SSC CGL टियर 2 परीक्षेचा निकाल जाहीर!! येथे करा डाउनलोड

SSC CGL Bharti 2022

SSC CGL 2020 Tier 2 Results 

SSC CGL Bharti 2022: The result of Combined Graduate Level Examination Tier 2 examination has been announced by the Staff Selection Commission. Candidates appearing for the exam will be able to check the results by visiting the official website and following the steps given in the news. Further details are as follows:-

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा टियर २ परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेला बसलेल्या उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवर जाऊन बातमीत दिलेल्या स्टेप्स फॉलो करुन निकाल तपासता येणार आहे. एसएससी सीजीएल टियर २ परीक्षा २८ जानेवारी, २९ जानेवारी आणि २ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली होती.

कर्मचारी निवड आयोगाच्या (Staff Selection Commission) अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर निकाल जाहीर करण्यात आला आहे. कम्बाइंड ग्रॅज्युएट लेव्हल परीक्षा टियर २ परीक्षेला (Combined Graduate Level Exam Tier 2 Exam) बसलेल्या उमेदवारांना पोर्टलवर आवश्यक तपशील भरुन त्यांचे गुण तपासता येणार आहेत. या व्यतिरिक्त बातमीत दिलेल्या सोप्या स्टेप्स फॉलो करुन देखील गुण तपासता येणार आहे.

How to Download SSC CGL 2020 Result 

 • SSC CGL 2020 निकाल टियर २ पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट ssc.nic.in वर जा.
 • पुढे होमपेजवर निकालाच्या टॅबवर क्लिक करा.
 • आता एक नवीन पेज उघडेल.
 • ‘संयुक्त पदवी स्तर २०२० टियर २ निकाल’ असलेल्या लिंकवर क्लिक करा.
 • आता तुमचा रोल नंबर पीडीएफमध्ये शोधा.
 • निकाल डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी सेव्ह करा.

From May 5 to May 26, candidates can check their personal marks by entering their registration number and registered password in the dashboard and then clicking on the results / marks link. Candidates should note that the link will then be removed from the portal.

 • एसएससी सीजीएल टियर २ परीक्षा २८ जानेवारी, २९ जानेवारी आणि २ फेब्रुवारी रोजी कॉम्प्युटर माध्यमातून घेण्यात आली.
 • शिवाय स्टाफ सिलेक्शनतर्फे लवकरच सीएचएसएल टियर १ परीक्षा सुरु होणार आहे.
 • परीक्षेचे प्रवेशपत्र लवकरच अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध जाहीर केले जाणार आहे.
 • दरम्यान, उमेदवारांना पोर्टलवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येथे उमेदवारांना परीक्षेची अपडेट मिळू शकणार आहे.

अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in


SSC CGL Tier 1 Cut-Off 2022

SSC CGL Bharti 2022: A possible cut off of CGL Tier 1 examination has been given by the Staff Selection Commission. The cut-off marks are based on the number of candidates, the difficulty level of the questions asked in the exam, etc. Are based on many factors. This is an important update for candidates searching the internet for the expected cut off. Further details are as follows:-

स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे सीजीएल टियर १ परीक्षेचा संभाव्य कट ऑफ देण्यात आला आहे. कट-ऑफ गुण हे परीक्षार्थींची संख्या, परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची अवघड पातळीवर्गवार इ. अनेक घटकांवर आधारित असतात. अपेक्षित कट ऑफबद्दल इंटरनेटवर शोध घेणाऱ्या उमेदवारांसाठी ही महत्वाची अपडेट आहे. 

सीजीएल परीक्षेद्वारे ग्रुप बी आणि ग्रुप सी अंतर्गत इन्स्पेक्टर, सब-इन्स्पेक्टर, ऑडिटर, अकाउंटंट / ज्युनिअर अकाऊंटंट, सीनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट / अपर डिवीजन क्लर्क, टॅक्स असिस्टंट, अपर डिवीजन क्लर्क (यूडीसी), असिस्टंट सेक्शन ऑफिसर, ज्युनिअर स्टॅटिस्टिकल ऑफिसर इत्यादी पदांची भरती केली जाणार आहे. कट-ऑफ गुण हे कोणत्याही परीक्षेच्या पुढील टप्प्यात पोहोचण्यासाठी उमेदवाराला आवश्यक असलेले किमान गुण आहेत. कट-ऑफ गुण हे परीक्षार्थींची संख्या, परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांची अवघड पातळी वर्गवार इ. अनेक घटकांवर आधारित असतात. उमेदवार आधीच अपेक्षित कट ऑफबद्दल इंटरनेटवर शोधत आहेत. उमेदवारांची ही उत्सुकता लक्षात घेऊन अंदाजे कट-ऑफची माहिती येथे देण्यात आली आहे. प्रश्नांच्या काठीण्य स्तरावर आधारित, एसएससी सीजीएल टियर-१ परीक्षेच्या कट-ऑफ गुणांचा अंदाज लावण्यात आला आहे.

SSC CGL Tier 1 2022 Exam Expected Cut-Off

सहाय्यक लेखापरीक्षा अधिकारी/सहाय्यक लेखाधिकारी/कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी यांसारख्या पदांव्यतिरिक्त सर्व पदांसाठी कट-ऑफ

 • सर्वसाधारण वर्गासाठी १४० ते १५०
 • EWS साठी १४० ते १४५
 • ओबीसीसाठी १३५ ते १४०
 • एससीसाठी ११५ ते १२०
 • एसटीसाठी १०५ ते ११०

असिस्टंट ऑडिट ऑफिसर / असिस्टंट अकाउंट्स ऑफिसर पोस्टसाठी अंदाजे कट-ऑफ

 • सर्वसाधारणसाठी १६८ ते १७८
 • EWS साठी १६८ ते १७३
 • ओबीसीसाठी १६३ ते १६८
 • एससीसाठी १५३ ते १५८
 • एसटीसाठी १४८ ते १५३

गणित, इंग्रजी भाषा आणि आकलन, सामान्य बुद्धिमत्ता आणि सामान्य जागरूकता विभागातून सोपे ते मध्यम स्तरावरील प्रश्न विचारण्यात आले. या परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंगही असणार आहे. ज्याअंतर्गत ०.५ गुण वजा केले जातील. अंतिम गुणवत्ता यादी तयार केल्यावर टियर १ परीक्षेतील गुणांचा विचार केला जाणार आहे.


SSC CGL Bharti 2022 Details 

SSC CGL Bharti 2022 : Staff Selection Commission has published a recruitment notification for Assistants, Inspectors of Central Excise & Customs, Inspectors of Income Tax, Assistant Enforcement Officer, Tax Assistant, Etc. posts. There are a total of 7913+ vacancies available to fill the posts. Eligible candidates apply offline before 23 Jan 2022. Further details are as follows:-

Combined Graduate Level Exam, CGL

कर्मचारी निवड आयोगाने (SSC)संयुक्त पदवी परीक्षा स्तरावरील भरतीसाठी म्हणजेच एसएससी सीजीएल २०२२ (SSC CGL 2022) भरतीसाठी नोटिफिकेशन जारी केले आहे. एसएससी सीजीएल 2022 अर्ज ऑनलाइन पद्धतीने ssc.nic.in वर भरता येणार आहेत. इच्छुक उमेदवार ग्रुप बी आणि सी च्या सरकारी नोकरीसाठी अर्ज करू शकतात. २३ जानेवारी २०२२ पर्यंत हे अर्ज भरता येणार आहेत. एसएससी द्वारा जारी नोटिफिकेशननुसार, गॅझेटेड म्हणजेच राजपत्रित आणि अराजपत्रित अधिकाऱ्यांच्या विविध पदांवरील भरतीसाठी एसएससी संयुक्त पदवी स्तर (Combined Graduate Level Exam, CGL)रिक्त पदांची घोषणा स्वतंत्रपणे करण्यात येणार आहे.

कर्मचारी निवड आयोग (SSC) अंतर्गत सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, आयकर निरीक्षक, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, निरीक्षक परीक्षक, सहायक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहायक अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी अधिकारी श्रेणी II, लेखा परीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / UDC, कर सहाय्यक, उच्च विभाग लिपिक पदांच्या अंदाजे एकूण 7913+ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख  23 जानेवारी  2022 आहे.


एसएससी सीजीएल परीक्षा 2021 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण केलेली असावी. या परीक्षेसाठी उमेदवारांचे वय ३० वर्षांपेक्षा जास्त नसावे. तथापि, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा नियमाप्रमाणे शिथिल आहे. तसेच अधिक तपशीलांसाठी एसएससीने प्रसिद्ध केलेली अधिसूचना PDF पाहावी.

उमेदवारांना एसएससी सीजीएल अर्ज भरण्यापूर्वी एसएससी सीजीएल (SSC CGL 2022) पात्रतेचे निकष पाहावे लागतील. कारण पात्रता एसएससी सीजीएल पदांनुसार विविध प्रकारची असते. परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २३ जानेवारी २०२२ आहे. एसएससी सीजीएल परीक्षा २०२२ च्या नोटिफिकेशननुसार, एसएससी सीजीएल सीबीटी (CBT) १ परीक्षा एप्रिल २०२२ मध्ये आयोजित केली जाणार आहे. एसएससी सीजीएल सीबीटी २ (CBT 2) परीक्षेची तारीख नंतर जाहीर करण्यात येईल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा .

 • पदाचे नाव – सहाय्यक लेखा अधिकारी, सहायक लेखाधिकारी, सहायक विभाग अधिकारी, सहाय्यक, आयकर निरीक्षक, निरीक्षक केंद्रीय उत्पादन शुल्क, निरीक्षक प्रतिबंधक अधिकारी, निरीक्षक परीक्षक, सहायक अंमलबजावणी अधिकारी, उपनिरीक्षक, निरीक्षक, सहायक अधीक्षक, विभागीय लेखापाल, उपनिरीक्षक, कनिष्ठ सांख्यिकी अधिकारी, सांख्यिकी अधिकारी श्रेणी II, लेखा परीक्षक, लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, वरिष्ठ सचिवालय सहाय्यक / UDC, कर सहाय्यक, उच्च विभाग लिपिक
 • पद संख्याअंदाजे  7913+ जागा
 • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात वाचावी)
 • परीक्षा शुल्क – रु. 100/-
 • अर्ज पद्धती – ऑनलाईन
 • अर्ज सुरु होण्याची तारीख – 23 डिसेंबर 2021
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 23 जानेवारी  2022
 • अधिकृत वेबसाईट – ssc.nic.in

SSC CGL 2022 Important Dates :

 • एसएससी सीजीएल अधिसूचना २०२२ – २३ डिसेंबर २०२१
 • एसएससी सीजीएल अर्जांना सुरूवात – २३ डिसेंबर २०२१ (रात्री ११.३० वाजता)
 • एसएससी सीजीएल २०२२ अर्जांची अंतिम मुदत- २३ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
 • ऑनलाइन पद्धतीने एसएससी सीजीएल अर्जांचे शुल्क भरण्याती अंतिम मुदत – २५ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
 • ऑफलाइन चलान भरण्याची अंतिम मुदत – २६ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
 • चलानच्या माध्यमातून शुल्क भरण्यासाठी अंतिम मुदत – २७ जानेवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
 • अर्जातील दुरुस्ती – २८ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२२ (रात्री ११.३० वाजेपर्यंत)
 • एसएससी सीजीएल 2022 टियर 1 परीक्षेची तारीख – एप्रिल २०२२

Important Links  for SSC CGL Application 2022

? PDF जाहिरात
✅ ऑनलाईन अर्ज करा

SSC CGL Tier 1 Exam 2020

SSC CGL Bharti 2021 : This is important news for CGL Tier 1 candidates. The examination will be conducted under the Corona Protocol by the Commission from a security standpoint. This exam will start from 13th August 2021. The exam will be conducted online from August 13 to 24 at designated centers across the country. Further details are as follows:-

कर्मचारी निवड आयोग (SSC)तर्फे सीजीएल टियर १ परीक्षा २०२० संदर्भात महत्वाची बातमी आहे. ही परीक्षा १३ ऑगस्ट २०२१ पासून सुरु होणार आहे. देशभरातील निर्धारित केंद्रांवर १३ ते २४ ऑगस्ट दरम्यान ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी साधारण १९ लाख उमेदवारांनी अर्ज केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आयोगातर्फे करोना प्रोटोकॉल अंतर्गत परीक्षा होणार आहे.

उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना

परीक्षेत बसलेल्या सर्व उमेदवारांना फेस मास्क घालणे बंधनकारक असेल. परीक्षा केंद्रावर पोहोचल्यावर उमेदवारांना सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागतील. दोन उमेदवारांमध्ये ६ फूट अंतर असणे गरजेचे आहे. मुख्य गेटवर तसेच परीक्षा केंद्राच्या आत हँड सॅनिटायझेशनची सुविधा उपलब्ध असेल.

हॉल तिकिट, फोटो आयडी परीक्षाकेंद्रावर दाखवण्यापूर्वी थर्मो गनने उमेदवारांच्या शरीराचे तापमान तपासले जाईल. परीक्षा अधिकारी उमेदवाराकडील महत्वाच्या कागदपत्रांची पडताळणी करतील त्यानंतर उमेदवार रजिस्ट्रेशन डेस्ककडे जाऊ शकतो. उमेदवार स्वत:च्या सुरक्षिततेसाठी हॅंडग्लोजचा उपयोग करु शकतात. रजिस्ट्रेशन डेस्कवर उमेदवाराचा फोटो काढला जाईल. आंगठ्याची निशाणी घेतली जाणार नाही. इथे उमेदवारांना सीट नंबर दिला जाईल.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

9 Comments
 1. कविता गरुड says

  मराठी भषामध्ये बोलताना चालले

 2. Srushti Sidheshwar Baad says

  मी 12वी ला आहे

  1. MahaBharti says
 3. Komal ramesh jadhav says

  Staff nurse vacancy please update pathava dr…distat staff Sathi ny dakhvt please…

  1. MahaBharti says
 4. Sakshi says

  Diploma complete hai to chlta hai kya ise apply krne ko sir..

 5. [email protected] says

  निरीक्षक अन्नभेसळ जाहिरात कधी निघेल.एम टेक अन्नप्रक्रीया साठी कोणत्या जागा आहेत

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड