एसटी बँकेची नोकर भरती तातडीने रद्द करा-महामंडळाच्या वर्तुळात खळबळ!

ST Bank Bharti Latest Update

आत्ताच प्राप्त नवीन माहिती नुसार, स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँक, लि. मुंबईने ॲडहॉक व तात्पुरत्या पद्धतीने केलेली अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती ही योग्य व विहित पद्धतीने केली नाही. त्यामुळे ही नोकर भरती त्वरित रद्द करण्याबाबतचे पत्र पुणे येथील सहकारी संस्थांचे अपर निबंधक (प्रशासन) शैलेश कोतमिरे यांनी स्टेट ट्रान्सपोर्ट बँकचे अध्यक्ष तथा महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकांना दिले आहे. या पत्रामुळे एसटी महामंडळाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे. या संदर्भातील पूर्ण बातमी खाली देत आहोत. 

एसटी बँकेची नोकर भरती तातडीने रद्द करा; चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर अपर निबंधकांनी दिले महामंडळाला पत्र या पत्रामुळे एसटी महामंडळाच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँकेच्या नवीन संचालक मंडळाने बँकेत केलेल्या बेकायदेशीर नोकरभरतीबाबत विविध संघटनांनी तक्रार केली होती. त्या तक्रारीची चौकशी करण्यात आली. चौकशीअंती जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग -१, सहकारी संस्था, मुंबई यांनी १५ जुलै रोजी चौकशी अहवाल सादर केला. त्या अहवालात स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप. बँक लि. मुंबई या बँकेने ॲडहॉक व तात्पुरत्या पद्धतीने केलेली अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती योग्य व विहित पद्धतीने केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्या अनुषंगाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती त्वरित रद्द करण्यात यावी, असे पत्र सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणेचे अपर निबंधक (प्रशासन) शैलेश कोतमिरे यांनी १३ ऑगस्टला दिले आहे.

एसटी कर्मचाऱ्यांची आणि एसटी कर्मचाऱ्यांमार्फत चालविली जाणारी पगारदारांची स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँक लि. ही सहकारी संस्था १९५३ पासून कामगारांना आर्थिक दिलासा देण्यासाठी कार्यरत आहे. जून २०२३ मध्ये एसटी बँकेच्या निवडणुकीत सत्तांतर झाले. त्यानंतर बँकेच्या कारभाराविषयी एसटी कामगार सेनेने ४ फेब्रुवारी २०२४ रोजी निवेदन देऊन नोकर भरतीच्या चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीने ४ जुलै २०२४ रोजी निवेदन देऊन बँकेच्या संचालक मंडळाच्या बेकायदेशीर व अन्यायी वर्तनाविरोधात आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी एसटी कामगार सेनेने नोकर भरती प्रक्रियेस तातडीने स्थगिती देण्याची मागणीही केली होती, असे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी सांगितले.

कारवाईकडे लागले लक्ष

एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालकांना नोकर भरती रद्द करण्याचे पत्र देण्यात आले आहे. त्यामुळे आता या पत्रावर कोणती कारवाई होते, याकडे महामंडळाच्या कामगारांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र एसटी कामगार सेनेचे सरचिटणीस हिरेन रेडकर यांनी याप्रकरणी तत्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड