DElEd Result 2025 @ mscepune.in – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या DElEd परीक्षेचा निकाल मंगळवारी (Dt. 4 Aug) सकाळी जाहीर झाला. यानुसार राज्यात ६४.७५ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांना हा निकाल www.mscepune.in संकेतस्थळावर पाहता येणार आहे. या सदर परीक्षा ३ ते १२ जूनदरम्यान पार पडली. राज्यातून १३ हजार ५२६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी ९,००२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, ४,८९९ विद्यार्थ्यांना अपयशाला सामोरे जावे लागले. निकालाचे मूळ गुणपत्रक संबंधित विद्यार्थ्यांना अध्यापक विद्यालयामार्फत मिळेल. उत्तरपत्रिकेची गुणपडताळणी करायची झाल्यास व छायाप्रत हवी असल्यास विद्यार्थ्यांना २० ऑगस्टपर्यंत अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली.

माध्यमनिहाय चित्र
- मराठी : या माध्यमासाठी ९ हजार ९६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ९ हजार ६५८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ६ हजार २५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
- उर्दुः या माध्यमासाठी २ हजार ३१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ हजार २७९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील १ हजार ६६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
- हिंदी : या माध्यमासाठी २६२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २५७विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील २१० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
- इंग्रजी : या माध्यमासाठी १ हजार ३३१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी १ हजार ३०२ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील ८४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
- कन्नड : या माध्यमासाठी ३० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्या सर्वांनीच परीक्षा दिली असून, सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















