कोरोनामुळे UPSC मुख्य परीक्षा देऊ न शकलेल्या मोठा दिलासा!!
UPSC Exam 2022
UPSC Exam 2022
UPSC Exam 2022 : It was demanded that students who failed the main examination due to corona should be given extra opportunity for the main examination. The court directed the UPSC to reconsider the petition of the concerned students and take a final decision within two weeks. Give another chance to students who failed the main exam due to corona infection, reconsider in two weeks, the court directed. Further details are as follows:-
कोरोनामुळे मुख्य परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य परीक्षेसाठी अतिरिक्त संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या वतीने वकील प्रशांत भूषण यांनी 24 मार्च 2022 रोजीच्या संसदीय समितीच्या अहवालाचा संदर्भ दिला. यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यूपीएससीला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्यास सांगितले आहे. संबंधित विद्यार्थ्यांच्या याचिकेवर फेरविचार करून दोन आठवड्यांत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयाने यूपीएससीला दिले आहेत. कोरोना संसर्गामुळे मुख्य परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी द्या, त्याबाबत दोन आठवड्यांत पुनर्विचार करा, असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे संबंधित विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
कोरोना झाल्यामुळे परीक्षेला लागली होती गैरहजेरी
It was demanded that students who failed the main examination due to corona should be given extra opportunity for the main examination. On behalf of the students, Advocate Prashant Bhushan referred to the report of the Parliamentary Committee dated March 24, 2022. The apex court has since asked the UPSC to reconsider its decision.
केंद्र सरकारची भूमिका
- केंद्राने न्यायालयात आधीच आपली भूमिका मांडली आहे. जे उमेदवार कोणत्याही कारणामुळे UPSC मुख्य परीक्षा देऊ शकले नाहीत त्यांच्यासाठी अतिरिक्त प्रयत्न करण्याची तरतूद नाही, असे केंद्राने म्हटले होते.
- यापूर्वीही अशी प्रकरणे समोर आली आहेत, जेव्हा विद्यार्थी कोणत्याही कारणामुळे परीक्षेला बसू शकले नाहीत, परंतु कोणत्याही परिस्थितीत आयोगाने उमेदवारांसाठी अतिरिक्त संधी दिलेली नाही, असे न्यायालयाला सांगण्यात आले.
वयोमर्यादेबाबत न्यायालयाचा दिलासा
- गेल्या वर्षी, UPSC प्रिलिम्स परीक्षेत उत्तीर्ण झालेले काही उमेदवार कोरोना संसर्गामुळे मुख्य परीक्षेला बसू शकले नाहीत.
- यूपीएससीने घातलेल्या वयोमर्यादेमुळे या उमेदवारांचा शेवटचा प्रयत्न फसला.
- त्यामुळे उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
- वयोमर्यादेत शिथिलता देऊन त्यांना यंदाच्या परीक्षेला बसण्याची संधी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
- न्यायालयाने त्याची गंभीर दखल घेत आज विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला.
- याबाबत संसदीय समितीच्या अहवालाच्या आधारे दोन आठवड्यांत निर्णय घ्या, असे न्यायमूर्ती ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले आहे.
विद्यार्थ्यांच्या निवेदनावर पुनर्विचार करण्याचेही निर्देश
बरेच उमेदवार कोविडमुळे यूपीएससीच्या मुख्य परीक्षेला बसू शकले नव्हते. त्या विद्यार्थ्यांच्या निवेदनावर पुनर्विचार करण्याचे निर्देशही खंडपीठाने प्रशासनाला दिले आहेत. याचवेळी न्यायालयाने यूपीएससीच्या उमेदवारांनी दाखल केलेल्या याचिका निकाली काढल्या. उमेदवारांच्या वतीने वकील शशांक सिंह यांनी न्यायालयात बाजू मांडली. कोरोनामुळे ज्या उमेदवारांचा मुख्य परीक्षेचा शेवटचा प्रयत्न चुकला, ते दुसऱ्या संधीचे हक्कदार आहेत. यूपीएससीकडे अशा संभाव्य परिस्थितीसाठी कोणतेही धोरण नाही, असा युक्तिवाद सिंह यांनी केला. त्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली. (Supreme Court reassures students about giving another chance for UPSC main exam)