मुद्रांक शुल्क विभागात निबंधकांचा पदभार लिपिकाकडे, भरपूर पदे रिक्त! – Nondani mudrank vibhag recruitment 2025
Stamp Department Vacancies 2025
Department of Stamp Duty Bharti 2025 Details | Nondani Mudrank Vibhag Bharti 2025
सह दुय्यम निबंधक यांचा पदभार वरिष्ठ लिपिकाकडे आहे. दोन्ही सह दुय्यम निबंधक कार्यालयांत मंजूर आस्थापनांपैकी निम्मी पदे रिक्त आहेत. यंदा सरकारचे १४४ कोटी रुपयांचे महसूल उद्दिष्ट या कार्यालयांना दिले आहे. दोन्ही कार्यालयांत केवळ एक अधिकारी आणि दोन कर्मचारी अधिकृत असून, अन्य सर्व जण खासगी व्यक्ती काम करीत आहेत. या मुळे सरकारी प्रणाली आपल्या कार्यक्षमतेवर अधुरी ठरत आहे आणि त्रास जण सामान्यास होत आहे. त्या मुळे या विभागात लवकरात लवकर पदभरती करण्याची गरज आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
विदारक चित्र राज्याला सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या जीएसटी विभागानंतर रजिस्ट्री विभागाचा नंबर लागतो. तरीदेखील सरकार या विभागात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत दखल घेत नसल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. अधिकाऱ्यांची वानवा बारामती रजिस्ट्री म्हणजे सह दुय्यम निबंधकांचे दोन कार्यालये आहेत. एका वर्ग दोनमधील सह दुय्यम निबंधकांचा पदभार वरिष्ठ लिपिकाकडे देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात अधिकाऱ्यांची वानवा आहे. नागरिकांना मालमत्ता खरेदी-विक्री करण्यासाठी खासगी व्यक्तींना हात जोडून ‘साहेब काम करा,’ असे म्हणावे लागत आहे. या विभागाने २०२२-२३ या वर्षात सरकारला तब्बल १०० कोटी ५० लाख रुपयांचे उत्पन्न दिले होते. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात या विभागाला १४४ कोटी रुपयांचे ‘टार्गेट’ दिले आहे. डिसेंबर २०२४अखेर ७९ कोटी रुपयांपेक्षा अधिक महसूल सरकारी तिजोरीत जमा झाला; मात्र विभागात अधिकारी, कर्मचाऱ्यांची कमतरता चर्चेचा विषय बनला आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागात आता महसूल विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांची विविध कामांसाठी करार पद्धतीने नेमणूक करण्यात येणार आहे. यामध्ये सहजिल्हा निबंधक वर्ग-१ आणि वर्ग-२, तसेच लेखाधिकारी, सहाय्यक लेखाधिकारी यांचा समावेश आहे. या पद्धतीमुळे शासन नवीन पदभरती करणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागात पुण्यातील असलेल्या राज्य कार्यालयात सह जिल्हा निबंधक वर्ग १ (दोन पदे), सह जिल्हा निबंधक वर्ग २ (दोन पदे), तसेच लेखाधिकारी, सहाय्यक लेखा अधिकारी (१२ पदे) अशी एकूण १६ पदे भरण्यात येणार आहेत. या पदभरतीसाठी शासकीय सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी यांनाच घेण्यात येणार असल्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी कळवले आहे.
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांची करार पद्धतीने भरती होणार असल्यामुळे केवळ मर्जीतील अधिकाऱ्यांचीच नेमणूक होण्याची शक्यता आहे. तसेच पुन्हा या विभागात गैरप्रकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नेमणुकांमुळे नव्याने या विभागात भरती होण्याची शक्यता मावळली आहे.
Stamp Department Vacancies : There are a large number of vacancies in the Registration and Stamp Duty Department. No vacancies have been filled in the Registration and Stamp Duty Department for the last 25 years. So as per the latest news very soon recruitment of Nondani mudrank vibhag recruitment 2023 process 350 Posts will be start soon. Further details are as follows:-
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात भरती प्रक्रिया राबविण्यासाठी बिंदूनामावली निश्चित करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांपासून दुय्यम निबंधकांपर्यंतची सुमारे ३५० पदांची भरती केली जाणार आहे. बिंदूनामावली निश्चित झाल्यानंतर नेमकेपणाने किती जागा भरण्याची गरज आहे, हे लक्षात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
नोंदणी व मुद्रांक निरीक्षक विभागाच्या राज्यातील सर्व जिल्ह्यांतील कार्यालयांमध्ये लिपिकापासून ते दुय्यम निबंधकांपर्यंत अनेक पदे गेल्या काही वर्षांपासून रिक्त आहेत. या पदांमुळे लिपिकांकडे दुय्यम निबंधकांचा अतिरिक्त कार्यभार देण्यात येत आहे. त्यामुळे प्रभारी कार्यभार घेतलेल्या लिपिकांसह अधिकाऱ्यांनी दस्तनोंदणी करताना नियमांचे पालन न केल्याचे अनेक प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने निदर्शनास येत आहेत. त्यातून बेकायदा पद्धतीने दस्तनोंदणी झाल्याची प्रकरणे उघडकीस येऊन संबंधितांवर कारवाईदेखील करण्यात आली आहे. काही पदांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदोन्नती मिळणार आहे. त्यामुळे या पदांवरील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची पदे रिक्त होणार आहेत. काही अधिकारी निवृत्त होत आहेत. परिणामी, ती पदे रिक्त राहू नयेत, याकरिता ही भरतीप्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गेल्या वर्षी ७८, तर यंदा ४९ जागांसाठी भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. तसेच उर्वरित वर्ग तीन आणि चार ही पदेही भरण्यात येणार आहेत. त्याकरिता बिंदूनामावली निश्चित झाल्यानंतर नेमकेपणाने किती जागा भरण्याची गरज आहे, हे लक्षात येणार असल्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.
Nondani mudrank vibhag Bharti 2024
: : मागील अपडेट्स : :
Stamp Department Recruitment 2023
शहरात दहा हजारांहून अधिक बोगस रेरा, तसेच तुकडाबंदी कायद्याचे उल्लंघन करून दस्तांची नोंदणी झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या दस्तनोंदणीद्वारे कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे राज्यातील सुमारे 44 दुय्यम निबंधकपदावरील अधिकार्यांवर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचे महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी निलंबनाची कारवाई केली.
Nondani Mudrank Vibhag Bharti 2023
- पुणे शहरात आजमितीला 27 तर ग्रामीण भागात 21 दुय्यम निबंधक कार्यालये आहेत.
- त्या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात दस्तांची नोंदणी केली जाते. पुण्यासह राज्यात अनेक जिल्ह्यांमधील कार्यालयांमध्ये विविध पदे रिक्त आहेत, तर काही पदांवरील अधिकारी व कर्मचार्यांना पदोन्नती मिळणार आहे.
- त्यामुळे या पदावरील अधिकार्यांसह कर्मचार्यांची पदे रिक्त होणार आहेत.
- काही अधिकारी निवृत्त होत आहेत.
- परिणामी, ती पदे रिक्त राहू नयेत, यासाठी येत्य दोन ते तीन महिन्यातं नऊशे पदे भरण्यात येणार आहेत, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर यांनी दिली.
मागील अपडेट्स :
Registration & Stamp Duty Department Vacancy 2022
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात (registration and stamp duty department) गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. मात्र, ती पदे नेमकी किती रिक्त आहेत, याबाबत विभागच संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे. स्वतः विभागाने प्रकाशित केलेल्या माहितीत देण्यात आलेल्या रिक्त पदांची संख्या आणि माहितीच्या अधिकारात देण्यात आलेल्या रिक्त जागांमध्ये तफावत असल्याचे दिसून आले आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
गेल्या २५ वर्षांपासून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात रिक्त पदांची भरती करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष आहे. काही दिवसांपूर्वी विभागातील पदांबाबत माहिती समोर आली. त्यामध्ये दुय्यम निबंधक (श्रेणी-१) आणि मुद्रांक निरीक्षक या (गट ब)(अराजपत्रित) पदामधील ३९३ जागा तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षक (गट क) या पदाच्या ३९६ जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली.
मात्र, २५ वर्षांपासून ज्या विभागाची पदभरतीच झालेली नाही, त्या विभागात इतकी कमी पदे रिक्त कशी याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्यामुळे सूरज गज्जलवार यांनी माहितीच्या अधिकाराचा अर्ज नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रकाच्या पुणे कार्यालयात सादर केला. मात्र, मिळालेल्या माहितीमुळे हा संभ्रम अधिकच वाढल्याचे दिसून आले. दिलेल्या माहितीनुसार दुय्यम निबंधकांची १३८ तर वरिष्ठ लिपिक आणि पर्यवेक्षकांची (गट क) ४६ जागा रिक्त असल्याची माहिती देण्यात आली. त्यामुळे नेमक्या जागा किती याची माहिती विभागाकडे नाही काय? असा प्रश्न निर्माण होतोय.
Stamp Department Vacancies : मुद्रांक शुल्क विभागात दुय्यम निबंधक गट-ब पदांच्या एकूण ६०० जागा असून त्यापैकी नियमानुसार ३०० जागा स्पर्धा परीक्षा घेऊन भरणे अनिवार्य आहे. MPSC ने 2013 मध्ये या पदभरतीला मान्यता दिली होती. मात्र या पदाचे मागणीपत्रच जाहीर केले जात नाहीत. मुद्रांक शुल्क विभागात दुय्यम निबंधक गट-ब या पदाची स्पर्धा परीक्षेद्वारे भरती केलेली नाही. दुय्यम निबंधक गट-ब हे पद महसूल विभागाच्या दृष्टीने महत्त्वाचे पद आहे.
या पदांची भरती न झाल्याने या विभागावर कामाचा अतिरिक्त ताण वाढत चालला असून अतिरिक्त कार्यभार सोपवून, तात्पुरती पदोन्नती देऊन कार्यभार चालविला जात आहे. सन 1995 मध्ये तत्कालीन महाराष्ट्र दुय्यम सेवा निवड मंडळामार्फत शेवटची स्पर्धा परीक्षेद्वारेे याची भरती झालेली आहे. त्यामुळे या पदाची जाहिरात काढावी, अशी मागणी स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी केली आहे.
यासंदर्भातील अधिक माहिती आम्ही लवकरच प्रकाशित करू…
Table of Contents
नोकरी ची अवशक्यता असल्यास काय करावे कुठे संपर्क करावा.
Nondani mudrank vibhag recruitment 2023 – Latest update published, bahrti process will begin soon..
Thanks sir
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागात ९०० पदांची भरती होणार!
Kadhi form सुटणार