JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

महत्त्वाचे – प्रशिक्षक होणार आता तालुका क्रीडा अधिकारी!! Taluka Krida Adhikari Bharti Maharashtra

Taluka Krida Adhikari Bharti 2022

Taluka Krida Adhikari Bharti: The Latest update for Taluka Krida Adhikari Bharti Maharashtra 2022. There are a total of 80 Taluka Sports Officer posts fill in 15 days. For more details about Taluka Sports Officer Bharti 2022, Taluka Sports Officer Recruitment 2022, Taluka Krida Adhikari Recruitment 2022, visit our website www.MahaBharti.in. Further details are as follows:-

राज्याचे माजी क्रीडामंत्री सुनील केदार यांनी 54 खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा प्रश्न महिनाभरात मार्गी लावणार असे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी कामाला वेगही दिला होता. मात्र, दरम्यानच्या काळात सत्तांतर झाले. महाराष्ट्राचे नवीन क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी 15 दिवसांत 80 तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या जागा भरणार असल्याची माहिती नुकतीच विधान परिषेद दिली.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

त्या पार्श्वभूमीवर राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याशी दै. ‘सामना’ने संपर्क साधला असता त्यांनीही याला दुजोरा दिला आहे. दै. ‘सामना’ने तालुका क्रीडा अधिकारी आणि 54 खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा प्रश्नाचा वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे.

श्रेणीनुसार प्रशिक्षक भरण्याचा प्रस्ताव

  • महाराष्ट्रातील 359 तालुक्यांसाठी सध्या 20 तालुका क्रीडा अधिकारी आहेत.
  • त्यामुळे महाराष्ट्र राज्य क्रीडा व युवक सेवा संचालनालयाकडे असलेल्या प्रशिक्षकांना पदोन्नतीने तालुका क्रीडा अधिकारी बनविण्यात येणार आहे.
  • या रिक्त जागा खेळाडूंच्या थेट नियुक्ती योजनेतून भरण्याचा प्रस्ताव क्रीडा संचालनालयाने राज्याच्या क्रीडा सचिवांकडे पाठविला आहे.
  • खेळाडूंच्या थेट नियुक्त्यांसाठी 2017-18 साली प्रस्ताव मागविण्यात आले होते.
  • त्यातील 54 खेळाडूंची यादी तयारही केलेली आहे.
  • मात्र, काही खेळाडू विशिष्ट खात्यातील पदासाठी अडून बसल्याने खेळाडूंच्या थेट नियुक्तीचा विषय रखडला होता.
  • तत्कालीन राज्य क्रीडामंत्री सुनील केदार यांनी खेळाडूंना आधी पाच वर्षे क्रीडा खात्यातच नोकरी करावी लागेल, असा मध्यम मार्ग काढला होता.
  • त्या पार्श्वभूमीवर आता खेळाडूंना प्रशिक्षकपदी नेमण्याच्या हालचाली आता सुरू झाल्या आहेत.
  • या 54 खेळाडूंपैकी कोणी कुठल्या दर्जाच्या क्रीडास्पर्धेत पदक जिंकले आहे त्यानुसार प्रशिक्षकांची श्रेणी तयार करून त्यांना नोकरी दिली जाणार असल्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सांगितले.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड