दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे

SSC Result 2021

SSC Result 2021 Date Update

SSC Result 2021 : दहावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे देण्यात येणारे दहावीचे निकाल (SSC Result 2021 Date Update) जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागण्याचे सूतोवाच राज्याच्या शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापनासंदर्भातील डेटा शिक्षण विभागाकडे जमा होण्यास सुरुवात झाली असून, जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता आहे.

SSC Result 2021

जुलैच्या पहिल्या आठवड्यात निकाल लागण्याची शक्यता निर्माण झाल्याने आता याच महिन्यात अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा होणार असल्याचे सांगितले जात आहे. या परीक्षा झाल्यानंतर जुलै महिन्याच्या शेवटी अकरावी प्रवेश सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही.


Tenth Result Only After 15th July 

SSC Result 2021 : The plan will be released on Monday or Tuesday to prepare the results of the exam. However, state board officials have said that they will have to wait till July 15 to announce the results of the exam.

दहावीचा निकाल 15 जुलैनंतरच लागणार !! परीक्षेचा निकाल तयार करण्यास सोमवारी किंवा मंगळवारी संबंधित आराखडा प्रसिद्ध होणार आहे. मात्र, परीक्षेचा निकाल जाहीर होण्यासाठी १५ जुलैपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

राज्य मंडळाकडून नववी व दहावीतील अंतर्गत मूल्यमापनाच्या गुणांच्या आधारे दहावीचा निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. त्यासाठी शाळांकडून प्रत्येक विद्यार्थ्याचे गुण मागविले जाणार आहेत. शाळांनी विशिष्ट आराखड्यात ऑनलाइन पद्धतीने हे गुण भरून द्यायचे आहेत. राज्य मंडळाकडून हा आराखडा तयार केला जात असून, सोमवारी सायंकाळी किंवा मंगळवारी तो प्रसिद्ध केला होणार आहे.

SSC Result 2021


SSC Result 2021 : SCERT announces ninth pass statistics. SCERT has released the statistics of students who have passed and failed. More than 18 Lac students in the state have passed the ninth standard. Further details are as follows:-

नववी उत्तीर्णांची आकडेवारी जाहीर; दहावीच्या निकालासाठी नववीच्या आधारे मूल्यमापन शक्य! नववीच्या परीक्षाच झाल्या नाहीत, तर दहावीचे गुणांकन कसे करणार, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. याला ‘एससीईआरटी’ने उत्तर दिले असून, २०१९-२० या शैक्षणिक वर्षामध्ये नववीची परीक्षा दिलेल्या आणि त्यातून उत्तीर्ण व अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील सुमारे १८ लाखांहून अधिक विद्यार्थी नववीमध्ये उत्तीर्ण झाले असून, त्यांची संपूर्ण माहिती सरल प्रणालीत समाविष्ट करण्यात आल्याने दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनासाठी त्याचा उपयोग होईल, असे ‘एससीईआरटी’कडून सांगण्यात आले आहे.

नववीच्या विद्यार्थ्यांची जिल्हानिहाय आकडेवारी (२०१९-२०)

जिल्हा परीक्षार्थी उत्तीर्ण अनुत्तीर्ण

  • पुणे १,५३,९११ १,४९,८१२ ४०९९
  • मुंबई (शहर) १७,०६४ १५,८४९ १२१५
  • मुंबई (जिल्हा) १,५०,३१४ १,४५,८५१ ४४६३
  • ठाणे १,३१,०७३ १,२६,७२४ ४३४९
  • नाशिक १,०८,०८२ १,०७,१७६ ९०६

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड