आश्रमशाळांना मिळणार नवे शिक्षक, बेरोजगार उमेदवारांना मिळणार संधी- नवीन अपडेट जाहीर!!

Tribal Ashram School Bharti 2023

Adivasi Ashram School Bharti 2023

Tribal Ashram School Bharti 2023 – In Maharashtra State, At present, 6 thousand 690 posts are vacant in government tribal ashram schools. In the hearing before the State Human Rights Commission, the government had said that it would start the recruitment process in the month of December. However, it has not yet started. So Candidates who are waiting for Tribal Ashram School Vacancy 2023 can check new updates about Ashram School Vacancy 2023. As the Notification is Out, we will update on this Page.

 

जिल्ह्यातील काही आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त आहे. या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांच्या अधिनस्त असलेल्या शासकीय शाळांमध्ये घड्याळी तासिका तत्त्वावर उच्च माध्यमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक व पदवीधर प्राथमिक शिक्षकांची शासन निर्णयानुसार नेमणूक करण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन सत्रात आश्रमशाळांना नवे शिक्षक मिळणार आहे. यासाठी प्रशासनाने अर्ज मागविले असून १५ मेपर्यंत उमेदवारांना अर्ज करावयाचा आहे.

उच्च माध्यमिक शिक्षक या पदाकरिता इंग्रजी, मराठी, गणित, भौतिक, रसायन, जीवशास्त्र या विषयांसह एम.ए., एम.एससी., बी.ए. शैक्षणिक अर्हता धारण केलेली असावी. माध्यमिक शिक्षक पदाकरिता विज्ञान, गणित, इंग्रजी व मराठी विषयासह बी.एस्सी.,बी.एड., प्राथमिक शिक्षक पदाकरिता सर्व विषय घेता यावे, यासह बी.ए.,डी.एड., तर पदवीधर प्राथमिक शिक्षक पदाकरिता मराठी व इंग्रजी विषयासह बी.ए.,डी.एड. शैक्षणिक अर्हता धारण केलेली असणे गरजेचे आहे. या शिक्षकांना शासन निर्णयानुसार मानधन देण्यात येणार आहे. आश्रमशाळेच्या २० किलोमीटर परिसरातील स्थानिक उमेदवारांना शैक्षणिक अर्हता व अनुभवानुसार प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे. अपर आयुक्त, आदिवासी विकास, नागपूर यांच्या पत्रानुसार, आवश्यकतेनुसार भरावयाची पदे कमी-अधिक करण्याचे, तसेच इतर बाबतींत वेळेवर बदल करण्याचे, भरती प्रक्रिया रद्द करण्याचे, तसेच पदे संपुष्टात आणण्याचे संपूर्ण अधिकार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूर यांना राहील, असे सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) एस. जी. बावणे यांनी कळविले आहे.

 




राज्यातील आदिवासी विकास विभागातील सर्व शासकीय आश्रमशाळांमधील रिक्तपदे भरुन आगामी काळात शैक्षणिक गुणवत्तेच्या प्राधान्यासह विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांवर अधिक भर देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनी लोभानी येथे केले.

 

डॉ.गावित म्हणाले की, राज्यातील शासकीय आश्रमशाळांमध्ये रोजंदारी तत्वावर काम करणाऱ्या 10 वर्षांहून अधिक सेवा बजावलेल्या वर्ग तीन, वर्ग चार कर्मचाऱ्यांना 6 फेब्रुवारी 2023 च्या शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाने घेतला असून या निर्णयांचा राज्यातील 645 कर्मचाऱ्यांना शासन सेवेत नियमित करण्यात आले आहे. आज तळोदा प्रकल्पांतील 244 वर्ग 4 कर्मचाऱ्यांना पालकमंत्री डॉ.गावित यांच्या हस्ते कायम नियुक्तींचे आदेशाचे वाटप करण्यात आले. या सर्व कर्मचाऱ्यांना किमान वेतनस्तरावर वेतननिश्चिती करुन लाभ मिळणार असून कर्मचाऱ्यांना सेवाज्येष्ठता नियमितीकरणाच्या दिनांकापासून लागू करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

 

यावेळी खासदार डॉ.हिना गावित, आमदार आमश्या पाडवी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मान्यवरांचे आदिवासी पारंपारिक ढोल वादन व नृत्याने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, तळोदा अंतर्गत येणाऱ्या आश्रम शाळांमध्ये रोजंदारी तत्त्वावर काम करणाऱ्या वर्ग चार प्रकारच्या कर्मचाऱ्यांना कायम नियुक्ती आदेशाचे वाटप करण्यात आले.

 

महत्वाचा अपडेट – राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत शाळांमध्ये तब्ब्ल ६ हजार ६९० (४१%) पदे रिक्त आहेत. सर्व आश्रमशाळांमध्ये १६ हजार ४४३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९ हजार ५५३ (५९%) पदे भरली गेली. रिक्त पदांमध्ये शिक्षक व मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहे. त्याबद्दल तपशीलवार माहिती खाली देण्यात आली आहे… 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यातील आश्रमशाळांमधील रिक्त पदे मागील अनेक वर्षांपासून भरण्यात आलेली नाहीत. सरकारच्या तसेच अनुदानित आश्रमशाळांमधील आदिवासी बालकांच्या मृत्यूसाठी हे महत्त्वाचे कारण असले तरीही जे कर्मचारी सध्या आश्रमशाळेमध्ये जे शिक्षक, कर्मचारी कार्यरत आहे ते त्याच आश्रमशाळांसाठी काम करतात का, याची तातडीने छाननी होण्याची गरज आहे. राजकीय दबावामध्ये असलेल्या आश्रमशाळांमध्ये नियुक्त असलेले असंख्य कर्मचारी हे राजकीय पक्षांच्या वेगवेगळ्या कामांसाठी जुंपले जातात. ज्या आश्रमशाळांमध्ये शिक्षक मिळत नाहीत, अशी सातत्याने ओरड केली जाते तिथे अतिरिक्त शिक्षक असलेल्या शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती का केली जात नाही, याचाही गांभीर्याने विचार करण्याची गरज व्यक्त होत आहे.

Maha Ashram School Bharti 2023 – Vacancy Details

राज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांसाठी ४९७ शासकीय आश्रमशाळा कार्यरत असून या सर्व आश्रमशाळांमध्ये १६ हजार ४४३ पदे मंजूर आहेत. त्यापैकी ९ हजार ५५३ (५९%) पदे भरली गेली असून ६ हजार ६९० (४१%) पदे रिक्त आहेत. शिक्षक व मुख्याध्यापकांची ७ हजार ३३८ पदे मंजूर असून त्यापैकी ४ हजार ६०७ पदे भरली आहेत. तर दोन हजार ७३१ पदे रिक्त आहेत.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १ हजार ७०८ पदे मंजूर असून त्यापैकी १ हजार १९२ पदे भरली आहेत, तर ५१६ पदे रिक्त आहेत. राज्यात ५४० अनुदानित आश्रमशाळांमध्ये २ लाख ४२ हजार ७१६ विद्यार्थी असून त्यामध्ये १५ हजार ७१३ पदे मंजूर आहेत. यापैकी १४ हजार पदे भरली असून ९५४ पदे रिक्त आहेत

शिक्षक मुख्याध्यापकांची पदे भरली असून वर्ग चारमध्ये समाविष्ट असलेल्या कर्मचाऱ्यांची ७.२३ टक्के पदे मंजूर आहेत. आश्रमशाळांमधील आदिवासी बालकांचे मृत्यू या संवेदनशील व गंभीर विषयावर सरकारने त्यांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. हे मृत्यू होऊ नयेत, आश्रमशाळांची परिस्थिती सुधारावी, येथील रिक्त पदे भरली जावीत याबाबत सरकारची भूमिका काय आहे यासंदर्भात विचारणा करण्यासाठी आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांच्या सातत्याने संपर्क केल्यानंतरही प्रतिसाद मिळाला नाही. गंभीर समस्येकडे डोळेझाक आश्रमशाळांमधील रिक्तपदांचा मुद्दा मांडला की जीव गमावलेल्या आदिवासी बालकांच्या गंभीर समस्येकडे डोळेझाक केली जाते, असा अनुभव बालहक्क कार्यकर्ते मांडतात. ‘या शाळांमधील शिक्षणाची गुणवत्ता सुमार आहे.

 


Maha Tribal Ashram School Bharti 2023

Tribal Ashram School Bharti 2023: Action will be taken soon to fill the 14,000 vacant posts of various guards in the tribal ashram schools in the state. Regarding the recruitment in the tribal ashram school, after the regular commencement of the ashram school in the academic year 2022-2023, action will be taken to fill these posts with the approval of the finance department. Further details are as follows:-

राज्यातील आदिवासी आश्रमशाळातील (Tribal Ashram School) विविध पहारेकरी आदी रिक्त असलेली १४ हजार पदे (Fourteen thousand vacant post) भरण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल, अशी माहिती आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी (k c padvi) यांनी आज विधान परिषदेत दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Tribal Ashram School Vacant Post

राज्यातील आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळांना मागील दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या भोजन आणि शैक्षणिक सुविधा आदींवर होणाऱ्या परिणामासंदर्भात विधान परिषद सदस्य डॉ. सुधीर तांबे (dr sudhir tambe), डॉ. रणजित पाटील आदींनी लक्षवेधी सूचना मांडली होती. आदिवासी विकास मंत्री पाडवी यांनी याबाबत सांगितले की, आदिवासी आश्रमशाळातील पदभरतीबाबत २०२२-२०२३ या शैक्षणिक वर्षात आश्रमशाळा नियमित सुरू झाल्यानंतर ही पदे वित्त विभागाच्या मान्यतेने भरण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यात येईल. तसेच अनुदानित आश्रमशाळातील शिक्षकांचे मानधन ९०० रुपयांवरुन १५०० रुपये करण्यात आल्याचे ते म्हणाले.

  • आदिवासी विकास विभागातील शिक्षणासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले.
  • नाशिक आयुक्त कार्यालयांतर्गत एकूण २१० अनुदानित आश्रमशाळा कार्यरत आहेत.
  • सद्यस्थितीत प्राप्त प्रस्तावांपैकी सर्व आश्रमशाळांचे २०१९-२०२० (अंतिम) अनुदान निर्धारण झालेले आहे.
  • सद्यस्थितीत अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर (BDS) परिक्षण अनुदानासाठी तरतूद उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड