Shikshak Bharti 2026 Maharashtra
पवित्र पोर्टल शिक्षक भरती प्रक्रियेतील हजारो उमेदवारांसाठी आनंदाची बातमी! शिक्षक भरतीच्या रुपांतरित फेरीतून तब्बल ४ हजार ३९० उमेदवारांची मुलाखतीशिवाय निवड प्रकारात शिफारस करण्यात आली आहे. शिफारसपात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून, आता त्यांच्या नियुक्ती प्रक्रियेलाही वेग येणार आहे. संबंधित उमेदवारांची २४ ते २८ सप्टेंबरदरम्यान कागदपत्र पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांना ९ ऑक्टोबरपर्यंत पदस्थापना देण्यात येणार असल्याने, शिक्षक होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे.
पवित्र पोर्टल शिक्षक भरतीत रुपांतरित फेरीतून आणखी ४ हजार ३९० उमेदवारांची शिफारस; नियुक्ती प्रक्रियेला मिळणार वेग! शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी याबाबतची माहिती दिली. यावेळी राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त डॉ. नंदकुमार बेडसे, राज्य मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी आणि राजेश शिंदे उपस्थित होते.
दरम्यान, शिक्षक भरतीअंतर्गत यापूर्वी मुलाखतीविना निवड प्रकारात १३ हजार ११९ उमेदवारांची शिफारस करण्यात आली होती. मात्र, समांतर आरक्षण आणि राखीव प्रवर्गातील ६ हजार ६३५ पदांसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने ही पदे रिक्त राहिली होती. त्यापैकी समांतर आरक्षणांतर्गत रिक्त राहिलेली पदे भरण्यासाठी रुपांतरित फेरी राबविण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. शासनाची मंजुरी मिळाल्यानंतर या फेरीतून पात्र ठरलेल्या ४ हजार ३९० उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे. या प्रक्रियेनंतरही राज्यातील २ हजार २४५ पदे अद्याप रिक्त राहिली आहेत.
पवित्र पोर्टल शिक्षक भरतीबाबत मोठी अपडेट! हजारो उमेदवारांच्या रुजू होण्याचे चित्र १० ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट होणार; रुपांतरित फेरीतूनही विविध विषयांसाठी शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिक्षक भरतीच्या मुलाखतीविना निवड प्रकारात शिफारस करण्यात आलेल्या १३ हजार ११९ उमेदवारांपैकी आतापर्यंत १ हजार ८३० उमेदवार प्रत्यक्ष सेवेत रुजू झाले आहेत. उर्वरित उमेदवारांच्या रुजू होण्याबाबतचे चित्र १० ऑक्टोबरपर्यंत स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, समांतर आरक्षणांतर्गत रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी राबविण्यात आलेल्या रुपांतरित फेरीमुळे आणखी उमेदवारांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या फेरीत पदवीधर शिक्षक, इयत्ता नववी-दहावी स्तरावरील शिक्षक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार भाषा, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, कला, संगीत यांसह विविध विषयांसाठी शिक्षकांची शिफारस करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेतून गुणवत्तापूर्ण शिक्षकांची निवड करून राज्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा प्रयत्न असल्याचे शिक्षण आयुक्त सिंह यांनी स्पष्ट केले.
Shikshak Bharti 2026 Maharashtra Update – २८२ पदांची जाहिरात करूनही फक्त १६९ शिक्षक मिळाल्याने सिंधुदुर्गातील प्राथमिक शाळांतील शिक्षक टंचाई कायम; २२५ पदे पुन्हा रिक्त राहणार! जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांतील शिक्षकांची कमतरता दूर करण्यासाठी २८२ पदांची जाहिरात देण्यात आली होती; पण प्रत्यक्षात १६९ शिक्षकच मिळणार आहेत. त्यामुळे भरती प्रक्रिया होऊनही २२५ शिक्षक पदे रिक्त राहणार आहेत. शिक्षक भरती प्रक्रियेत पवित्र पोर्टलद्वारे पात्र ठरलेल्या १८८ उमेदवारांनी सिंधुदुर्गला पसंती दिली आहे. यापैकी कागदपत्र पडताळणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांपैकी १६९ जण उपस्थित, तर १९ जण अनुपस्थित राहिले. त्यामुळे उपस्थित उमेदवारांच्या निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती जिल्हा परिषद शिक्षण सभापती प्रीतेश राऊळ यांनी आज दिली. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडे भरतीपूर्वी ३५२ उपशिक्षकांची पदे रिक्त होती.

शासनाने रिक्त पदांच्या ८० टक्के पदे भरण्यास मान्यता दिल्यानंतर त्यानुसार जिल्हा परिषदेकडून २८२ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. पवित्र पोर्टलद्वारे राबविलेल्या या प्रक्रियेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना जिल्हा पसंतीची संधी देण्यात आली होती. त्यामध्ये १८८ उमेदवारांनी सिंधुदुर्गला पसंती दिली होती. या उमेदवारांची कागदपत्र पडताळणी ३ आणि ५ सप्टेंबरला करण्यात आली. त्यासाठी १८८ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. प्रत्यक्षात १६९ उमेदवार उपस्थित राहिले. यातील काही उमेदवारांच्या कागदपत्रांशी संबंधित बाबींवर अंतिम निर्णय बाकी असून, अन्य उमेदवारांच्या नियुक्तीची पुढील प्रक्रिया पूर्ण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांना लवकरच नियुक्तिपत्र मिळण्याची शक्यता आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अपूर्वा बासूर याबाबत निर्णय घेणार आहेत. दरम्यान, २०२४ मध्ये पवित्र पोर्टलद्वारे झालेल्या भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात नियुक्त झालेल्या ३४ शिक्षकांनी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेत पुन्हा भाग घेतला होता. यावेळी त्यांनी अन्य जिल्ह्यांना पसंती दिली होती. त्यानुसार त्यांची निवड झाली आहे. त्यामुळे हे शिक्षक सिंधुदुर्गातून कार्यमुक्त झाल्यानंतर रिक्त पदांच्या संख्येत पुन्हा वाढ होणार आहे. नव्या भरतीतील उपस्थित उमेदवारांचा विचार करता जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्त पदसंख्या पुन्हा सुमारे २२५ वर पोहोचणार असल्याचे राऊळ यांनी सांगितले. यामुळे सुरू असलेल्या भरतीतून शिक्षक मिळणार असले, तरी जिल्ह्यातील शिक्षक टंचाईचा प्रश्न पूर्णतः निकाली निघणार नसल्याचे चित्र आहे.
स्थानिक उमेदवारांची निराशा पवित्र पोर्टलद्वारे सुरू असलेल्या या शिक्षक भरतीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक उमेदवारांच्या पदरी मात्र अपेक्षेपेक्षा कमी यश आले आहे. जिल्ह्यातील केवळ २७ उमेदवारांची या भरतीत निवड झाली आहे. उर्वरित बहुतांश उमेदवार अन्य जिल्ह्यांतील आहेत. त्यामुळे भविष्यात पुन्हा आंतरजिल्हा बदली अथवा नव्या भरतीतून शिक्षक जिल्ह्याबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता, शिक्षकांची पदे दीर्घकाळ भरलेली ठेवण्याचे आव्हान कायम राहणार आहे.
तसेच आपल्याला माहीतच असेल, राज्य शासनाने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने राज्य अभ्यासक्रम आराखडा यापूर्वीच मंजूर केला आहे. आता पहिल्यांदा आगामी शैक्षणिक वर्षापासून पहिली व दुसरीचा अभ्यासक्रम बदलणार असून या वर्गांची पाठ्यपुस्तक निर्मिती पूर्ण झाली आहे. जानेवारीअखेर त्या पुस्तकांची छपाई सुरु होईल. मराठी शाळांमध्ये आता ‘सीबीएसई’प्रमाणेच अभ्यासक्रम असणार असून त्यादृष्टीने नियोजन पूर्ण झाले आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमधील पटसंख्या वाढावा, यासाठी पालकांचा कल लक्षात घेऊन सेमी इंग्रजीचे वर्ग सुरु केले जाणार आहेत. दरम्यान, शाळांच्या गुणवत्ता वाढीसाठी पटसंख्येच्या प्रमाणात विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी पुरेसे शिक्षक आवश्यक आहेत.
अजून एक म्हत्वचे म्हणजे, शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पा लवकरच राबविला जाईल, असे काही दिवसांपूर्वी जाहीर केले होते. त्यानुसार आता शालेय शिक्षण विभागाची कार्यवाही सुरु झाली आहे. जानेवारीअखेर जिल्हा परिषदांसह खासगी अनुदानित शाळांमधील रिक्त पदांच्या जाहिराती अपलोड करणे सुरु होईल. त्यानंतर फेब्रुवारी व मार्चमध्ये पात्र उमेदवारांकडून सेल्फ सर्टिफिकेट भरून घेतले जाईल आणि शेवटच्या टप्प्यात त्यांची गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यात गुणवत्तेनुसार संबंधित उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार असल्याचे शालेय शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले. पहिल्या टप्प्यातील पदभरतीनंतरही शिक्षक संवर्गातील मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेल्या जागांची भरती करण्यासाठी दुसरा टप्पा राबविण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यासाठी शिक्षक संघटना, लोकप्रतिनिधींमार्फत सातत्याने विचारणा होत आहे. त्यामुळे पदभरतीची तातडी असल्याने व पहिल्या टप्प्यात तलिस्मा कार्पोरेट प्रा. लि. कंपनीने चांगले काम केल्याचे विचारात घेऊन याच कंपनीस एक वर्ष अथवा मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या दोन प्रकारातील किमान एक जाहिरात यापैकी जे नंतर घडेल, त्या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या कंपनीला शासनाकडून ६८ लाख ८४ हजार १२० रुपये दिले जाणार आहेत.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















