UPSC CMS परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू
UPSC CMS Exam 2020
UPSC CMS Exam 2020: केंद्रीय लोकसेवा आयोगाने कम्बाइंड मेडिकल सर्व्हिस परीक्षा (CMS) २०२० परीक्षेचं नोटिफिकेशन जाहीर केलं आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. इच्छुक आणि योग्य उमेदवार १८ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्यासाठी upsconline.nic.in या आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर जावं लागेल. परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना २५ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत आपला अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली आहे.
या परीक्षेमार्फत एकूण ५५९ पदांवर भरती केली जाणार आहे. अधिकृत वेळापत्रकानुसार, कम्बाइंड मेडिकल परीक्षा २०२० चं आयोजन २२ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यूपीएससी सीएमएस परीक्षा संगणक आधारित आहेत. उमदेवारांना कॉम्प्युटर बेस्ड मोडवर २ ऑब्जेक्टिव पेपर्सची चाचणी द्यावी लागेल. संगणकाधारित मोडवरील या परीक्षेसाठी डेमो मॉड्युल, ई-अॅडमिट कार्ड जारी होण्यावेळी यूपीएससीच्या संकेतस्थळावर माहिती देण्यात येईल.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
अर्ज शुल्क – Application Fees
- अर्जाचे शुल्क म्हणून २०० रुपये भरावे लागतील.
- महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी शुल्कमाफी आहे.
महत्त्वाच्या तारखा – Important Dates
- अर्ज करण्याची सुरुवात – २९ जुलै २०२०
- अर्ज करण्याची अंतिम मुदत – १८ ऑगस्ट २०२०
- अर्ज मागे घेण्याची मुदत – २५ ते ३१ ऑगस्ट
इच्छुक आणि योग्य उमेदवार पुढे दिलेल्या थेट लिंकवर क्लिक करून अर्ज भरू शकतात.
- UPSC CMS PDF जाहिरात – https://bit.ly/2X9kWsX
- ऑनलाईन अर्ज करा – https://upsconline.nic.in/mainmenu2.php
केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाऱ्या कंबाईंड मेडिकल सर्व्हिसेस (सीएमएस) परीक्षेची अधिसूचना २२ जुलै रोजी येणार होती, मात्र ती आता स्थगित करण्यात आली आहे. आता ही अधिसूचना २९ जुलै रोजी प्रसिद्ध केली जाईल. या संदर्भातील माहिती केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
यूपीएससी दरवर्षी कंबाइंड वैद्यकीय सेवा परीक्षा घेते. या परीक्षेच्या आधारे खालील पदांवर भरती केली जाते.
- रेल्वे मधील सहाय्यक विभागीय वैद्यकीय अधिकारी
- भारतीय शस्त्र कारखान्यांच्या आरोग्य सेवांमध्ये सहाय्यक वैद्यकीय अधिकारी
- केंद्रीय आरोग्य सेवांमध्ये कनिष्ठ स्केल पोस्ट
- नवी दिल्ली महानगरपालिका आणि पूर्व दिल्ली महानगरपालिका, उत्तर दिल्ली महानगरपालिका आणि दक्षिण दिल्ली मधील जनरल ड्युटी मेडिकल ऑफिसर ग्रेड -२
परीक्षा पॅटर्न
यूपीएससी सीएमएस परीक्षेचे आयोजन दोन टप्प्यात घेण्यात येते. पहिला भाग संगणक-आधारित परीक्षा आहे ज्यामध्ये दोन विषय असतात. प्रत्येक विषयात २५०-२५० गुण असतात. प्रत्येक पेपर २-२ तासांचा असतो. पहिल्या भागातील पात्र उमेदवारांना भाग २ साठी बोलावले जाते. भाग २ एक मुलाखत फेरी किंवा व्यक्तिमत्व चाचणी आहे. भाग २ म्हणजेच मुलाखतीला १०० गुण असतात.
UPSC CMS 2020 ची पात्रता – Qualification
- एमबीबीएसची अंतिम परीक्षा लेखी आणि प्रात्यक्षिक भाग पात्र असणे आवश्यक – कम्बाइन वैद्यकीय सेवा परीक्षा, 2020 साठी आवश्यक शारीरिक आणि वैद्यकीय मानकांनुसार शारीरिक आणि वैद्यकीयदृष्ट्या सक्षम असणे आवश्यक.
वयोमर्यादा – Age Limit
- ३२ वर्षांपेक्षा कमी वयाचे उमेदवार अर्ज करू शकतात.
UPSC अधिकृत वेबसाईट – https://www.upsc.gov.in/
Table of Contents
Hii