पवित्र पोर्टल निवड यादी, मुलाखत कार्यक्रम

पवित्र पोर्टलवर नऊ ऑगस्टला सायंकाळी पाचनंतर मुलाखतीशिवाय निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यानंतर 16 ऑगस्टला मुलाखतीसहची निवड यादी जाहीर करण्यात येणार होती; मात्र समांतर आरक्षणाच्या नियमांना फाटा देऊन पोर्टलवर यादी जाहीर करण्यात आल्याचा आरोप भावी शिक्षकांनी केल्याने मुलाखतीसह निवड यादी जाहीर करण्याच्या प्रक्रियेला मुदत वाढ देण्यात आली आहे. त्यामुळे भरतीचा घोळ थांबणार कधी, असा सवाल भावी शिक्षक करीत आहेत.

“पवित्र पोर्टल’वरून शुक्रवारी शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केल्याने शिक्षक उमेदवारांना दिलासा मिळाला होता. शिक्षक भरतीच्या मुलाखतीचे वेळापत्रकही जाहीर झाल्याने भरती होणार हे निश्‍चित होते. प्रक्रियेत नियमांचे पालन करून शासनाकडून जिल्हा परिषदेच्या 3,530, महानगरपालिकेसाठी 1,053, नगरपालिका 172 आणि खासगी प्राथमिक शाळेसाठी 1,067 जागेसाठी यादी जाहीर केली आहे; मात्र आरक्षणनिहाय अनुसूचित जातीचे 369, अन्य मागासवर्गीयवर्गाचे 301, एसईबीसीचे 232, इडब्लूएसचे 161, खुला गटातील 116, भटक्‍या जमाती ब, क, आणि ड प्रवर्गाचे 227, विमुक्त जाती प्रवर्गाती 81 आणि विशेष मागास प्रवर्गाचे 65 उमेदवार उपलब्ध झाले नसल्याचे शिक्षण विभागातर्फे सांगण्यात येते; मात्र या वर्गातील गुणवंत उमेदवार असूनही त्यांना संधी देण्यात येत नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे. तसेच जाहीर केलेल्या निवड यादीत भरतीचे निकष पाळले गेले नसल्याच्या तक्रारी अनेक उमेदवारांनी शिक्षण आयुक्तांकडे केल्या आहेत.

खासगी शाळांमध्ये 3,100 शिक्षकांची भरती

योग्य व्यवस्थापनाचा अभाव या प्रक्रियेत दिसून येत आहे. त्यामुळे जेथे अडचणी असतील त्या तात्काळ दूर करून गुणवंत विद्यार्थ्यांना संधी देऊन त्यांना न्याय देण्यात यावा, निवड यादी सदोष पद्धतीने लावून निवड झालेल्या उमेदवारांना आचारसंहिता पूर्वी म्हणजे 31 ऑगस्टपर्यंत नियुक्‍ती पत्र देण्यात यावे, अशी मागणी उमेदवारांकडून केली जात आहे.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

लास्ट डेट आहे : केंद्रीय विद्यालय संघटन भरती २०२० | जिल्हा परिषद भंडारा भरती २०२० | गोवा मेडिकल कॉलेज भरती २०२०
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप