देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीत होणार कॅम्पस भरती! | Wipro Recruitment 2024
Wipro Recruitment 2024
Wipro Recruitment 2024
देशातील प्रसिद्ध आयटी कंपनी विप्रो नवीन कर्मचारी भरती करण्याच्या तयारीत आहे. गेल्या सहा तिमाहीत कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीने केवळ 337 नवीन कर्मचारी भरती केले होते. विप्रो कंपनी नवीन पदवीधरांना नोकरी देण्यासाठी कॉलेज कॅम्पसला भेट देणार आहे. यामध्ये फक्त मोठ्याच नाहीतर छोट्या कॉलेजमधूनही कर्मचाऱ्यांची भरती केली जाणार आहे. विप्रो कंपनी सुमारे 22,000 फ्रेशर्स भरती करण्याची शक्यता आहे. ही नोकर भरती प्रोजेक्ट इंजिनीयर पदासाठी करण्यात येणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
विप्रो कंपनी तीन भागात कॅम्पसमधून फ्रेशर्सची नियुक्ती करते. पहिल्या श्रेणीत ‘स्टार’ फ्रेशर्स येतात, ज्या अंतर्गत पदवीधरांना वर्षाला सुमारे 10.5 लाख पगार दिला जातो. यानंतर ‘टर्बो’ श्रेणी आहे, ज्या अंतर्गत पदवीधरांना वर्षाला 6.5 लाखांपेक्षा जास्त वेतन दिले जाते. सर्वात कमी श्रेणी म्हणजे ‘एलिट’, ज्या अंतर्गत पदवीधरांना वर्षाला 3.5 लाख पगार दिला जातो. विप्रो नवीन पदवीधरांना पत्र देईल जे मुलाखती आणि इतर पाच फेऱ्या पूर्ण करतील. निवडलेल्या पदवीधरांना नंतर 8-12 आठवड्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावरच पदवीधरांना विप्रोमध्ये ऑनबोर्ड केले जाईल.मागील दोन वर्षांच्या तुलनेत 2025च्या बॅचसाठी आयटी कंपन्यांकडून नोकर भरती वाढण्याची अपेक्षा आहे, असे सविता राणी एम (प्रशिक्षण आणि प्लेसमेंट अधिकारी) यांनी मिंट वृत्तपत्राला सांगितले आहे. Infosys या वर्षी 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करेल अशी अपेक्षा आहे, तर भारतातील सर्वात मोठी IT कंपनी Tata Consultancy Services Ltd (TCS), 40,000 पदवीधरांना नियुक्त करेल अशी अपेक्षा आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ खुशखबर! 14,191 लिपिक पदांची SBI भरती जाहिरात, त्वरित अर्ज करा!
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग अंतर्गत 219 पदांची भरती!
✅खुशखबर!- सुप्रीम कोर्ट द्वारे “कनिष्ठ सहायक”च्या 348 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Tata Consultancy Services (TCS) या एकमेव IT कंपनीने गेल्या वर्षी कॅम्पसला भेट देऊन नोकर भरती केली होती. पण आता कंपन्यांमध्ये कामाचा ताण वाढत आहे कारण कंपन्यांच्या मागणीत वाढ होत आहे, अशा परिस्थितीत विप्रोने प्लेसमेंटची योजना आखली आहे. विप्रोमधील ही नवीन भरती आयटी क्षेत्रासाठी सकारात्मक संकेत आहे. यामुळे नवीन नोकऱ्या शोधत असलेल्या पदवीधरांना याचा फायदा होणार आहे.
विप्रो 2025 च्या (Wipro job)आर्थिक वर्षात 10 हजार ते 12 हजार नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. गेल्या दोन आर्थिक वर्षांत या आयटी सेवा कंपनीने कर्मचाऱ्यांच्या संख्येत सातत्याने घट नोंदवली असताना हे पाऊल उचलण्यात आले आहे. 30 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत, विप्रोने 3,000 हून अधिक नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. हेडकाउंटमध्ये सलग सहा तिमाहीत घट झाल्यानंतर या तिमाहीत 337 कर्मचाऱ्यांची वाढ नोंदवली गेली. कंपनी पुढील आर्थिक वर्षात (FY26) 10 हजार ते 12 हजार कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे. विप्रोचे मुख्य मानव संसाधन अधिकारी सौरभ गोविल यांनी 19 जुलै रोजी कंपनीच्या Q1 कमाईच्या कॉन्फरन्स कॉल दरम्यान सांगितले की, ‘आम्ही एका वर्षानंतर पुन्हा भर्ती बाजारात परतलो आहोत.’ गोविल पुढे म्हणाले की विप्रो FY25 मध्ये दिलेल्या सर्व जॉब ऑफर पूर्ण करण्याच्या प्रक्रियेत आहे.
ते म्हणाले, ‘काही संस्थांसोबत आमचे संबंध आणि भागीदारी मजबूत केली आहे. त्यामुळे आम्ही या वर्षी कॅम्पसमध्ये आणि कॅम्पसबाहेर भरती करू. पुढच्या वर्षीही तितक्याच लोकांना नोकरी देण्याची आमची योजना आहे. आम्ही आमची क्षमता वाढवत आहोत. आमच्या पुरवठा साखळीवर लक्ष केंद्रित करण्याची ही योग्य वेळ आहे.’ टीसीएस, एचसीएल टेक आणि इनफोसीस सारख्या इतर आयटी कंपन्या देखील मोठ्या प्रमाणावर भरती करण्याचा विचारात आहेत. पहिल्या तिमाहीत, विप्रोच्या संलग्न कंपन्यांमध्ये, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने 11,000 नवीन कर्मचारी नियुक्त केले आणि LTIMindtree ने 1,400 नवीन कर्मचारी नियुक्त केले.
FY25 मध्ये, टीसीएस 40,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याची योजना आखत आहे, एचसीएल टेक 10,000 नवीन कर्मचारी नियुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे आणि इनफोसीस 15,000-20,000 नवीन कर्मचारी नियुक्त करेल.
विप्रोने 19 जुलै रोजी पहिल्या तिमाहीची कमाई जाहीर केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत निव्वळ नफा 4.6 टक्क्यांनी वाढून 3,003 कोटी रुपये झाला आहे. आयटी कंपनीचा एप्रिल-जून एकत्रित महसूल 3.8 टक्क्यांनी घसरून 21,964 कोटी रुपयांवर आला आहे.
Wipro Recruitment 2022: The latest update for Wirpo jobs. As per the latest news, Lakhs of rupees package including work-from-home jobs in Wipro. Further details are as follows:-
Wipro Recruitment 2022 | 2728 Open Jobs at Wipro
अमेरिकेमध्ये आर्थिक मंदीच्या संकटाची चाहूल लागल्यामुळे अनेक कंपन्यांनी कर्माचारी कपात सुरू केली आहे. गेल्या काही दिवसांत फेसबुक, मेटा, अॅमेझॉन आणि ट्विटरसारख्या आघाडीच्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं आहे. सर्वाधिक कर्माचारी कपात ट्विटर आणि फेसबुक या मोठ्या कंपन्यांमध्ये झाली आहे. या सर्व कंपन्यांचा आयटी क्षेत्राशी फार जवळचा संबंध आहे. त्यामुळे भारतातील आयटी क्षेत्रावरही याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असं असलं तरीही आयटी क्षेत्रातून एक चांगली बातमी समोर आली आहे.
- आयटीमध्ये नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी दिलासा देणारी आहे.
- भारतीय टेक कंपनी विप्रोनं फ्रेशर्स आणि टेक तज्ज्ञांची नेमणूक सुरू केली आहे.
- विशेष म्हणजे कंपनीनं ‘वर्क्र फ्रॉम एनीव्हेअर’चा पर्याय देऊ केला आहे. ‘टेक गिग’नं या बाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
- विप्रोनं सध्या युजर इंटरफेस डेव्हलपर (UI Developer) पदासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
- या उमेदवारांना कुठूनही काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
WIPRO Vacancy 2022
पद आणि जबाबदाऱ्या:
- 1) युजर इंटरफेस, ब्रँड-रिस्पॉन्सिव्ह वेब डिझाईन आणि नेटिव्ह अॅप्समध्ये विकसित कौशल्य असणं आवश्यक आहे.
- 2) अॅक्सेसिबल डिझाईनमध्ये अनुभव आवश्यक.
- 3) पॅटर्न लायब्ररी सांभाळणं, विकसित करणं आणि फिग्मामध्ये डिझाईन सिस्टम तयार करण्याचा अनुभव आवश्यक.
- 4) वेगवेगळ्या स्कॉड्ससह मोठ्या रि-डिझाईन उपक्रमांचं प्लॅनिंग आणि रचना करण्याची क्षमता आवश्यक.
- 5) घटक डिझाईन करणं, सर्वोत्तम पद्धतींचं दस्तऐवजीकरण करणं आणि इतरांना मार्गदर्शन करण्याच्या क्षमतेसह ऑटॉमिक डिझाईन प्रणाली तयार करण्याचा अनुभव आवश्यक.
- 6) काम सुधारण्यासाठी सक्रियपणे अभिप्राय मिळवण्याची मोहीम आणि स्वतःसाठी व इतरांसाठी उत्कृष्ट डिझाईन करण्याची क्षमता आवश्यक.
- 7) डिझाईन सिस्टीम तयार करण्याचा आणि देखरेखीचा किमान चार वर्षांचा अनुभव आवश्यक. विप्रोनं युजर इंटरफेस डेव्हलपरशिवाय पीएल/ एसक्यूएल डेव्हलपर (PL/SQL Developer) पदासाठीदेखील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागितले आहेत. या उमेदवारांना कुठूनही काम करण्याची परवानगी दिली जाणार आहे.
पद आणि जबाबदाऱ्या:
- 1) ओरॅकल PL/SQL वापरून हँड-ऑन डेव्हलपमेंटचा किमान सहा-सात वर्षांचा अनुभव आवश्यक.
- 2) तांत्रिक सहाय्य, प्रॉब्लेम सोल्युशन आणि ट्रबल शूटिंग सपोर्ट प्रदान करण्याची क्षमता आवश्यक.
- 3) सर्व PL/SQL पॅकेजेसमध्ये आवश्यक असल्यास बदलांचे निरीक्षण करणं, बदलांची शिफारस करणं, संग्रहित कार्यपद्धती प्रदान करणं आणि विविध रिलेशन डेटाबेस तयार व विकसित करण्याची क्षमता आवश्यक.
- 4) टेबल्स, इंडेक्सेस, डीबी लिंक्स आणि विशेषाधिकार तयार करणं आणि व्यवस्थापित करणं.
- 5) टेबल्स, इंडेक्सेस, टेबलस्पेसेस, ऑडिटिंग आणि डेटा गुणवत्ता तपासणी तयार आणि व्यवस्थापित करण्यासाठी DBA सह समन्वय साधणं.
- 6) क्लिष्ट गणना पूर्ण करण्यासाठी जावा डेव्हलपर्सच्या टीमशी समन्वय साधणं.
Previous Update –
Wipro Job Recruitment 2022
Wipro Recruitment 2022 : Vacancies for BCA and B.Sc pass candidates in Wipro Company. The recruitment will be for BCA & B.Sc graduates (BCA & B.Sc jobs in Wipro). Eligible candidates are required to apply online (online job in Wipro) on the given link. Further details are as follows:-
देशातील नामांकित IT आणि टेक कंपनी Wipro इथे लवकरच काही जागांसाठी भरती (Jobs in Wipro) होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. BCA आणि B.Sc पदवीधरांसाठी ही भरती (BCA & B.Sc jobs in Wipro) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन (Online job in Wipro) पद्धतीनं अर्ज करायचे आहेत.
Wipro is launching this IT sector job for freshers under its Work Integrated Learning Program 2.0. Exactly which candidates will get the opportunity under this recruitment? Which candidates will be eligible (Eligibility Wipro Recruitment 2022)? Also, what will be the last date to apply for this post?
Wipro Recruitment 2022 | New Job Opportunities at Wipro
Eligibility Criteria Wipro Vacancy 2022
- Bachelor of Computer Application – BCA
- Bachelor of Science- B.Sc. Eligible Streams-Computer Science, Information Technology, Mathematics, Statistics, Electronics and Physics
- Evaluation Process Registration –> Online Assessment –> Business discussion –> Offer Letter
- Candidates who want to apply for this post must have completed education up to Bachelor of Computer Application BCA.
- Or candidates must have completed education up to Bachelor of Science B.Sc.
- Candidates who have passed B.Sc should have studied in Computer Science, Information Technology, Mathematics, Statistics, Electronics, and Physics.
- Candidates who want to apply for this post must be a pass out of 2020, 2021 or 2022 batch.
- Candidates should have studied Core Mathematics during graduation. Business or Applied Mathematics will not work.
- A maximum gap of three years is allowed between tenth to graduate education. If there is a gap on this, such candidates will not be eligible.
- Graduation must be completed in three years. Such candidates will not be eligible if there is a gap between graduation.
- Candidates must have done 10th and 12th full time.
- Candidates should have only one backlog till the day of the interview. Candidates who have a backlog will not be eligible.
Wipro Recruitment 2022 Salary Details
या पदभरतीसाठी अर्ज केल्यानंतर मुलाखत परीक्षा आणि सर्व टप्पे पार करून निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 23,000 रुपये प्रतिमहिना इतका Stipend देण्यात येणार आहे.
Period: (INR Per Month)
- 1st Year STIPEND: 15,000 + 488 (ESI) + Joining Bonus of 75k
- 2nd Year STIPEND: 17,000 +533 (ESI)
- 3rd Year STIPEND: 19,000 + 618 (ESI)
- Fourth Year: 23,000
Merge Bonuses for the 1st 3 years post completion of the M.tech degree.
Post the completion of the program, the designation will be Senior Project Engineer and compensation will range from INR 6,00,000 p.a onwards depending on performance.
Other Benefits:
- M.Tech degree fully sponsored by Wipro.
- Group Life Insurance of INR 14 Lakhs p.a
- Group Personal Accident Cover of INR 12 lakhs p.a
Selection Process For Wipro Jobs 2022
- या पद्भारतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांची सुरुवातीला Online Assessment होणार आहे.
- ही परीक्षा 80 मिनिटांची असणार आहे.
- त्यातील पहिल्या टप्प्यात Verbal, Analytical, Quantitative या विषयांतील वीस प्रश्न विचारले जाणार आहेत.
- तर दुसऱ्या टप्प्यामध्ये Written Communication Test होणार आहे.
- ही टेस्टही वीस मिनिटांची असणार आहे.
- या सर्व टेस्ट पास केल्यानंतर उमेदवारांना डिस्कशन राउंडला सामोरं जावं लागणार आहे.
- यानंतरच निवड इंश्चित केली जाणार आहे.
The last date to apply for this post is February 7, 2022. Candidates need to go to the website ‘careers.wipro.com/wilp’ and click on the ‘Apply Now’ link to apply online.
Wipro Recruitment 2022 | New Job Opportunities at Wipro
Wipro Jobs for Freshers
Wipro Recruitment 2021 : Golden Opportunity for Freshers at Wipro. Currently, the company has announced the hiring of freshers. So let us know the details regarding this recruitment. Further details are as follows:-
Wipro Recruitment: ही संधी अजिबात सोडू नका; फ्रेशर्ससाठी विप्रो कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी; करा अप्लाय. सध्या कंपनीनं फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे. चला तर मग जाणून घेऊया या भरतीसंदर्भातील डिटेल्स. Wipro मध्ये (Jobs in Wipro) फ्रेसशर्ससाठी नोकरीची (Freshers jobs in Wipro) मोठी सुवर्णसंधी आहे. विप्रो फ्रेशर्स (Jobs for Freshers in IT) इंजिनिअर्सना प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer Jobs in IT) म्हणून लवकरच जॉब देणार आहे. विप्रो कंपनी ही इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी (IT jobs latest) या क्षेत्रात तसंच कन्सल्टिंग क्षेत्रातही अग्रेसर आहे. विप्रोचं मुख्यालय बंगलोर, कर्नाटक इथे आहे. सध्या कंपनीनं फ्रेशर्सना नोकरी देण्याची घोषणा केली आहे.
- वयोमर्यादा – 25 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2022
Jobs in Wipro – Eligibility Criteria
- B.E./B. Tech (compulsory degree)
- M.E./M. Tech (5 year integrated course)
- Full-time courses recognized by the Central / State Government of India; Degree, no part-time or correspondence or distance learning in 10th or 12th grade – all branches except fashion technology, textile engineering, agriculture and food technology
- Must be the year of passing: 2020, 2021, 2022.
- A backlog is allowed up to the offer stage – 60% or 6.0 CGPA or equivalent as per your university guidelines
- 10th class: Must have 60% or more marks.
- 12th class: Must have 60% or more marks.
Pay Scale – Jobs in Wipro
- प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer) – 3,50,000/- रुपये प्रतिवर्ष
Important Details
- विप्रोने गेल्या सहा महिन्यांत घेतलेल्या कोणत्याही निवड प्रक्रियेत सहभागी झालेले उमेदवार पात्र नाहीत
- इतर कोणत्याही देशाचा पासपोर्ट असल्यास तुम्ही भारतीय नागरिक असले पाहिजे किंवा तुमच्याकडे PIO किंवा OCI कार्ड असावे.
- भूतान आणि नेपाळच्या नागरिकांना त्यांचे नागरिकत्व प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे
- दिलेल्या ऑनलाइन मूल्यांकनापासून 90 दिवस किंवा 3 महिन्यांनंतरच उमेदवार पुन्हा नोंदणीसाठी पात्र आहेत.
- उमेदवारांना एक बॅकलॉग असणं मान्य करण्यात येणार आहे.
- दहावी ते पडीपर्यंत कमाल तीन वर्षांची गॅप असणं मान्य करण्यात येणार आहे.
- मूल्यांकनासाठी पात्र उमेदवारांना बॅचमध्ये आमंत्रित केले जाईल.
Wipro Recruitment for Financial professionals)
Commerce Graduate Candidates, Do Not Give Up the Golden Chance of Job; Apply immediately. Reputable company Wipro is looking for an experienced data analyst based in Gurgaon for their finance domain. These finance professionals will work with technical professionals to support clients. Further details are as follows:-
Wipro jobs for Data Analyst
कॉमर्स ग्रॅज्युएट उमेदवारांनो, Job चा गोल्डन चान्स सोडू नका; लगेच करा अर्ज. नामांकित कंपनी Wipro त्यांच्या फायनान्स डोमेनसाठी गुडगाव स्थानावर अनुभवी डेटा विश्लेषक शोधत आहे. क्लायंटना सपोर्ट करण्यासाठी हे फायनान्स प्रोफेशनल्स टेक्निकल प्रोफेशनल्ससोबत काम करणार आहेत. क्लायंट सपोर्ट सुधारण्यासाठी आर्थिक व्यावसायिक कर्मचारी यांच्यातील संपर्क म्हणून कार्य करणार आहेत.
Eligibility Criteria For Wipro Recruitment for Financial Domain
- या जॉब्स साठी अप्लाय करण्यासाठी उमेदवारांनी अकाउंटिंग, फायनान्स किंवा टेक्नॉलॉजीमध्ये डिग्रीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.
- तसंच उमेदवारांना संबंधित पदावर काम करण्याचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.
- यूएस GAAP चे ज्ञान
- आर्थिक डोमेनमध्ये काम करण्याचा अनुभव / आर्थिक अटींचे चांगलं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- SQL वापरून डेटाबेसमधील डेटाची क्वेरी आणि विश्लेषण करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे.
- Excel चं ज्ञान असणं आवश्यक आहे.
- उमेदारांकडे स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल्स असणं आवश्यक आहे. (लिखित आणि मौखिक)
- उमेदवारांकडे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स असणं आवश्यक आहे.
- नवीन तंत्रज्ञान शिकण्याची आणि तांत्रिक आणि कार्यात्मक कौशल्ये वाढवण्याची इच्छा असणं आवश्यक आहे.
- मजबूत संघ नेतृत्वासह सेल्फ-स्टार्टर, स्वतंत्रपणे विचार करण्याची क्षमता, बहु-कार्य आणि वेगाने बदलणाऱ्या वातावरणात संघासोबत काम करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे.
Wipro Job Profile
- उमेदवारांनी फायनान्शिअल सपोर्ट देणं आवश्यक आहे.
- Technology team आणि business stakeholders चं एकमेकांशी संभाषण घडवून आणणं आवश्यक आहे.
- कंपनीचा बिझिनेस वाढवण्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे.
- अंतर्गत सुधारणांसाठी क्षेत्रे ओळखण्यात आणि सर्जनशील, सर्वसमावेशक उपाय प्रदान करण्यात सक्षम उमेदवार असणं आवश्यक.
- आर्थिक अहवाल प्रणालीसाठी भविष्यातील सुधारणा आणि/किंवा एकत्रीकरण प्रकल्पांच्या समन्वय, चाचणी आणि अंमलबजावणीमध्ये योगदान देणं आवश्यक.
Complete Details – New Job Opportunities At Wipro
Wipro’s Begin Again Program Recruitment 2021 – 2022
बेंगळुरू स्थित IT कंपनी, Wipro ने ‘Wipro’s Begin Again प्रोग्राम’लाँच करण्याची घोषणा केली आहे आणि ज्या महिला व्यावसायिकांना नोकरी दिली जाणार आहे. भारतात आधारित नोकऱ्यांसाठी ज्या महिलांना 6 महिने ते 1 किंवा त्याहून अधिक वर्षांचा करिअर ब्रेक आहे त्यांच्याकडून अर्ज मागवले जाणार आहेत.
विप्रोच्या बिगिन अगेन कार्यक्रमावर भाष्य करताना कंपनी म्हणाली, “बिगिन अगेन” हा आमचा समावेश आणि विविधता (I&D) उपक्रम आहे ज्या महिला विश्रांतीनंतर त्यांचे करिअर पुन्हा सुरू करू पाहत आहेत – मग ते विश्रांती, मातृत्व, वृद्धांची काळजी, प्रवास, आवड, किंवा इतर कोणतीही वैयक्तिक कारणे असो अशा महिलांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे.
हा उपक्रम प्रतिभावान महिलांना करिअरच्या संधी शोधण्यास सक्षम करतो ज्यामुळे त्यांच्या क्षमतेचा उपयोग होईल आणि उद्योगाच्या सध्याच्या मागण्यांनुसार त्यांना पुन्हा मार्गावर येण्याची परवानगी मिळेल.” असं विप्रो कंपनीकडून कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
- सुरुवातीला या पदभरतीबाबत संपूर्ण माहिती घ्या.
- त्यानंतर तुम्ही पात्र असाल तर ऑफिशिअल वेबसाईटवर जाऊन संपूर्ण माहिती भरा.
- संपूर्ण माहिती भरून झाल्यावर तुम्हाला SUBMIT वर क्लिक करायचं आहे.
- अशाप्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.
सुरक्षितता आणि आरोग्यावर भाष्य करताना कंपनी म्हणाली, “विप्रोमध्ये आमच्या कर्मचार्यांची सुरक्षा, आरोग्य आणि कल्याण याला खूप महत्त्व आहे आणि गेल्या काही आठवड्यांपासून आम्ही आमच्या कर्मचार्यांना कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावापासून वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.
Wipro Off Campus Recruitment 2021 Details
Wipro Recruitment 2021 : Wipro has organized Wipro Off Campus Drive for freshers. Through this, freshers will get job opportunities. Wipro is preparing to increase the number of employees in the company (Wipro NTH latest jobs). Candidates for the 2020 and 2021 batches will be able to apply for this off-campus drive. Further details are as follows:-
Wipro NTH Recruitment
देशातील नामांकित IT कंपनी Wipro मध्ये लवकरच फ्रेशर्ससाठी मोठी पदभरती होणार आहे. Wipro नं फ्रेशर्ससाठी Wipro Off Campus Drive आयोजित केलं आहे. या माध्यमातून फ्रेशर्सना नोकरची संधी मिळणार आहे. Wipro ला कोरोनाच्या काळातही मोठा नाफेझ आला आहे त्यामुळे आता Wipro कंपनीतील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याच्या तयारीत आहे. 2020 आणि 2021 या बॅचेसच्या उमेदवारांना या ऑफ कॅंपस ड्राइव्हसाठी अप्लाय करता येणार आहे. Wipro Elite Off Campus FY’20 & FY’21 असं या ऑफ कॅंपस ड्राईव्हचं नाव असणार आहे.
फ्रेशर्ससाठी नोकरीची मोठी सुवर्णसंधी – मायक्रोसॉफ्ट लवकरच करणार नवी भरती
Wipro NTH Latest Jobs
- पदाचे नाव – प्रोजेक्ट इंजिनिअर (Project Engineer)
- शैक्षणिक पात्रता –
- उमेदवारांनी CS/ IT/ Circuital या इंजिनिअरिंगच्या ब्रांचेसमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना दहावीमध्ये 60 टक्क्यांच्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे.
- उमेदवारांना बारावीमध्ये 60 टक्क्यांच्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे.
- ग्रॅज्युएशनमध्ये उमेदवारांना 65 टक्क्यांच्या वर मार्क्स असणं आवश्यक आहे किंवा 6.5 CGPA असणं अनिवार्य आहे.
How To Apply For Wipro Vacancy 2021
- सुरुवातीला https://careers.wipro.com/careers-home.या ऑफिशिअल वेबसाईटला ओपन करा.
- यानंतर Wipro Elite NTH 2022 Off Campus Drive ही लिंक शोध.
- यानंतर Register Now वर क्लिक करा.
- नवीन टॅबमध्ये विचारण्यात आली सर्व माहिती भरा.
- यानंतर सर्व तपशील तपासून Register वर क्लिक करा.
- अशा पद्धतीनं रजिस्टर करू शकता.
- परीक्षेची वेळ, आणि इतर संपूर्ण माहिती तुम्हाला मैलावर देण्यात येईल
Selection Process For Wipro New Recruitment 2021
- सुरुवातीला उमेदवारांची Aptitude Test घेण्यात येणार आहे. यामध्ये Logical Ability, Quantitative Ability, English (verbal) Ability या संबंधीचे प्रश्न असणार आहेत. या टेस्टसाठी 48 मिनिटांची वेळ देण्यात येणार आहे.
- यानंतर Written Communication Test म्हणजे निबंध लिखाणाची टेस्ट असणार आहे. यासाठी उमेदवारांना 20 मिनिटांची वेळ देण्यात येणार आहे.
- यानंतर Online Programming Test घेण्यात येणार आहे. यामध्ये उमेदवारांना दोन प्रोग्रॅम्सना कोडिंग करायची आहे. यासाठी एक तासाचा कालवधी देण्यात येणार आहे.
- उमेदवार यासाठी Java, C, C++, or Python यापैकी कोणतीही एक लँग्वेजची निवड करू शकणार आहेत.
- सर्व झाल्यानंतर निवड करण्यात आलेल्या उमेदवारांचा Technical Interview आणि HR Interview होणार आहे.
Other Important Criteria | Wipro Package for Freshers 2021
- Candidates who have applied for any Wipro recruitment in the last six months will not be able to apply for this recruitment.
- Candidates must have a full time degree from any recognized university.
- Candidates cannot apply if they have any backlog.
- The salary for these posts will be Rs 3.5 lakh per annum.
Wipro Recruitment 2021 Details
Wipro Recruitment 2021 : The country’s largest IT company Wipro Freshers will be given a chance. Wipro will recruit through the Elite National Talent Hunt program. On the one hand, job opportunities are declining in the Corona period, but bumper recruitment has started in IT companies. The country’s largest IT company Wipro Freshers will be given a chance. Wipro will recruit through the Elite National Talent Hunt program.
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी खुशखबर; Wiproत मोठी भरती; पॅकेज 3.5 लाख. देशातील दिग्गज आयटी कंपनी विप्रो फ्रेशर्सना संधी देणार आहे. Elite National Talent Hunt या प्रोग्रॅमच्या माध्यमातून विप्रो भरती करणार आहे. कोरोना काळात एका बाजुला नोकऱ्यांची संधी कमी होत असताना आयटी कंपन्यांमध्ये मात्र बंपर भरती सुरु आहे. देशातील दिग्गज आयटी कंपनी विप्रो फ्रेशर्सना संधी देणार आहे. Elite National Talent Hunt या प्रोग्रॅमच्या माध्यमातून विप्रो भरती करणार आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
2022 पर्यंत शिक्षण पूर्ण करणाऱ्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये किमान 30 हजार जणांची भरती होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. विप्रोच्या या प्रोग्रॅमसाठी नोंदणीची सुरुवात 23 ऑगस्टपासून सुरु झाली असून 15 सप्टेंबरपर्यंत यासाठी मुदत आहे. या अर्जांची छाननी 25 ते 27 सप्टेंबरच्या दरम्यान होईल. नॅशनल टॅलेंट हंटच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी विद्यार्थ्यांचे पासिंग इयर हे 2022 तर वयोमर्यादा 25 इतकी असणार आहे. तसंच प्रोजेक्ट इंजिनिअर या पदासाठी ही भरती होणार आहे.
Eligibility Criteria For Wipro Vacancy 2021
- विप्रोने Elite National Talent Hunt साठी पात्रतेचे काही निकष ठरवले आहेत.
- त्यात B.E./B. Tech पदवी असणे अनिवार्य आहे. तसंच M.E./M. Tech पाच वर्षांचा संलग्न कोर्स हा पुर्णवेळ आणि केंद्रीय किंवा राज्य सरकारची मान्यता असलेल्या संस्थेत झालेला हवा.
- फॅशन टेक्नॉलॉजी, टेक्स्टाइल इंजिनिअरिंग, अॅग्रीकल्चर आणि फूड टेक्नॉलॉजी वगळता सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना यासाठी अर्ज करता येईल.
- विद्यार्थ्यांला 60 टक्के किंवा त्याहून जास्त गुण असणे आवश्यक आहे.
- दहावी बारावीमध्येही संबंधित उमेदवारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त गुण हवेत.
- याशिवाय अर्ज करतेवेळी विद्यार्थ्याचे एखादा पेपर बॅक असेल तर त्याला परवानगी दिली जाईल.
- मात्र, त्याचे आधीचे सर्व पेपर क्लिअर असले पाहिजेत.
दहावीपासून ग्रॅज्युएशनपर्यंत जर 3 वर्षांचा गॅप असेल तरी अर्ज स्वीकारला जाईल. उमेदवाराने गेल्या 6 महिन्यात विप्रोकडून घेतलेल्या कोणत्याही परीक्षेत भाग घेतला असेल तर त्याला अर्ज करता येणार नाही. टॅलेंट हंट प्रोग्रॅम अंतर्गत वार्षिक 3.50 लाख रुपयांचे पॅकेज दिले जाणार आहे. उमेदवार हा भारतीय नागरिक असावा किंवा त्याच्याकडे PIO किंवा OCI कार्ड असायला हवं. भूटान आणि नेपाळच्या नागरिकांना त्यांचे नागरिकत्व प्रमाणपत्र द्यावे लागेल.
Wipro’s Elite National Talent Hunt: मूल्यमापन कसे होणार?
Candidate will be evaluated online. This will be followed by a business discussion. An offer letter will then be sent. The online assessment will take a 128-minute test. In this, logic based Aptitude Test, Quantitative ability, English (verbal) ability will be tested. There will also be another test with essay writing. There will also be an online programming test with two coding programs. Applicants can choose Java, C, C ++ or Python for programming.
या संदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…
Table of Contents
नक्की जॉब मिळेल का
Sir Nada civil madhe diploma zalay tar NLA job Mikel na