फ्रेशर्सना नोकरीची मोठी संधी; TCS करणार 40 हजारांपेक्षा जास्त तरुणांची भरती

TCS Jobs 2021

TCS Jobs 2021 Details 

TCS Jobs 2021 : TCS, the country’s largest software exporter, has made an important decision. A senior official of the company said that more than 40,000 freshers will be offered jobs on campus during the financial year 2021-22. Further details are as follows:-

देशाच्या सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर कंपनी टीसीएसच्या (TCS) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, कंपनी 2021-22 या आर्थिक वर्षात 40 हजाराहून आधीक फ्रेशर्सची नेमणूक करणार आहे. टीसीएसचे जागतिक मानव संसाधन प्रमुख मिलिंद लक्कड़ यांनी पत्रकारांना सांगितले की, पाच लाखाहून अधिक कर्मचारी असलेल्या खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपनीने मागील वर्षी कॅम्पसमधून 40 हजार पदवीधरांची भरती केली होती आणि यावेळी ही संख्या अधिक असेल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

ते म्हणाले की, कोविड 19 मुळे सर्व देशभर असलेल्या साथीच्या आजाराशी संबंधित निर्बंधांमुळे भरती करण्यात काहीच अडचण येणार नाही. मागील वर्षी देखील 40 हजार लोकांना भरती केलं गेलं होतं. त्यामध्ये एकूण 3.60 लाख नवीन विद्यार्थी प्रवेश परीक्षेत उपस्थित होते.

लक्कड़ यांनी पत्रकारांना सांगितले, “आम्ही गेल्या वर्षी भारतातल्या परिसरातून 40 हजार लोकांना कामावर घेतले होते. यावर्षी आम्ही 40 हजार किंवा त्याहून अधिक लोकांना नोकरी देऊ.” यावर्षी भरती प्रक्रिया वेगाने होईल, असेही ते म्हणाले.


TCS 40000 Vacancies 2020 – कोरना लॉकडाउनमुळे पगार कपात आणि कामगार कपातीच्या अनेक बातम्या गेल्या काही दिवसांपासून येत आहेत. या संकट काळातील सर्वात चांगली बातमी आता समोर आली आहे. देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सल्टसी सर्व्हिसेसने गेल्या वर्षा प्रमाणे या वर्षी देखील नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. TCS कॅम्पस इंटरव्ह्यूच्या माध्यमातून ४० हजार भरती करणार आहे. या कंपनीने फक्त भारतातच नव्हे तर अमेरिकेत देखील रोजगार देणार असल्याची योजना तयार केली आहे.

टीसीएस अमेरिकेत दोन हजार लोकांना काम देणार आहे. विशेष म्हणजे ही संख्या गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत दुप्पट आहे. याचा उद्देश एच-१बी आणि एल-१ वर्क व्हिसावरील अवलंबित्व कमी करण्याचा आहे. अमेरिकेतील हे दोन प्रकारचे व्हिसा मिळवणे गेल्या काही दिवसांपासून अवघड होत चालले आहे.

करोनामुळे जून महिन्यात संपलेल्या पहिल्या तिमाहीत टीसीएसच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. यानंतर देखील कंपनीने ४० हजार लोकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. टीसीएसचे इव्हीपी आणि ग्लोबल एचआर हेड मिलिंद लक्कड यांनी सांगितले की, नव्याने सुरुवात करण्याच्या आमच्या धोरणात कोणताही बदल झालेला नाही. भारतात आम्ही ४० हजार रोजगार देणार आहोत. ही संख्या ३५ हजार ते ४५ हजाराच्या दरम्यान असू शकते. हा एक टेक्टिकल कॉल असेल. कंपनीला अपेक्षा आहे की चालू आर्थिक वर्षातील दुसऱ्या सहा महिन्यात व्यवसाय पुन्हा रूळावर येईल.
टीसीएस अमेरिकेतील इंजिनिअर बरोबरच टॉपच्या १० बिझनेस स्कूलमधून पदवीधरांना भरती करून घेणार आहे. टीसीएस बिझनेस रोलसाठी फ्रेशर आणि अनुभवी लोकांना संधी देणार आहे. लक्कड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही गोष्टी आमच्यासाठी नवी नाही. कंपनी २०१४ पासून २० हजारहून अधिक अमेरिकनची भरती केली आहे.

टीसीएसने गेल्या वर्षी ४० हजार जणांची कॅम्पस भरती केली होती. हे फ्रेशर जुलैच्या मध्यापर्यंत कंपनीत काम सुरू करतील. यातील ८७ टक्के आधीपासूनच लर्निंग प्लॅटफॉर्मवर काम करत आहेत. ८ हजार ते १० हजार जणांना प्रत्येक आठवड्याला ऑनलाइन काम दिले जाते. भरती झालेल्यापैकी ८ हजारहून अधिक लोकांनी एक किंवा दोन डिजिटल सर्टिफिकेशन पूर्ण केले आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

21 Comments
  1. Nitin.rawate says

    Mala job pahije lavkar

  2. Pushpa Vitthal bhurkunde says

    Mala pn khup garj ahe job chi plz mala job dya

  3. Vikram keshav badame says

    I am very keen for this job and if I have to fill the form etc. for this job, tell me which side to fill it on.

  4. Suraj nimbalkar says

    Mala job pahje lavkar kontaa pan chali

  5. Sanjeev says

    Cleaning supervisor post Mumbai

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड