ऐका व्हायरल ऑडिओ क्लिपमुळे शिक्षक भरती पुन्हा वादात !!
शिक्षक भरती पुन्हा वादात – मोठा गाजावाजा करून प्रक्रिया राबवलेली शिक्षणसेवक भरती वादात सापडली आहे. यात गैरव्यवहार झाल्याचा संशय घ्यायला वाव निर्माण करणारी ऑडिओ क्लिप सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे. यात सिंधुदुर्गाचा उल्लेख असून टीईटी पात्र नसलेल्या उमेदवारांची शिक्षक पदासाठी निवड झाल्याचा संवाद या क्लिपमध्ये आहे.
या प्रकरणी डीएड, बीएड बेरोजगार संघटनेने आवाज उठवला आहे. भरतीमध्ये कागदपत्रे पडताळणी प्रक्रिया सदोष होत असून त्याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे, असे निवेदनही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पाठविले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन यात किती गांभीर्याने लक्ष देते हे महत्त्वाचे ठरणार आहे.(pavitra portal shikshka bharti)
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
शिक्षक भरतीबाबत दर ठरला असल्याचा संवाद असलेली ऑडिओ क्लिप यापूर्वीच व्हायरल झाली होती; मात्र निवडणूका व इतर प्रक्रियेमुळे त्याकडे शासनाकडून योग्य ती चौकशी झाली नाही. मागील दोन वर्षापासून राज्यातील शिक्षक भरतीचे घोंगडे भिजत आहे. पहिली निवड यादी नऊ ऑगस्टला प्रसिद्ध झाली. यात अनेक दोष असल्याने राज्यातील डीएड बीएड धारकांचा उद्रेक झाला. मेरीट खूपच जास्त लागल्याने राज्यातील डीएड बीएडधारकांनी मंत्रालय व आयुक्त कार्यालयात आपला संताप व्यक्त केला. त्यामुळे सोळाला प्रसिद्ध होणारी दुसरी निवड यादीही पुढे ढकलली गेली. यावेळी 9 ऑगस्टला स्थानिक स्वराज्य संस्थांची मुलाखतीशिवाय पहिली निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली; परंतु या यादी नंतर डीएड बीएड धारकांनी शिक्षण मंत्री आशिष शेलार, शिक्षण उपसचिव चारुशिला चौधरी यांना भेटून तक्रारींचा पाढा वाचला. यावेळी विविध भरती बाबत असलेल्या समस्या सांगितल्या.
शासनाने निर्णय पारित करून निम्न प्राथमिक पहिली ते पाचवी व उच्च प्राथमिकसाठी सहावी ते आठवी टीईटीच्या दोन स्वतंत्र परीक्षा घेतल्या. तसा उल्लेखही प्रमाणपत्रावर केला आहे; मात्र या भरतीत नियुक्त्या देताना 6 वी ते 8 वीच्या पात्र उमेदवारांना 1 ते 4 साठी नियुक्त्या देण्यात आल्या आहेत. या निर्णयाने पहिली ते पाचवीसाठी उत्तीर्ण टीईटी उमेदवारांवर अन्याय केला आहे. जर परीक्षा वेगवेगळ्या झाल्या, मग दुसऱ्या टीईटीवाल्यांना 1 ते 4 साठी संधी का देण्यात आली असा सवाल उपस्थित करण्यात आला.
निवड यादी सदोष असल्याची अनेक प्रकरणे पुढे येत आहेत. त्यात व्यापमसारखा घोटाळा करणाऱ्या आयटी कंपनीकडे या भरतीचे कंत्राट देण्यात आले आहे. त्यामुळे या भरतीत मोठा घोळ झाला असल्याचे आरोप होत आहेत. प्रवर्गनिहाय पात्र उमेदवारांच्या संख्येबाबत कमालीची गुप्तता ठेवण्यात आल्यामुळे भरतीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. त्यामुळे योग्य न्याय न मिळाल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल, असा इशारा निवेदनातून संघटनेने दिला आहे. या भरतीमध्ये निवड यादी जाहीर केल्यानंतर माजी सैनिकांच्या सुमारे 1200 जागा रिक्त आहेत. तसेच जे उमेदवार विहीत कालावधीत कागदपत्र पडताळणीस उपस्थित राहू शकले नाहीत किंवा कागदपत्र पडताळणीतून बाहेर पडले त्या जागी तत्काळ नवीन उमेदवार देण्यात यावे, अशी मागणी अभियोग्यता धारकांमधून होत आहे.
ही स्थिती असताना आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. एक ऑडिओ क्लिप सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्याचा उल्लेख आहे. टीईटी नापास झालेल्या एका उमेदवाराला नियुक्ती मिळाल्याचा संवाद यामध्ये आहे. यामुळे ही भरती आणखी वादात सापडली आहे.
पवित्र पोर्टल पूर्ण लिंक्स आणि अपडेट्स
Mala nokrichi garaj aahe