JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

मराठी, ऊर्दू भाषकांचा शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा! – Urdu Marathi Shikshak Bharti 2026

Urdu Marathi Shikshak Bharti 2026 – Shikshak Bharti for Urdu &marathi Teachers will be begin soon for large number of vacancies in All over Maharashtra. The urdu & Marathi shikshak job vacancies Recruitment Drive Process will begin in all over Maharashtra. More details and updates will be given on this page. So keep visiting us.  It has been announced that the recruitment process will be carried out in the next two months. There are Large number of vacancies for Marathi & Urdu teachers, and this recruitment drive aims to fill these vacancies. This demand has been made by the All India Urdu Teachers Association, and Sajid Nisar Ahmad, the state secretary of the organization, has submitted the demand to the government.

शिक्षक भरती प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. या संदर्भातील एक मोठी बातमी समोर येत आहे. या मुले शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या नवीन माहिती नुसार त्याचा फायदा मराठी व ऊर्दू माध्यमाच्या उमेदवारांना होणार आहे. पदवीधर शिक्षक आणि माध्यमिक शिक्षकांच्या भरतीसंदर्भातील नियमांमध्ये सुधारणा प्रस्तावित करण्यात आली आहे. याबाबतचा मसुदा जाहीर करण्यात आला असून त्यावर पंधरा दिवसांत आक्षेप नोंदवून घेतले जाणार आहेत. नवे बदल अंमलात आल्यास मराठी आणि उर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना शिक्षक भरती परीक्षेत भाषेचा पर्याय उपलब्ध होणार आहे. चार वर्षांची एकात्मिक शिक्षक पदवी घेतलेल्या उमेदवारांनाही माध्यमिक शिक्षक पदांसाठी संधी मिळणार आहे. सहावी ते आठवीसाठी पदवीधर प्राथमिक शाळा शिक्षक पदांच्या भरतीसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या स्वरूपात बदल प्रस्तावित आहे. त्यानुसार परीक्षेतील पेपर-१ आणि पेपर-२ या प्रश्नपत्रिका आवश्यकतेनुसार मराठी किंवा ऊर्दू भाषेतही उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी प्रश्नपत्रिकेच्या भाषेबाबत असलेल्या मर्यादांमुळे मराठौ आणि ऊर्दू माध्यमातून शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना अडचणी येत होत्या. नव्या प्रस्तावामुळे उमेदवारांना त्यांच्या भाषिक पाश्र्वभूमीनुसार प्रश्न समजून घेणे आणि विषयाचे ज्ञान प्रभावीपणे मांडणे अधिक सुलभ होऊ शकते.

Urdu Marathi Shikshak Bharti 2026
माध्यमिक शाळांतील सहायक शिक्षक पदांच्या पात्रतेबाबतही सरकारने सुधारणा प्रस्तावित केली आहे. आतापर्यंत पारंपरिक पदवी आणि बी.एड. या शैक्षणिक पात्रतेच्या आधारे उमेदवारांचा विचार केला जात असताना, आता चार वर्षांची एकात्मिक शिक्षक शिक्षण पदवी घेतलेल्या उमेदवारांनाही पात्रतेच्या चौकटीत समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे. कला, जीवशास्त्र आणि भाषा शिक्षक पदांसाठी ही पात्रता ग्राह्य धरण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे संबंधित अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांनाही शिक्षक भरतीसाठी संधी मिळणार आहे.

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

येत्या दोन महिन्यांत भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे सूचित केले आहे. उर्दू प्राथमिक शिक्षकांची तीन हजार बारा पदे रिक्त असून या भरतीत उर्दू शिक्षक पदे भरण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघातर्फे राज्य सरचिटणीस साजिद निसार अहमद यांनी शासनाकडे केली आहे.

राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचे आयोजन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नियंत्रणाखाली २२ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण झाले आहेत. सदर परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर शिक्षक रिक्त पदांची भरती पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे करण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध होईल.

 

त्या करिता राज्यात प्रस्तावित ३० हजार शिक्षक भरतीत अल्पसंख्याक समाजातील डीएड- बीएड धारक बेरोजगारांना न्याय मिळवा, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. राज्यातील अनेक शाळेत रिक्त पदे असल्याने दोन- तीन वर्गाचे अध्यापन कार्यरत शिक्षक यांना करावे लागत आहे.

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड