Vanarti Exam Center
Vanarti Exam Center :महाज्योती आणि वनार्टी संस्थेमार्फत २०२६-२७ या आर्थिक वर्षात विविध स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीसाठी प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरिता घेण्यात येणारी चाळणी परीक्षा ७ ऑक्टोबर ते ९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत नियोजित करण्यात आली आहे.या चाळणी परीक्षेद्वारे संघ लोकसेवा आयोग (नागरी सेवा), महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा, अभियांत्रिकी सेवा, संयुक्त गट-ब व गट-क तसेच लष्करातील सैनिक भरती परीक्षेपूर्व प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. त्यामुळे संबंधित परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची संधी मानली जात आहे.
महाज्योती व वनार्टीच्या चाळणी परीक्षेसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची दिलासादायक अपडेट समोर आली आहे. ७ ते ९ ऑक्टोबर २०२६ दरम्यान होणाऱ्या चाळणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार दिल्ली येथील परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले होते. मात्र, सध्या दिल्ली येथे जाऊन परीक्षा देणे शक्य नसलेल्या विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन त्यांना आता महाराष्ट्रातच परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे.दिल्ली परीक्षा केंद्राची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून यापूर्वी अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार संबंधित विद्यार्थ्यांना दिल्ली केंद्र देण्यात आले. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना दिल्ली केंद्र मिळाले आहे आणि सद्यस्थितीत तेथून परीक्षा देणे शक्य नाही, अशा सर्व विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार परीक्षा केंद्रात पुन्हा बदलाची सुविधा; महाराष्ट्राऐवजी दिल्ली केंद्राचीही संधी. महाज्योती व वनार्टीच्या चाळणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राबाबत मोठा दिलासा देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून, ज्या विद्यार्थ्यांना सध्या महाराष्ट्रातील परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि आता दिल्ली येथून चाळणी परीक्षा देण्याची इच्छा आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा दिल्ली येथील परीक्षा केंद्र उपलब्ध करून देण्यात येत आहे.त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयी आणि मागणीनुसार महाराष्ट्र किंवा दिल्ली येथून चाळणी परीक्षा देण्याची सुविधा मिळणार आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















