Teachers as mentors under MITRA
शिक्षकांच्या अध्यापन कौशल्यांना नवी दिशा देण्यासह शिक्षणाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. देशभरातील अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांच्या ज्ञानाचा उपयोग इतर शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेतर्फे (NCTE) ‘अध्यापन, संशोधन आणि मूल्यमापनासाठी मार्गदर्शन उपक्रम’ (MITRA) सुरू करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे अनुभवी शिक्षकांना मार्गदर्शक, तर मार्गदर्शनाची गरज असलेल्या कार्यरत शिक्षकांना प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी होता येणार आहे.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या संकल्पनेतून हा उपक्रम विकसित करण्यात आला आहे. यामध्ये अनुभवी शिक्षक मार्गदर्शकाची भूमिका बजावतील, तर इतर शिक्षक प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतील. अनुभवी शिक्षकांच्या नियमित मार्गदर्शनाखाली अध्यापन कौशल्ये विकसित करणे, संशोधनाला प्रोत्साहन देणे आणि मूल्यमापनाची क्षमता वाढविणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
एमआयटीआरए (MITRA) उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आता केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) तयारी सुरू केली आहे. या उपक्रमात अनुभवी शिक्षकांचा सहभाग वाढविण्यासाठी सीबीएसईने आपल्या संलग्न शाळांना पात्र शिक्षकांची नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, प्रत्येक शाळेने किमान तीन ते पाच अनुभवी शिक्षकांची मार्गदर्शक म्हणून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
एमआयटीआरए (MITRA) उपक्रमांतर्गत मार्गदर्शक म्हणून काम करण्यासाठी शिक्षकांना काही आवश्यक पात्रता निकष पूर्ण करावे लागणार आहेत. नोंदणी करू इच्छिणाऱ्या शिक्षकांचा किमान आठ वर्षांचा अध्यापनाचा अनुभव असणे आवश्यक आहे. याशिवाय, संबंधित मार्गदर्शन क्षेत्रातील विशेष कौशल्य, प्रभावी संवादकौशल्य, डिजिटल तंत्रज्ञानाचे ज्ञान आणि उपक्रमात योगदान देण्याची तयारी असणेही अपेक्षित आहे. या निकषांची पूर्तता करणारे पात्र शिक्षक एनएमएम पोर्टल https://nmm.ncte.gov.in किंवा संबंधित संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी करू शकतील.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















