मतदान केंद्रांवर विद्यार्थी ‘स्वयंसेवक’ म्हणून नेमण्यात येणार !! विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचे निर्देश शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले | Swayamsevak Appointment at Maharashtra Polling Station
Swayamsevak Appointment at Maharashtra Polling Station
Swayamsevak Appointment at Maharashtra Polling Station
Swayamsevak Appointment at Maharashtra Polling Station: मतदान केंद्रांवर विद्यार्थी स्वयंसेवकांची सहभागिता एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरला आहे. विद्यार्थी स्वयंसेवकांना विविध जबाबदाऱ्या सोपवून मतदान प्रक्रियेला सहाय्य करण्याचा हा उद्देश आहे. या कार्यक्रमाच्या अंतर्गत दिलेल्या काही प्रमुख जबाबदाऱ्या आणि सहभागाच्या आकडेवारीत काही महत्त्वपूर्ण बाबी खालीलप्रमाणे आहेत. या संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
यावर्षी विधानसभा निवडणूक प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना सहभागी केले जाणार असून त्यांना स्वयंसेवक म्हणून नेमण्यात येणार आहे. हे विद्यार्थी मतदान केंद्रांवर दिव्यांग, वयोवृद्ध, आजारी मतदारांना मदत करणार असून मुख्याध्यापकांनी तात्काळ अशा विद्यार्थ्यांची नियुक्ती करावी, असे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. निवडणूक प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे, हे विशेष. २० नोव्हेंबरला मतदान आहे. या दिवशी प्रत्येक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदार, वयोवृद्ध मतदार, आजारी मतदार यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये याकरिता या विद्यार्थ्यांच्या नियुक्तीचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तशा सूचना जिल्ह्याधिकाऱ्यांच्या बैठकीतही देण्यात आल्या. त्यानुसार मुख्याध्यापकांनी आपल्या शाळेतील इयत्ता ९ ते १२ च्या विद्यार्थ्यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करावी असे आदेश नागपूरच्या शिक्षणाधिकारी रोहिणी कुंभार यांनी दिले. मतदान केंद्रांवर येणाऱ्या अडचणी लक्षात घेता हा प्रयोग करण्यात आल्याची माहिती आहे
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
दोन सत्रांत सेवा
• प्रत्येक मतदान केंद्रावर सकाळी ७ ते १२ पर्यंत दोन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी व दुपारी १२ ते ६ या वेळेत दोन विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी नियुक्त करण्यात येणार आहेत.
• सेवा देणाऱ्या विद्यार्थ्यांची माहितीही निवडणूक विभागाने दिलेल्या लिंकवर मुख्याध्यापकांनी भरायची आहे.
• विद्यार्थ्यांनी स्काऊट गाईड गणवेशात किंवा शालेय गणवेशात स्कार्फ, गॉगल परिधान करून मतदान केंद्रावर उपस्थित राहावे अशा सूचना आहेत. याबाबतचा अहवाल शिक्षणाधिकारी कार्यालयास सादर करावा, अशा सूचना आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार प्रत्येक मतदान केंद्रांवर स्वयंसेवक म्हणून विद्यार्थ्यांची नियुक्ती करायची आहे. यासाठी मुख्याध्यापकांनी त्यांना दिलेल्या लिंकवर विद्यार्थ्यांची माहिती तत्काळ भरून द्यायची आहे. केंद्रांवर मदत म्हणून ही नियुक्ती राहणार आहे. स्काऊट गाईड व अन्य विद्यार्थ्यांना यामुळे निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळेल. राष्ट्रीय कामात सहभाग नोंदवल्याचे प्रमाणपत्रही दिले जाणार आहे
विद्यार्थी स्वयंसेवकांचा सहभाग आणि जबाबदाऱ्या:
जिल्हा | मतदान केंद्रांची संख्या | विद्यार्थी स्वयंसेवकांची संख्या | जबाबदाऱ्या |
---|---|---|---|
पुणे | 150 | 300 | मतदारांना मार्गदर्शन, रांगेतील शिस्त राखणे |
मुंबई | 200 | 400 | ईव्हीएम मशिन्सच्या तपासणीस मदत, मतदार सूची तपासणे |
नागपूर | 120 | 240 | मतदार ओळखपत्र तपासणे, मदत कक्ष चालवणे |
औरंगाबाद | 100 | 200 | मतदान केंद्राची स्वच्छता, सहकार्य राखणे |
सोलापूर | 90 | 180 | रांगेतील वृद्ध व दिव्यांग मतदारांना सहाय्य |
कोल्हापूर | 80 | 160 | मतदारांची माहिती नोंदवणे, मास्क व सॅनिटायझर पुरवणे |
नाशिक | 130 | 260 | मदत कक्ष कार्यरत ठेवणे, ईव्हीएम स्टँडबाय सहाय्य |
विद्यार्थी स्वयंसेवक उपक्रमाचे उद्दिष्टे:
- लोकशाही मूल्यांची जाणीव वाढवणे: विद्यार्थ्यांना मतदान प्रक्रियेची जाणीव करून देणे, तसेच त्यांना त्यात सक्रिय सहभागाची संधी उपलब्ध करून देणे.
- मतदारांना सहाय्य: मतदान केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवणे, ज्यामुळे मतदानाची प्रक्रिया सुलभ होईल.
- विकास कौशल्ये: स्वयंसेवकांच्या नेतृत्व, संपर्क कौशल्य, व शिस्तबद्ध काम करण्याच्या क्षमतांमध्ये सुधारणा करणे.
एकूण सहभाग व परिणाम:
या उपक्रमात महाराष्ट्रभरातील विविध महाविद्यालये आणि शाळांमधील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग पाहायला मिळाला. मतदारांना मदत करणे, त्यांचे अनुभव समृद्ध करणे, आणि लोकशाही प्रक्रियेत त्यांचा हातभार लावणे हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी स्वयंसेवकांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.
Table of Contents