JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

नोकर भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सीकडेच, TCS राबविणार भरती प्रक्रिया! – TCS Conduct Recruitment Process

TCS Conduct Recruitment Process  – सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेतील सरळ सेवा भरती प्रक्रियेअंतर्गत टाटा कन्सल्टन्सीकडे देण्याचा कार्यदिश आज देण्यात आला. स्थायी समितीच्या सभेत सर्वानुमते निर्णय झाला. सभापती अतुल माने यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. बैठकीत भरती प्रक्रियेसाठी कंपनीसोबत करारपत्र करण्यास आणि पदभरतीच्या खर्चास मंजुरी देऊन हा ठराव अंतिम मान्यतेसाठी १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या महासभेकडे पाठवण्याची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे आगामी महासभेत या विषयावरून वादळी चर्चा होईल.

TCS Conduct Recruitment Process

महापालिकेतील एकूण ८२ रिक्त पदांपैकी ४१ तांत्रिक पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय प्रशासकीय काळात झाला होता. या प्रस्तावावर सभेत सविस्तर चर्चा झाली, कंपनीचा प्रति उमेदवार ७९७ रुपये खर्च आणि इतर शासकीय-निमशासकीय संस्थांमधील भरतीचा अनुभव विचारात घेऊन स्थायी समितीने प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला. मात्र, प्रशासनाने हा विषय टप्याटप्प्याने आणल्यामुळे महासभा विरुद्ध स्थायी समिती असा राजकीय पेच निर्माण होण्याची चिन्हे आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्त्यांचे पंचवर्क, विसर्जन कुंडांची निर्मिती आणि परिस्स्राच्या स्वच्छतेचा आढावा घेण्यात आला. नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून महापालिकेच्या विसर्जन व्यवस्थेचा लाभघ्यावा, असे आवाहन सभापतींनी केले. शहर परिसरात वाढलेल्या चिकनच्या गाड्यांवरून उघड्यावर कचरा टाकला जात असल्याने भटक्या कुत्र्यांची संख्या वाढत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

या पार्श्वभूमीवर उघड्यावर कचरा टाकणाऱ्या विक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आणि हॉटेल वेस्ट संकलन करणाऱ्या कंपनीने संध्याकाळच्या वेळी कचरा तातडीने उचलण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले. तसेच मोकाट जनावरे व भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश प्रशासनाला दिले. महापालिका क्षेत्रातील प्रत्येक नगरसेवकाच्या जनरल फंडातील १५ लाख रुपयांच्या निधीतून होणारी उद्याने व इतर विकासकामे (एकूण किंमत सुमारे १८ ते २० कोटी रुपये) यांच्या निविदा प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला. सर्व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून येत्या महिनाभरात प्रत्यक्ष कामांना सुरुवात करण्याचे निर्देश सभापती माने यांनी दिले.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड