खुशखबर!! TCS या मध्ये ४२,००० पदांची मेगाभरती! जाणून घ्या अर्ज प्रक्रिया! – TCS Hiring Boom !
TCS Hiring Boom !
मित्रांनो, सध्या IT क्षेत्रात सध्या मंदीचं सावट असलं तरीही टीसीएसनं एक दिलासा देणारी बातमी दिलीय!
देशातली सगळ्यात मोठी IT कंपनी TCS या नवीन आर्थिक वर्षात जवळपास ४२,००० प्रशिक्षणार्थी भरती करणार असल्याचं सांगितलंय. म्हणजेच कॉलेजमधून बाहेर पडलेल्यांना किंवा फ्रेशर्सना ही मोठी संधी आहे.
पदोन्नतीचा पाऊस आणि नोकरीची तयारी
टीसीएसचे HR प्रमुख मिलिंद लक्कड यांनी सांगितलं की, कंपनीनं मागचं वर्ष (2024-25) एकूण १.१ लाख लोकांना प्रमोशन दिलं. आणि नवीन वर्षातही भरती थांबवायची नाहीये, असाच निर्णय घेतलाय.
➡️ मागच्या वर्षात जितकी भरती झाली, तितकीच यंदाही होणार, म्हणजे संधी जबरदस्त आहे!
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥पदवीधरांनासाठी मोठी भरती सुरु! MPSC च्या द्वारे 3587 जागांसाठी मोठी भरती सुरु!
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
तीन प्रकारची भरती – निंजा, डिजिटल आणि प्राइम
TCS मध्ये भरतीसाठी एक “नॅशनल क्वालिफायर टेस्ट” घेतली जाते. यामध्ये परीक्षेच्या निकालावरून उमेदवारांना तीन गटांमध्ये सामावून घेतलं जातं:
- निंजा – बेसिक एंट्री लेव्हल
- डिजिटल – थोडं अधिक कौशल्य असलेल्यांसाठी
- प्राइम – उच्च दर्जाच्या उमेदवारांसाठी
डिजिटल हायरिंगमध्ये वाढ
टीसीएसने यावेळी ४०% भरती डिजिटल क्षेत्रासाठी केली. मागच्या वर्षी हेच प्रमाण १७% होतं. याचा अर्थ – टेक्नॉलॉजी आणि डिजिटल कौशल्य असणाऱ्यांना प्रचंड मागणी आहे!
वेतनवाढ थांबवली, पण व्हेरिएबल पगार मिळणार
- यंदाच्या वर्षी कंपनीनं एप्रिलमधली वेतनवाढ तात्पुरती थांबवली आहे.
- पण तरीही ७०% कर्मचाऱ्यांना पूर्ण व्हेरिएबल पगार मिळणार आहे.
- उरलेल्या ३०% कर्मचाऱ्यांना कामगिरीवर आधारित रक्कम दिली जाणार.
थोडा नफा कमी, तरीही भरती सुरूच
मार्च 2025 तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा १.७% ने कमी झाला (१२,२२४ कोटी रुपये), पण टीसीएसचं म्हणणं आहे – “आमचं नोकरीचं धोरण चालूच राहणार!”
थोडक्यात – TCS मध्ये भरतीची मोठी लाट येतेय!
- फ्रेशर्सना सुवर्णसंधी
- डिजिटल क्षेत्राला प्राधान्य
- वेतनवाढ थांबली तरी भरती चालू
- करिअरसाठी TCS अजूनही हॉट डेस्टिनेशन