एकेकाळी कारभारातील काटेकोरपणा आणि भरभराटीसाठी ओळखली जाणारी ठाणे महापालिका सध्या गंभीर कर्मचाऱ्यांच्या तुटवड्याला सामोरी जात आहे. ठाणे महानगरपालिकेच्या एकूण १०,८८३ मंजूर पदांपैकी तब्बल ५,२३५ पदे रिक्त असून, उर्वरित ५,६१८ पदांवरील कर्मचारी आणि अधिकारी यांच्यावर अतिरिक्त कामाचा ताण वाढत आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या निवृत्तींमुळे महापालिकेच्या यंत्रणेवर कामाचा ताण अधिकच वाढला आहे.

नवीन भरती प्रक्रिया गेल्या अनेक वर्षांपासून राबवली गेली नसल्यामुळे ही रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सहाय्यक आयुक्त, प्रभाग अधिकारी, अभियंते, लिपिक, शिक्षक, शिपाई अशा सर्व श्रेणीतील कर्मचारी या रिक्ततेचा फटका बसत आहे. यातून प्रशासनातील अनेक कामे रखडत असून नागरिकांच्या सेवांवरही याचा प्रत्यक्ष परिणाम होताना दिसतो आहे.
महापालिकेच्या मुख्यालयासह नऊ प्रभाग समिती कार्यालये, महापालिकेच्या मालकीची रुग्णालये व विविध सेवा विभाग या सर्व ठिकाणी कर्मचारी तुटवड्याचा प्रशासकीय अडथळा जाणवतो. विशेष म्हणजे, रिक्त पदे भरली नसतानाच दर सहा महिन्यांनी सुमारे २५० कर्मचारी निवृत्त होत आहेत. २०२५ च्या पहिल्या सहामाहीतच वर्ग २ चे २०, वर्ग ३ चे ८५ आणि वर्ग ४ चे १४५ कर्मचारी निवृत्त झाले आहेत.
त्यानंतरच्या काळात ही निवृत्ती प्रक्रिया वेग घेत असल्याने, सध्याच्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या मूळ जबाबदाऱ्यांव्यतिरिक्त इतरही अतिरिक्त जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. यामुळे कामाचा दर्जा, गती आणि सेवा पोच यावर परिणाम होतो आहे. प्रशासकीय अकार्यक्षमता वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
यापूर्वी काही शिक्षक आणि लिपिकांना पदोन्नती देण्यात आली होती, मात्र त्या प्रक्रियेमुळे केवळ जागा बदलल्या गेल्या; नवीन पदभरती करण्यात आली नाही. परिणामी, रिक्त जागा भरल्याचा जो मूळ हेतू होता, तो पूर्ण झालाच नाही. हे कर्मचारी देखील आता निवृत्त होत चालल्याने रिक्त जागांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे.
ठाणे महापालिका ही मुंबई उपनगरातील एक महत्त्वाची संस्था असून ती संपूर्ण शहरातील पायाभूत सुविधा, आरोग्य सेवा, शिक्षण, स्वच्छता इत्यादी सेवा पुरवते. इतक्या मोठ्या यंत्रणेचा कारभार निम्म्या कर्मचाऱ्यांवर चालवणे म्हणजे प्रशासनासाठी एक मोठं आव्हान ठरत आहे. नागरी सेवांमध्ये विलंब, तांत्रिक त्रुटी, सेवा दर्जामध्ये घसरण अशा समस्या दिसून येत आहेत.
शहरातील नागरीक, कर्मचारी संघटना आणि सामाजिक कार्यकर्ते महापालिकेकडे वारंवार भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी करत आहेत. आता ही गरज फक्त मागणीपुरती राहिली नसून, ती प्रशासनासाठी एक तातडीची कृती ठरली आहे. जर त्वरित भरतीची प्रक्रिया हाती घेतली नाही, तर ठाणेकरांना मूलभूत नागरी सेवा मिळविण्यासाठी देखील संघर्ष करावा लागू शकतो.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















