Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सोलापूर महापालिकेत मेगाभरती,पहिल्याच दिवशी कनिष्ठ अभियंता, लिपिक पदांसाठी कागदपत्रांची झाली तपासणी | Solapur Mahanagarpalika Result 2024

Solapur Mahanagarpalika Result 2024

Solapur Mahanagarpalika Result 2024

 

सोलापूर महापालिकेत प्रथमच होत असलेल्या मेगाभरती प्रक्रियेसाठी मंगळवारी पहिल्या दिवशी तात्पुरत्या निवड आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांची मूळ कागदपत्र तपासणी प्रक्रिया पार पडली. सामान्य प्रशासन विभागाने यासाठी नेटके नियोजन केले होते. यानिमित्ताने महापालिका कौन्सिल सभागृह व परिसर उमेदवारांनी गजबजून गेला होता. सोलापूर महानगरपालिकेकडून उपरोक्त संदर्भक्र.१ व २ ने जाहीरात प्रसिध्द करून वर्ग-अ (अराजपत्रित) ते वर्ग-ड मधील आस्थापनेवरील ३१ विविध संवर्गामधून एकूण ३०२ पदे भरण्याबाबतची पदभरती जाहीरात प्रसिध्द करण्यात आलेली होती. नमूद पदाच्या ऑनलाईन परीक्षा १५ ते १७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत टीसीएस या कंपनीकडून निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर घेण्यात आल्या. यामधील २४ संवर्गातील विविध पदांची सामाजिक व समांतर आरक्षणानुसार संवर्ग निहाय गुण यादी व निवड टीसीएस यांच्याकडून महापालिकेला प्राप्त झाली आहे. तसेच  पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतिक्षा यादी अंतर्गत मंगळवारी पहिल्या दिवशी ११ जून २०२४ सकाळी ९ ते दुपारी १ वाजता सर्व कनिष्ठ अभियंता संवर्ग तर दुपारी २ ते सायंकाळी ७ वाजता कनिष्ठ श्रेणी लिपिक व मिडवाईफ या संबंधित उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी आज महापालिकेत कौन्सिल हॉल सभागृहात पार पडली.

महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया पार पडली. यासाठी महापालिकेतील सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतुल यांच्या माध्यमातून सूक्ष्म व नेटके नियोजन केले आहे. हॉलच्या दरवाज्याच्या बाजूस आलेल्या उमेदवारांची नोंदणी त्यानंतर पडताळणीसाठी आत प्रवेश दिला जात होता.

लिपिक अशोक बिराजदार हे आवश्यक त्या सूचना माईकवरून उमेदवारांना देत होते. सकाळच्या सत्रात १३६ तर दुपारच्या सत्रात सुमारे १४५ जणांची कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. संबंधित उमेदवारांकडून कागदपत्रांच्या तीन झेरॉक्स प्रती जमा करण्यात आल्या. या तपासणीनंतर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येणार आहेत.

चहा-बिस्कीट, राहण्याचीही सोय
संबंधित उमेदवारांसाठी महापालिकेच्या वतीने पाणी, चहा- बिस्कीट तसेच आवश्यकतेनुसार राहण्याची सोय करण्यात आली. अत्यंत सुलभ पद्धतीने ही प्रक्रिया पार पडली. यामुळे परगावसह स्थानिक उमेदवारांनी याबद्दल समाधान व्यक्त केले.

आज उर्वरित उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासणी
बुधवार, १२ जून सकाळी ९ ते दुपारी १ वाजता उर्वरित सर्व संवर्ग यादीतील उमेदवारांनी नमूद दिवशी मूळ कागदपत्रे व त्याच्या तीन साक्षांकित प्रतीसह कौन्सिल हॉल, सोलापूर महानगरपालिका, सोलापूर येथे उपस्थित राहावे, असे आवाहन महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.


Solapur Mahanagarpalika Result 2024: Solapur Municipal Corporation has declared the Revised Responce sheet of Solapur Mahanagarpalika Result 2023 . Click on the below link to download the Respoce Sheet Online.

 

महापालिका आस्थापनेच्या २४ विविध संवर्गातील नोकर भरतीची निवड यादी आणि प्रतीक्षा यादी रविवारी मनपाच्या वेबसाइटवर जाहीर झाली. यात जवळपास २४८ जणांना विविध पदांवर नोकरी मिळाली आहे. या उमेदवारांनी ११ आणि १२ जून रोजी आपली मूळ कागदपत्रे घेऊन मनपा कौन्सिल हॉलमध्ये यावे, असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले. महापालिकेने ३१ विविध संवर्गातील एकूण ३०२ पदांच्या भरतीसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात जाहिरात प्रसिद्ध केली होती. या पदांसाठी १५ ते १७ फेब्रुवारी रोजी राज्याच्या विविध केंद्रावर ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली. ही प्रक्रिया TCS कंपनीकडून राबविण्यात आली. या परीक्षेचा निकाल मार्च महिन्यात जाहीर झाला. रविवारी थेट – निवड यादी जाहीर झाली. यामध्ये पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, उद्यान अधीक्षक, पशुवैद्यकीय अधिकारी, क्रीडा अधिकारी, जीवशास्त्रज्ञ यासह विविध पदांचा समावेश आहे. पालिकेच्या गेल्या १५ वर्षांच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी नोकरभरती ठरली आहे. मनपा कामगार संघर्ष समिती, महामानव डॉ. बाबासाहेब ट्रेड युनियन यासह विविध कामगार संघटना, मनपा पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले होते. 

या २४ संवर्गाची निवड, प्रतीक्षा यादी जाहीर
पर्यावरण संवर्धन अधिकारी, मुख्य अग्निशमन अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, उद्यान अधीक्षक, क्रीडाधिकारी, जीवशास्त्रज्ञ, महिला व बालविकास अधिकारी, कनिष्ठ अभियंता आर्किटेक्चर, कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाइल, कनिष्ठ अभियंता विद्युत, कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, सहायक कामगार कल्याण अधिकारी व जनसंपर्क अधिकारी, सहायक उद्यान अधीक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, कनिष्ठ अभियंता सहायक स्थापत्य, स्टेनो टायपिस्ट, मीडवाइफ, नेटवर्क इंजिनिअर, सहायक प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फायर मोटर मेकॅनिक, कनिष्ठ श्रेणी लिपिक, पाइप फिटर व फिल्टर फिटर, पंप ऑपरेटर. या दिवशी होईल पडताळणी – सर्व कनिष्ठ अभियंता संवर्ग, कनिष्ठ श्रेणी लिपिक व मिडीवाइफ यांच्या कागदपत्रांची पडताळणी ११ जून रोजी होईल. उर्वरित संवर्गाची पडताळणी १२ जून रोजी होईल.

 


सोलापूर महानगपालिका रिव्हाईस्ड  रिस्पॉन्स शीट उपलब्ध झाली आहे. उमेदवार खालील लिंक वरून आपली रिस्पॉन्स शीत लॉगिन करून डाउनलोड करू शकतात. तसेच  पुढील या संदर्भातील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा, म्हणजे पुढील सर्व अपडेट्स आपल्याला वेळेवर मिळतील.

रिस्पॉन्स शीट डाउनलोड करा

 


Solapur Mahanagarpalika Recruitment – Selection & Waiting List

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी, स्त्रीरोग तज्ञ, GNM, लॅब टेक्निशियन पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. सदर भरती अंतर्गत 37 पदे भरण्यात येणार आहेत. या भरती करिता ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आली होते.

शैक्षणिक पात्रता 

Medical Officer MBBS /MD/DNB/DGO
Gynecologist MD/DNB/DGO
GNM  GNM/B.Sc Nursing
Lab Technician  B.SC DMLT

वयोमर्यादा 

Age Limit  
  • Medical Officer – 70 years
  • Gynecologist – 70 years
  • Other Posts – As per Government Decision

रिक्त पदांचा तपशील 

Medical Officer
25 Post
Gynecologist
02 Post
GNM
07 Post
Lab Technician
03 Post
यादी डाउनलोड करा – https://bit.ly/3T8cCU8

Solapur Mahanagar Palika Medical Officer Bharti  Selection List

Solapur Mahanagar Palika ResultsSolapur Mahanagar Palika has been declared the selection & waiting list of Medical Officer posts. Click on the link below to download the list.

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Solapur Mahanagar Palika Medical officer Results

यादी डाउनलोड : https://bit.ly/3r8ogDP 

 


Solapur Mahanagar Palika Results : Solapur Mahanagar Palika has been declared the selection & waiting list of Veterinary Officer posts. Click on the link below to download the list.

सोलापूर महानगरपालिका अंतर्गत पशु वैद्यकीय अधिकारी पदभरती परीक्षेची निवड व प्रतीक्षा यादी जाहीर केलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Solapur Mahanagar Palika Results
यादी डाउनलोड : http://bit.ly/2Kyc4tg

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Somnath katale says

    Mala driver cha job pahije process kay ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड