शिक्षण खात्यात तब्बल ८३८ शिक्षक पदे रिक्त; भरती प्रक्रिया लवकरच | Goa Shikshak Bharti 2025

Goa Shikshak Bharti 2025

Goa Shikshak Bharti 2025 

राज्यातील शासकीय प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये सध्या ८३८ शिक्षक व मुख्याध्यापकांची पदे रिक्त असल्याचे मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत स्पष्ट केले. ही रिक्तता शिक्षण व्यवस्थेसाठी चिंतेची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

विधानसभेत आमदार वेंझी व्हिएगस यांनी विचारलेल्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, काही महत्त्वाच्या पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शिक्षण क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान व पद्धती राबवण्याचे प्रयत्न सुरू असतानाच राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांची कमतरता आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

रिक्त पदांचा तपशील असा आहे:

  • प्राथमिक शाळांमध्ये: ३४७ शिक्षक व १८ प्रशिक्षित इंग्रजी शिक्षक

  • माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर: २०८ सहाय्यक शिक्षक, २० चित्रकला शिक्षक, ३ संगणक शिक्षक, २११ शिक्षक ग्रेड-१/सहाय्यक जिल्हा शिक्षण निरीक्षक

  • मुख्याध्यापक पदे: २६

मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले की, रिक्त पदे भरण्यासाठी शासन प्रयत्नशील असून लवकरच भरती प्रक्रियेस गती दिली जाणार आहे. राज्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ही भरती अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 


Goa Shikshak Bharti 2025 

सरकारी प्राथमिक, माध्‍यमिक तसेच उच्च माध्‍यमिक शाळांमध्‍ये शिक्षकांच्‍या ८३८ जागा रिक्त आहेत. तर, ५९२ शिक्षक कंत्राटी किंवा रोजंदारीवर शिकवत असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेतील लेखी प्रश्‍नाला दिलेल्‍या उत्तरातून समोर आले आहे. आमदार व्‍हेंझी व्‍हिएगश आणि विजय सरदेसाई यांनी यासंदर्भातील प्रश्‍न विचारले होते. सरकारी प्राथमिक, माध्‍यमिक आणि उच्च माध्‍यमिकमध्‍ये शिक्षकांच्‍या किती जागा रिक्त आहेत आणि त्‍या भरण्‍यासाठी सरकारकडून कशापद्धतीने प्रक्रिया सुरू आहे, असे प्रश्‍न आमदार व्‍हिएगश यांनी विचारले होते. त्‍यावरील उत्तरात सरकारी प्राथमिक शाळांत शिक्षकांची ३४७, प्रशिक्षित इंग्रजी शिक्षकांची १४, सहाय्‍यक शिक्षकांची २०८, चित्रकला शिक्षकांची २९, कॉम्‍प्‍युटर शिक्षकांची ३, सहाय्‍यक जिल्‍हा शिक्षण निरीक्षकांची २११ आणि उच्च माध्‍यमिकमध्‍ये मुख्‍याध्‍यापकांची २६ पदे रिक्त असल्‍याचे मुख्‍यमंत्री डॉ. सावंत यांनी म्‍हटले आहे.

सरकारी शाळांतील शिक्षकांची रिक्त पदे भरण्‍याची प्रक्रिया सरकारकडून सुरू आहे. सरकारी प्राथमिकमधील ३१८ शिक्षक, १४ प्रशिक्षित इंग्रजी शिक्षक तसेच ११८ सहाय्‍यक शिक्षक भरण्‍यासाठीचा प्रस्‍ताव शिक्षण खात्‍याने कर्मचारी भरती आयोगाकडे पाठवला आहे. तर, सहाय्‍यक जिल्‍हा शिक्षण निरीक्षकांच्‍या १११ पदांच्‍या भरतीचा प्रस्‍ताव लोकसेवा आयोगाकडे पाठवण्‍यात आला आहे. २१ मुख्‍याध्‍यापकांच्‍या जागी थेट भरतीचा प्रस्‍ताव लोकसेवा आयोगाकडे असून, त्‍यावरील प्रक्रिया सुरू असल्‍याचेही मुख्‍यमंत्र्यांनी उत्तरात नमूद केले आहे.

 

आमदार विजय सरदेसाई यांनी एका प्रश्‍नात सरकारी प्राथमिक, माध्‍यमिक आणि उच्च माध्‍यमिक अशा एकूण ८१३ सरकारी शाळांमध्‍ये किती शिक्षक कायमस्वरूपी, कंत्राटी आणि रोजंदारीवर काम करीत आहेत, असा प्रश्‍न विचारला होता. त्‍यावरील उत्तरातून सरकारी शाळांत ५९२ शिक्षक कंत्राटी किंवा रोजंदारीवर शिकवत असल्‍याचे समोर आले आहे. सरकारी शाळांत १,५८५ शिक्षक कायमस्वरूपी, ६५ कंत्राटी आणि ५२७ रोजंदारीवरील शिक्षक असल्‍याचे मुख्‍यमंत्र्यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

 


राज्यातील सरकारी आणि अनुदानित विद्यालयांमध्ये शिक्षक भरती करण्यापूर्वी शिक्षण खात्याने विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्यात्मक माहिती संकलित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी विद्यालयांकडून ही माहिती मागवण्यात आली असून, शिक्षक संख्या अपुरी असलेल्या शाळांना नवीन शिक्षक भरतीसाठी परवानगी दिली जाणार आहे.

या संदर्भात आमदार एल्टन डिकोस्टा यांनी विधानसभेत लेखी प्रश्न विचारला होता, ज्याला उत्तर देताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शिक्षणमंत्री या नात्याने स्पष्टीकरण दिले.

नवीन शैक्षणिक धोरण आणि शिक्षक भरती

राज्यात नवीन शैक्षणिक धोरण (NEP) लागू करण्याच्या प्रक्रियेत बदल करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिक्षण खात्याने शिक्षकांच्या उपलब्धतेबाबत आकडेवारी गोळा करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • कला आणि संगीत शिक्षकांची भरती गोवा समग्र शिक्षा अभियानांतर्गत केली जाणार आहे.
  • शिक्षकांसाठी विशेष कार्यशाळा आणि प्रशिक्षण कार्यक्रम शिक्षण खाते आणि SCERT मार्फत राबवले जात आहेत.

राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी

राज्यात NEP 2020 लागू करण्याचे काम टप्प्याटप्प्याने सुरू आहे—

  • २०२३-२४: फाऊंडेशन स्टेज मध्ये NEP ची प्राथमिक ओळख
  • २०२४-२५: नववीच्या वर्गांमध्ये NEP लागू
  • २०२५-२६: दुसरी, तिसरी (प्रॉपरेटरी स्टेज), सहावी (मिडल स्टेज) आणि दहावी साठी धोरणाची अंमलबजावणी

राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अंमलबजावणीसाठी २०२४-२५ मध्ये तब्बल ८ कोटी २० लाख रुपयांचा खर्च झाल्याचे शिक्षणमंत्री डॉ. सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

राज्यातील विद्यालयांमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता असून, त्याआधी सर्व शाळांची विद्यार्थी-शिक्षक संख्येची आकडेवारी निश्चित केली जाणार आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड