TRTI Free Training Application Form – राज्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राबविण्यात येणाऱ्या पोलिस, मिलिटरी आणि अग्निवीर भरतीपूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाइन अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (टीआरटीआय) वतीने ही घोषणा करण्यात आली असून, आता पात्र उमेदवारांना २४ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. ‘टीआरटीआय’मार्फत राबविण्यात येणाऱ्या या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी १७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. आता ही मुदत २४ नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे भरतीपूर्व प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. दरम्यान, ज्या उमेदवारांनी यापूर्वी जीआरई, टॉफेल, आयईएलटीएस, जीमॅट किंवा फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, कोरियन, रशियन व जपानी या परकीय भाषांच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे किंवा ज्यांचा अर्ज अपूर्ण राहिला आहे, त्यांना या योजनेचा अर्ज भरताना अडचण येऊ शकते. अशा उमेदवारांसाठी https://cpetp.trti-maha.in/otherExamLogin या लिंकवरून प्रोफाईल लॉग-इन करून आपला अपूर्ण अर्ज मागे घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















