शिक्षण विभागाने स्पष्ट सूचना दिली आहे की, शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलवर चुकीची, अपूर्ण किंवा बनावट माहिती दिल्यास, तसेच कागदपत्र पडताळणी दरम्यान गैरप्रकार आढळल्यास उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र ठरणार आहे आणि योग्य ती शिक्षा होणार आहे.

शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्यात उमेदवारांना पवित्र पोर्टलवरून प्राधान्यक्रम नोंदवण्याची संधी दिली आहे. २ मेपर्यंत उमेदवार “मुलाखतीसह” व “मुलाखतीशिवाय” अशा दोन्ही प्रकारांसाठी प्राधान्यक्रम नोंदवू शकतात. दोन्ही पर्याय निवडल्यास, स्वतंत्रपणे प्राधान्यक्रम निश्चित करून ते अंतिम करणं बंधनकारक आहे. अन्यथा, निवडीच्या कोणत्याही टप्प्यावर उमेदवाराचा विचार केला जाणार नाही.
तीन वेळा मिळणार सुधारण्याची संधी
उमेदवारांनी स्वतःची शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता पाहूनच योग्य प्राधान्यक्रम निवडावा. अंतिम प्राधान्यक्रमात चूक झाल्यास उमेदवार शिफारशीसाठी अपात्र ठरू शकतो. अंतिम प्राधान्यक्रमात बदल करायचा असल्यास, उमेदवारांना दिलेल्या मुदतीत ती सुधारणा जास्तीत जास्त तीन वेळा करता येणार आहे.
केवळ पात्र उमेदवारांनाच प्रवेश
या प्रक्रियेत फक्त स्व-प्रमाणपत्र पूर्ण, दुरुस्त आणि प्रमाणित केलेल्या उमेदवारांनाच सहभागी होता येणार आहे. रिक्त जागा, इयत्ता गट, विषय, आरक्षण आणि चाचणी गुण लक्षात घेऊन ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















