वर्षांच्या तुलनेत 2025च्या बॅचसाठी आयटी कंपन्यांकडून नोकर भरती वाढण्याची अपेक्षा आहे, असे सविता राणी एम (प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी) यांनी मिंट वृत्तपत्राला सांगितले आहे. Infosys या वर्षी 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करेल अशी अपेक्षा आहे, तर भारतातील सर्वात मोठी IT कंपनी Tata Consultancy Services Ltd (TCS), 40,000 पदवीधरांना नियुक्त करेल अशी अपेक्षा आहे.

 

Tata Consultancy Services (TCS) या एकमेव IT कंपनीने गेल्या वर्षी कॅम्पसला भेट देऊन नोकर भरती केली होती. पण आता कंपन्यांमध्ये कामाचा ताण वाढत आहे कारण कंपन्यांच्या मागणीत वाढ होत आहे, अशा परिस्थितीत विप्रोने प्लेसमेंटची योजना आखली आहे. विप्रोमधील ही नवीन भरती आयटी क्षेत्रासाठी सकारात्मक संकेत आहे. यामुळे नवीन नोकऱ्या शोधत असलेल्या पदवीधरांना याचा फायदा होणार आहे.

 


विप्रो 2025 च्या (Wipro job)आर्थिक वर्षात 10 हजार ते 12 हजार नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांत या आयटी सेवा कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट नोंदवली असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. 30 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत, विप्रोने 3,000 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. हेडकाउंटमध्ये सलग सहा तिमाहीत घट झाल्यानंतर या तिमाहीत 337 कर्मचाऱ्यांची वाढ नोंदवली गेली. कंपनी पुढील आर्थिक वर्षात (FY26) 10 हजार ते 12 हजार कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. विप्रोचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांनी 19 जुलै रोजी कंपनीच्या Q1 कमाईच्या कॉन्फरन्स कॉल दरम्यान सांगितले की, ‘आम्ही एका वर्षानंतर पुन्हा भर्ती बाजारात परतलो आहोत.’ गोविल पुढे म्हणाले की विप्रो FY25 मध्ये दिलेल्या सर्व जॉब ऑफर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे. 

 

ते म्हणाले, ‘काही संस्थांसोबत आमचे संबंध आणि भागीदारी मजबूत केली आहे. त्यामुळे आम्ही या वर्षी कॅम्पसमध्ये आणि कॅम्पसबाहेर भरती करू. पुढच्या वर्षीही तितक्याच लोकांना नोकरी देण्याची आमची योजना आहे. आम्ही आमची क्षमता वाढवत आहोत. आमच्या पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करण्याची ही योग्य वेळ आहे.’ टीसीएस, एचसीएल टेक आणि इनफोसीस सारख्या इतर आयटी कंपन्या देखील मोठ्या प्रमाणावर भरती करण्याचा विचारात आहेत. पहिल्या तिमाहीत, विप्रोच्या संलग्न कंपन्यांमध्ये, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने 11,000 नवीन कर्मचारी नियुक्त केले आणि LTIMindtree ने 1,400 नवीन कर्मचारी नियुक्त केले.

FY25 मध्ये, टीसीएस 40,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे, एचसीएल टेक 10,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे आणि इनफोसीस 15,000-20,000 नवीन कर्मचारी नियुक्त करेल.

विप्रोने 19 जुलै रोजी पहिल्या तिमाहीची कमाई जाहीर केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत निव्वळ नफा 4.6 टक्क्यांनी वाढून 3,003 कोटी रुपये झाला आहे. आयटी कंपनीचा एप्रिल-जून एकत्रित महसूल 3.8 टक्क्यांनी घसरून 21,964 कोटी रुपयांवर आला आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Harakat vijay says

    नक्की जॉब मिळेल का

  2. Sharad pardhi says

    Sir Nada civil madhe diploma zalay tar NLA job Mikel na

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड