JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

वनविभागात २,४०८ पदे रिक्त, नवीन भरती प्रक्रिया लवकरच!- Maharashtra Van Vibhag Bharti 2025

Maharashtra Van Vibhag Bharti 2025 Update

वन विभाग भरती संदर्भात एक महत्वाची बातमी समोर आली आहे. वन आणि वन्यजीव संवर्धन हा कळीचा मुद्दा झाला असतानाच राज्यातील वनविभागात मंजूर २३ हजार ४६९पैकी २ हजार ४०८ पदे रिक्त असल्याचे माहिती अधिकारातून समोर आले आहे. वर्षागणिक ही संख्या वाढत असल्याने वन्यजीव संवर्धन आणि जैवविविधतेच्या रक्षणावर प्रतिकूल परिणाम होत आहे. राज्यात ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्प, बोर, पेंच, नवेगाव-नागझिरा, मेळघाट आणि सह्याद्री असे सहा व्याघ्रप्रकल्प तर ४८हून अधिक अभयारण्य आहेत. या प्रत्येक प्रकल्पातील सर्वच गटांत रिक्तपदे असल्याने कामकाजावर परिणाम होत आहे. प्रादेशिक, वन्यजीव, मूल्यांकन, सामाजिक वनीकरण आणि शिक्षण अशा विविध उपविभागांत ही पदे विभागली गेल्याने कामकाजावर गंभीर परिणाम होत आहे. गटनिहाय विचार करता वनविभागात ‘अ’ गटात सरळ सेवेची ९२ पदे मंजूर आहेत. तूर्त ४४ पदे कार्यरत असून ४८ रिक्त आहेत. यात मुख्य वनसंरक्षकाची पदोन्नतीच्या १४ रिक्तपदांचा समावेश आहे. तर सरळ सेवेची सहाय्यक वनसंरक्षकांची ३० पदे रिक्त आहेत. याच गटात पदोन्नतीसह एकूण ६०४ पदे मंजूर असून अजूनही १२८ पदे रिक्त आहेत. ‘ब’ गटात १ हजार १०६ पदे मंजूर आहेत. यातील ८४२ कार्यरत तर २६४ पदे रिक्त आहेत. अराजपत्रित ‘ब’ गटात १४६ पदे मंजूर असून ५९ रिक्त असल्याची माहिती आहे. क गटात १६ हजार ५१७ पदे मंजूर असून यात १ हजार ७५८ पदे रिक्त आहेत. ‘ड’ गटात ९०१ पदे मंजूर आहेत. यातील ७०२ पदे भरण्यात आली असून १९९ रिक्त आहेत. या रिक्त पदांची भरती प्रक्रिया सुरु होणे लवकरच आवश्यक आहे.  या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Van Vibhag Bharti 2025 - 2026

मनुष्यबळाच्या अवैध वृक्षतोड आणि लाकूडतोड थांबविण्यात अडचण निर्माण होते. विदर्भासारख्या वन्यजीव अधिक कमतरतेमुळे असलेल्या प्रदेशात शिकारीचे प्रमाण वाढीस लागते. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे कठीण होते. रिक्तपदांमुळे वनविभागाचे कार्य विस्कळीत होऊन वनक्षेत्र आणि वन्यजीवांच्या संरक्षणास धोका निर्माण झाल्याचेही जाणकार सांगत आहेत. तर दुसरीकडे वन्यजीवांचे संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वनरक्षकांवर अनेकदा अधिक जबाबदाऱ्या दिल्या जातात. यातूनच शिकारविरोधी उपाययोजनांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी फारसा वेळ राहत नाही. प्रादेशिक जंगलांमधील वाघांना व्याघ्रप्रकल्पांमधील वाघांप्रमाणेच संरक्षणाची आवश्यकता असते. पर्यटनापासून वाघांच्या संवर्धनाकडे लक्ष केंद्रित करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय दिनांक 21/12/2019 अन्वये, अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता विशेष पदभरती मोहीम अंतर्गत चंद्रपूर व गडचिरोली वनवृत्तामार्फत जाहीरात प्रसिध्द करण्यांत आली होती. सदर भरतीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची यादी वनविभागाचे संकेतस्थळावर यापुर्वीचं जाहीर केलेली आहे. तथापी काही अपरिहार्य कारणास्तव प्रलंबित भरती प्रक्रियेला शासनाने मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने, या भरतीमध्ये पात्र उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा दिनांक 06/01/2025 ते 07/01/2025 रोजी TCS ION यांचेमार्फत नागपूर व चंद्रपूर येथील परिक्षा केंद्रावर घेण्यांत येणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र डाऊनलोड करण्याकरीता https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/32549/92382/login.html ही लिंक उपलब्ध करुन देण्यांत आली आहे. तरी उमेदवारांनी सदर लिंकवर जाऊन प्रवेशपत्र डाऊनलोड करावे.

 

 

Van Vibhag Bharti 2025:  प्रधान मुख्य वनसंरक्षक महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने ५ डिसेंबर २०२४ रोजी एक परिपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये गट ‘ड’ प्रवर्गातील १२ हजार ९९१ पदे भरण्यात येणार असल्याचा उल्लेख आहे. परंतु यामध्ये शैक्षणिक अर्हता किमान १०वी ते कमाल १२वी पास इतकी देण्यात आली आहे. त्यामुळे या भरतीला १२वी पेक्षा जास्त शिक्षण घेतलेले, पदवीधर, उच्च शिक्षण घेतलेले उमेदवार तसेच स्पर्धा परीक्षा तयारी करणारे विद्यार्थी अपात्र आहेत. हा विद्यार्थ्यांवर अन्याय असून याची शासनाने दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन किंवा न्यायालयात जाण्याचा इशारा पत्रकार परिषदेत महाराष्ट्र अॅकॅडमीचे विठ्ठल बडे, विवेकानंद बडे, राहुल भैसडे, ज्ञानेश बांगर यांनी दिला.

विठ्ठल बडे म्हणाले, वन विभागातील पदासाठी जाहिरातसुद्धा येणार आहे. यासाठी किमान १०वी पास व कमाल १२वी पास अशी शैक्षणिक अट ठेवण्यात आली आहे. तसेच जास्त शिक्षण घेतलेले उमेदवार निवड प्रक्रियेत सहभागी होणार नाहीत यासाठी हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे. त्यामुळे पदवी शिक्षण झालेले लाखो विद्यार्थी या भरतीला मुकणार आहेत. परिपत्रकामध्ये उच्च शिक्षण झालेल्या उमेदवाराकडून जास्तीचा लाभ घेतला जाऊ शकतो. त्यामुळे कमी शैक्षणिक अर्हता असलेल्या उमेदवारांना संधी मिळणार नाही, असा उल्लेख केला आहे. त्यामुळे ही अट ठेवण्यात आली आहे. दरम्यान, अशी अट इतर कोणत्याही गट अ, गट ब, गट क परीक्षेसाठी नाही. आजपर्यंत आलेल्या सर्व गट ड पदांच्या ही परीक्षेमध्ये कुठेही कमाल शिक्षणाची अट नव्हती. अनेक गट ड परीक्षांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगार अर्ज करत असतात. सोबत पुढील शिक्षण घेत असतात, असे त्यांनी सांगितले.

शिक्षणाची अट काढून टाका

राज्यात आणि देशात मोठ्या प्रमाणात मुक्त विद्यापीठे स्थापन झाल्यामुळे सर्वच विद्यार्थी बारावीनंतर पुढील शिक्षण घेत आहेत. एकीकडे सरकार शिक्षणाला प्रोत्साहन देत आहे आणि दुसरीकडे जाहिरात काढताना कमाल शिक्षणाची अट ठेवत आहे. आमची सरकारकडे विनंती आहे, अशी चुकीची आणि विरोधाभास असणारी शिक्षणाची अट काढून टाकण्यात यावी. अशा पत्रकामुळे अनेक गट क, गट ड परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी शिक्षण थांबवण्याची शक्यतासुद्धा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान टाळावे, अन्यथा विद्यार्थी रस्त्यावर उतरतील, असा इशारा यावेळी बडे यांनी दिला.

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड