शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा दुसऱ्यांदा लांबणीवर

Shivaji University Exam


Shivaji University Exam : कोल्हापूर जिल्ह्यात पुन्हा सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांना दुसऱ्यांदा दणका दिला आहे. या पावसामुळे विद्यापीठाने उद्या पासून सुरू होणाऱ्या परीक्षा आणखी आठ दिवस पुढे ढकलल्या आहेत.

Shivaji University Exam : शिवाजी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील अंतिम वर्षाच्या परीक्षा १७ ऑक्टोबर पासून सुरू होणार होत्या. या परीक्षेला ७५ हजाराहून अधिक विद्यार्थी बसणार आहेत. यातील साधारणता ४० हजारावर विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देणार आहेत. इतर विद्यार्थी ऑफलाईनद्वारे परीक्षा देणार आहेत. यासाठी नुकतीच सराव परीक्षा घेण्यात आली, पण त्यामध्येही काही अडचणी आल्या.

विद्यापीठाच्या १७ ऑक्टोबरपासून सुरु होणार होत्या. पण गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने जोरदार दणका दिला. जिल्ह्याला जोरदार पावसाने झोडपून काढले. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. अनेक बंधारे पाण्याखाली गेले. काही रस्ते बंद झाले. विजेचा पुरवठा खंडित झाला. यामुळे १७, १८ व २० तारखेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. २१ पासून इतर परीक्षा पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार होतील असे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार बुधवारपासून ही परीक्षा सुरू होण्याची अपेक्षा होती. पण, गेल्या दोन दिवसापासून पुन्हा एकदा जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली आहे. यामुळे पुन्हा एकदा या परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत.

आणखी दोन-तीन दिवस राज्यात मोठा पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे, यामुळे काही भागात विजेचा पुरवठा खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही तसे झाल्यास ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विद्यार्थ्यांना अडथळा येण्याची शक्यता आहे. ही शक्यता गृहीत धरून विद्यापीठाने बुधवारपासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुन्हा स्थगित केल्या आहेत. आता यापुढील परीक्षा २७ ऑक्टोबर पासून सुरू करण्यात येणार असून नवीन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा विभागाचे प्रमुख गजानन कळसे यांनी दिली.

सोर्स : म. टा.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड