महत्त्वाचे – बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात अंशतः बदल

SSC HSC Supplementary Exam

12th Supplementary Exam Revised Timetable 

SSC HSC Supplementary Exam: There are some changes in HSC Supplementary Exam Timetable conduct under the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education. Students visit www.mahahsscboard.in for revised scheduled. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होत असलेल्या बारावीच्या पुरवणी परीक्षेत अंशतः बदल करण्यात आला आहे. बारावीच्या व्यावसायिक द्विलक्षी अभ्यासक्रम पेपर एक आणि दोन विषयांच्या ६, १० आणि १२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला असून सुधारित वेळापत्रक मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आले आहे. राज्य मंडळामार्फत २१ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान बारावीची पुरवणी परीक्षा होत आहे. या परीक्षेस श्रेणी सुधार योजनेअंतर्गत प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थी हे राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत घेण्यात येणारी ‘एमएचटी सीईटी’ परीक्षाही देणार आहेत.

 • त्यामुळे त्या कालावधीत होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
 • या वेळापत्रकातील अंशतः बदलाची सर्व संबंधित उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक/प्राचार्य, विद्यार्थी, पालक आणि अन्य घटकांनी नोंद घ्यावी.
 • या तारखेबाबतचे सुधारित वेळापत्रक मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या अधिकृत संकेतस्थळावर एक ऑगस्टपासून उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

अधिकृत वेबसाईट – www.mahahsscboard.in


SSC Supplementary Exam Hall Tickets 

SSC HSC Supplementary Exam : The admit card for the 10th Supplementary  July-August Exam 2022 is available by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education. visit https://www.mahahsscboard.in to download the hall tickets. Further details are as follows:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येत असलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे परीक्षा प्रवेशपत्र (हॉल तिकीट) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. हे ऑनलाईन हॉल तिकीट शाळांच्या लॉगीन आयडीवर उपलब्ध झाले आहे.

दहावीची पुरवणी परीक्षा जुलैऑगस्ट २०२२ मध्ये होणार असून, या परीक्षेसाठी https:// www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळेच्या लॉगीनवर गुरुवारी (दि. १४) सकाळी ११ वाजेपासून हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात आले आहे. हॉल तिकीट शाळास्तरावर डाऊनलोड करून विद्यार्थ्यांना वितरित करण्यात येणार आहे.

SSC HSC Supplementary Exam


10th Supplementary Examination Hall Tickets

SSC HSC Supplementary Exam : The admit card for the 10th Supplementary  July-August Exam 2022 will be available Thursday (14th July 2022) by the Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education. The exam will be conducted between 27th July to 12th of August 2022. Students visit ‘www.mahahsscboard.in’ to download the admit card. Further details are as followS:-

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळातील सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाइन प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शाळांना येत्या गुरुवारपासून (ता.१४) ही प्रवेशपत्रे ‘स्कूल लॉगिन’मधून डाऊनलोड करता येणार आहेत. शाळांनी ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यावीत, असे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे.

 • राज्य मंडळातर्फे दहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान होणार आहे.
 • तर दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २६ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत आयोजित केली आहे.
 • मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून शाळा लॉगिनमध्ये प्रवेशपत्रे उपलब्ध होणार आहेत.
 • प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेण्यात येऊ नये.
 • प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी, असेही डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले.

प्रवेशपत्रावरील विषय व माध्यम यात बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यावयाच्या आहेत. तसेच फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळ या संदर्भातील दुरुस्त्या माध्यमिक शाळांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. विद्यार्थ्यांकडून प्रवेशपत्र गहाळ झाल्यास संबंधित माध्यमिक शाळांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावे. फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्याचा फोटो चिकटवून त्यावर संबंधित मुख्याध्यापकांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे राज्य मंडळाने प्रकटनाद्वारे स्पष्ट केले आहे.

अधिकृत वेबसाईट – www.mahahsscboard.in


HSC Supplementary Exam Hall Ticket

SSC HSC Supplementary Exam: The admit cards for Class 12th Supplementary Examination are available from today. Students download their admit through the www.mahahsscboard.in. Click on the below link to download the hall tikctes. Further details are as follows:-

बारावीच्या पुरवणी परीक्षेची प्रवेशपत्र जाहीर!! येथे करा डाउनलोड

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे जाहीर करण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांना राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर प्रवेशपत्रे डाउनलोड करता येतील. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) शनिवारपासून (ता. ९) उपलब्ध करून देण्यात येत आहेत. राज्य मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर सकाळी अकरा वाजल्यापासून कॉलेज लॉगिनमध्ये ही प्रवेशपत्रे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध होतील, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

 • जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होणाऱ्या बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये यांनी बारावीच्या परीक्षेची ऑनलाइन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत.
 • प्रवेशपत्र ऑनलाइन पद्धतीने प्रिंटिंग करताना विद्यार्थ्यांकडून त्यासाठी कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये.
 • प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करावी, अशी सूचना राज्य मंडळाने केली आहे.

प्रवेशपत्रामध्ये विषय आणि माध्यम बदल असतील तर त्यांच्या दुरुस्त्या उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळात जाऊन करून घ्यायच्या आहेत. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव या संदर्भातील दुरुस्त्या महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करून त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे त्वरित पाठवायची आहे. तसेच, प्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित महाविद्यालयांनी पुन:श्च प्रिंट काढून त्यावर लाल शाईने द्वितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यांस प्रवेशपत्र द्यावयाचे आहे. प्रवेशपत्रावरील फोटो सदोष असल्यास त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो चिटकवून त्यावर संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्यांनी शिक्का मारून स्वाक्षरी करायची आहे, असे डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले आहे.

प्रवेशपत्र डाउनलोड करा – www.mahahsscboard.in

SSC HSC Supplementary Exam


SSC Supplementary Exam – Application Date Extended

SSC HSC Supplementary Exam : The July-August 2022 Supplementary Exam dates have not been declared yet. Maharashtra SSC July-August 2022 Supplementary Exam applications date extended. Students apply till the 30th of June 2022. Further details are as follows:-

जुलै-ऑगस्ट २०२२ पुरवणी परीक्षांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत याआधी २० जून ते २७ जून २०२२ होती. विद्यार्थी हित लक्षात घेऊन ३० जून पर्यंत मुदतवाढ दिल्याचे राज्य मंडळाने सांगितले आहे.

 • राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या अर्जांना मुदतवाढ दिली आहे.
 • आता ज्या विद्यार्थ्यांना जुलै-ऑगस्ट २०२२ मध्ये होणारी पुरवणी परीक्षा द्यायची आहे, ते विद्यार्थी नियमित शुल्कासह ३० जून पर्यंत अर्ज करू शकतात.
 • ही मुदत २७ जून रोजी संपत होती. त्यानंतर १ जुलै ते ४ जुलै २०२२ या कालावधीत विद्यार्थ्यांना विलंब शुल्कासह अर्ज करता येणार आहेत.
 • जुलै-ऑगस्ट २०२२ पुरवणी परीक्षांच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. पुरवणी परीक्षेसाठी अर्ज करण्याची मुदत याआधी २० जून ते २७ जून २०२२ होती.
 • विद्यार्थी हित लक्षात घेऊन ३० जून पर्यंत मुदतवाढ दिल्याचे राज्य मंडळाने सांगितले आहे.
 • नियमित शुल्कासह ३० जून पर्यंत तर विलंब शुल्कासह १ जुलै ते ४ जुलै २०२२ या कालावधीत अर्ज करता येणार आहे.

माध्यमिक शाळांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क भरण्याची मुदत ५ जुलै ते ६ जुलै २०२२ पर्यंत आहे. विभागीय मंडळाकडे माध्यमिक शाळांनी शुल्क भरल्याच्या चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या जमा करण्याची मुदत ७ जुलै २०२२ पर्यंत आहे.

पुरवणी परीक्षा अर्ज लिंक – https://bit.ly/3NptKSK


SSC HSC Supplementary Exam

SSC HSC Supplementary Exam: The result of the SSC HSC Examination has been declared by Maharashtra Board. SSC HSC Exam Important Update Regarding SSC HSC Supplementary Examinations. Complete details on the official website. Further details are as follows:-

महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी-बारावी परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. आता यानंतर पुरवणी परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट जाहीर करण्यात आली आहे. अधिकृत वेबसाइटवर याचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • महाराष्ट्र शिक्षण बोर्डाकडून जुलै-ऑगस्ट २०२२ माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता दहावी आणि उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजेच इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षा वेळापत्रकाबाबत महत्वाचे अपडेट देण्यात आले आहे.
 • जुलै- ऑगस्ट २०२२ मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावी परीक्षेची लेखी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.
 • इयत्ता बारावी सर्वसाधारण आणि व्दिलक्षी विषयांची लेखी परीक्षा २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.
 • तर बारावी व्यवसाय अभ्यासक्रमांची परीक्षा २१ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे.

दहावीची पुरवणी परीक्षा २७ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. दहावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २६ जुलै २०२२ ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा २० जुलै, २०२२ ते ८ ऑगस्ट २०२२ या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.

 • या कालावधीमध्ये होणाऱ्या परीक्षांचे सविस्तर वेळापत्रक मंडळाची अधिकृत वेबसाइट www.mahahsscboard.in वर जाहीर करण्यात आले आहे.
 • ही वेळापत्रकाची सुविधा केवळ माहितीसाठी आहे. परीक्षेपूर्वी माध्यमिक शाळा / उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांत छापील स्वरूपात अंतिम वेळापत्रक मिळणार आहे.
 • त्या छापील वेळापत्रकावरून परीक्षेच्या तारखांची खात्री करून घ्यावी आणि परीक्षेस बसावे असे आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे.
 • अन्य वेबसाइटवरील किंवा अन्य यंत्रणेने छपाई केलेले तसेच व्हॉट्सअॅप किंवा तत्सम माध्यमातून व्हायरल झालेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड