आताच प्राप्त माहिती नुसार एक महत्वाचा अपडेट समोर आला आहे, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत राज्यातील दहा लाख लाभार्थ्यांना पहिला हप्ता, जवळपास १५०० कोटी रुपये, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते एका क्लिकवर वाटप केला जाणार आहे. पुण्यातील १९ हजार लाभार्थ्यांना यामधून अंदाजे ३० कोटी रुपये मिळणार आहेत. निश्चितच हि आनंदाची बातमी आहे.

शनिवारी (२२ फेब्रुवारी) हा वितरण सोहळा पुण्यातील बालेवाडीमधील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडणार आहे. कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ग्रामपंचायत, तालुका व जिल्हास्तरावर केले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली.
राज्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुका व जिल्हास्तरावर मोठ्या स्क्रीनची व्यवस्था करण्यात आली आहे. आमदार, खासदार आणि मंत्र्यांना या कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रण पाठवण्यात आले आहे. बालेवाडीतील कार्यक्रमाला तब्बल सहा हजार लाभार्थी उपस्थित राहणार आहेत.
या प्रसंगी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक शालिनी कडू उपस्थित होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री यांच्यासह विविध खासदार आणि आमदार देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. राज्यात २० लाख लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात आले असून, त्यातील दहा लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















