एमफिल,पीएचडीच्या विद्यार्थ्यांना प्रकल्पांसाठी पुन्हा मुदतवाढ

Submission of PhD Mphil Theses

Submission of Phd, Mphil Theses: कोविड – १९ महामारीमुळे विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) एमफिल (M.Phil) आणि पीएचडी (Phd) करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकल्प सादर करण्यासाठी पुन्हा एकदा मुदतवाढ दिली आहे. विद्यार्थ्यांना आता थिसीस सबमीट करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा वेळ मिळाला आहे. यापूर्वी लॉकडाऊन दरम्यान यूजीसीने ३० जून २०२० पर्यंत असलेली थिसीस जमा करण्याची मुदत वाढवून ३१ डिसेंबर २०२० पर्यंत केली होती. आता ती पुन्हा ३० जून २०२१ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

हा अतिरिक्त वेळ उमेदवारांना एव्हिडन्स ऑफ पब्लिकेशन आणि दोन कॉन्फरन्समध्ये उपस्थित राहण्यासाठी देखील दिला जाऊ शकतो. मात्र पीएचडी, एमफिल करणाऱ्या उमेदवारांचा एकूण संशोधन कालावधी मात्र पाच वर्षांचाच राहणार आहे, असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊनमध्ये विद्यापीठे, महाविद्यालये गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना त्यांच्या संशोधनावर विद्यापीठांच्या प्रयोगशाळेत काम करता आलेले नाही, लायब्ररी सेवेचा वापर करता आलेला नाही. या गोष्टी संशोधन प्रकल्प पूर्ण करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण असतात, परिणामी ही मुदतवाढ देत असल्याचे यूजीसीने निवेदनात म्हटले आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोर्स : म. टा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड