भारतातील आघाडीची औषधनिर्माता कंपनी टॉरंट फार्मास्युटिकल्सने बड्डी (हिमाचल प्रदेश) येथील युनिटसाठी गुणवत्ता नियंत्रण (QC) आणि गुणवत्ता खात्री (QA) विभागात भरती सुरू केली आहे. हृदयविकार, मेंदूविकार, पचनसंस्था, वेदनाशमन आणि मधुमेहावर प्रभावी औषधे तयार करणाऱ्या टॉरंट फार्माने संशोधन, दर्जेदार उत्पादन आणि आंतरराष्ट्रीय मार्केटिंगच्या जोरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या कमानी मध्ये विविध पदांची हि भरती म्हणजे सुवर्णसंधीच आहे. येथी कर्मचाऱ्यांना विविध लाभ मिळत असतात. या भरती संदर्भातील पूर्ण माहिती आणि लिंक आम्ही खाली दिलेली आहे.

सध्या टॉरंट फार्मा युनिटमध्ये काम करण्यासाठी M.Sc., B.Pharm किंवा M.Pharm शिक्षण घेतलेले, तसेच २ ते ८ वर्षांचा अनुभव असलेले उमेदवार शोधत आहे. रेग्युलेटरी प्लांटचा अनुभव असलेल्यांना विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. इच्छुक उमेदवारांनी २७ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९:३० ते दुपारी २:३० दरम्यान टॉरंट फार्मा, बड्डी (Baddi University जवळ, भुड गाव, मखनू माजरा, बड्डी, सोलन, हिमाचल प्रदेश) येथे वॉक-इन इंटरव्ह्यूसाठी उपस्थित राहावे.
उमेदवारांनी बायोडेटा, पासपोर्ट साईज फोटो, मागील नोकरीचा पगार तपशील (CTC ब्रेकअप), मूळ शैक्षणिक आणि अनुभव प्रमाणपत्रे बरोबर आणावीत. वॉक-इनला उपस्थित राहू न शकणाऱ्या उमेदवारांनी आपला बायोडेटा ई-मेलद्वारे [email protected] या पत्त्यावर पाठवावा किंवा 9805508451 या क्रमांकावर संपर्क साधावा.
आणि हो मित्रानो, टॉरंट फार्मा थर्ड पार्टी रिक्रूटमेंट एजन्सीजचा वापर करत नाही आणि कोणतीही फी आकारली जात नाही, त्यामुळे फसवणुकीपासून सावध रहा. उत्तम करिअरची संधी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक अत्यंत चांगली संधी आहे.
अधिकृत वेबसाईट आणि बायोडाटा पाठवण्याची लिंक
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















