आदिवासी विकास खात्यानं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यभरातल्या आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची १,७९१ पदं रिक्त असल्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणावर शिक्षक भरती केली जाणार आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली.
नागपूरच्या प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेतली गेली. उईके म्हणाले, यंदा शिक्षणाच्या गुणवत्तेमध्ये अजिबात तडजोड केली जाणार नाही. प्रत्येक शाळेत पालक प्रतिनिधी नेमणूक, विद्यार्थिनींसाठी ANM परिचारिका, आणि शाळांमधून दैनंदिन माहिती संकलन सुरू केलं आहे.
या शिक्षक भरतीसाठी ‘पेसा कायदा’ लागू केला जाणार असून, सुरुवातीला या पदांवर बाह्यस्त्रोताद्वारे नियुक्त्या होतील. न्यायालयीन प्रकरणं मार्गी लागल्यानंतर त्यांना कायम करण्याचा प्रयत्न केला जाईल.
राहण्याच्या सोयीचाही विचार
काही शाळांमध्ये शिक्षकांना राहण्यासाठी सोयीच नसल्याचं निदर्शनास आलं आहे. लवकरच त्या शिक्षकांसाठी आश्रमशाळेतच राहण्याची सोय करण्यात येणार आहे.
धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान सुरू!
उईके यांनी सांगितलं की, ३२ जिल्हे, २१४ तालुके आणि ४,९७५ गावांचा समावेश असलेलं “धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान” २०२४-२५ ते २०२८-२९ या कालावधीसाठी सुरू झालंय. यासाठी केंद्र सरकारनं तब्बल ७९,१५६ कोटींची तरतूद केली आहे.
या योजनेअंतर्गत:
आश्रमशाळा व वसतिगृहांसाठी सुविधा वाढवणं
१०० आदिवासी विपणन केंद्र
सिकलसेल आजारासाठी जनजागृती व समुपदेशन
कौशल्यविकास केंद्र स्थापन
…अशा अनेक गोष्टी केल्या जाणार आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















