JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

आरोग्य निरीक्षकांना एस-१३ वेतनश्रेणी मिळणार? महासंघाच्या पाठपुराव्यामुळे हालचालींना वेग! | Public Health Department

Public Health Department

सार्वजनिक आरोग्य विभागातील आरोग्य निरीक्षक संवर्गाच्या वेतनश्रेणीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या संवर्गाला महत्त्वाचा मानला जाणारा ‘एस-१३’ वेतन स्तर लागू करण्याची प्रक्रिया सुरू करण्याची मागणी राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाने केली आहे. यासाठी महासंघाने प्रशासनाला ताकीद दिली असून, या मागणीसंदर्भातील निवेदन आरोग्य सेवा सहसंचालक डॉ. संदीप सांगळे यांनी पुढील निर्णयासाठी आरोग्य सेवा (प्राथमिक) संचालकांकडे पाठवले आहे. त्यामुळे आरोग्य निरीक्षक संवर्गाला एस-१३ वेतन स्तर लागू होण्याबाबतच्या पुढील निर्णयाकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आरोग्य निरीक्षक संवर्गाला एस-१३ वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीला आता अन्य संवर्गांच्या वेतनश्रेणीचे दाखले देत बळकटी देण्यात येत आहे. राज्य आरोग्य कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष विजय मोहरकर यांनी यासंदर्भात आरोग्य सेवा सहसंचालकांकडे निवेदन सादर केले आहे. शासकीय प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी या पदासाठी बी.एस्सी. आणि डी.एम.एल.टी. डिप्लोमा ही शैक्षणिक पात्रता असतानाही संबंधित संवर्गाला एस-१३ वेतनश्रेणी लागू आहे. तसेच, केंद्र सरकार आणि काही महानगरपालिकांनी मलेरिया निरीक्षक संवर्गालाही एस-१३ वेतनश्रेणी मंजूर केली आहे. त्यामुळे आरोग्य निरीक्षक संवर्गालाही समान वेतन स्तर लागू करण्याची मागणी महासंघाने केली आहे.

आरोग्य निरीक्षकांच्या कामाचे स्वरूप, शैक्षणिक पात्रता आणि जबाबदाऱ्यांचे वाढते क्षेत्र लक्षात घेता, त्यांना योग्य वेतनश्रेणी मिळावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. राज्य वेतन सुधारणा समितीने वाढीव शैक्षणिक पात्रता म्हणजेच बी.एस्सी.च्या आधारावर वेतनश्रेणी निश्चित केली असली, तरी आरोग्य निरीक्षकांना अपेक्षित वेतनलाभांपासून वंचित ठेवण्यात आल्याचा महासंघाचा आरोप आहे. स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमाच्या आधारे वेतनश्रेणी निश्चित करण्याच्या निकषांमध्येही अन्याय होत असल्याची भूमिका महासंघाने मांडली आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या रोग नियंत्रण, सर्वेक्षण, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीत आरोग्य निरीक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे त्यांची वाढलेली शैक्षणिक पात्रता आणि कामाची व्यापक जबाबदारी विचारात घेऊन ‘समान काम, समान वेतन’ या तत्त्वानुसार आगामी वेतन आयोगात आरोग्य निरीक्षक संवर्गाला एस-१३ वेतनश्रेणी लागू करण्याचा धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी महासंघाची मागणी आहे. दरम्यान, या प्रश्नावर सार्वजनिक आरोग्य विभागाचे सचिव, आरोग्य सेवा आयुक्त आणि सहसंचालक यांच्याकडून केवळ माहिती घेतली जात असल्याने प्रत्यक्ष निर्णय प्रक्रियेबाबत अनिश्चितता कायम असल्याची नाराजीही महासंघाने व्यक्त केली आहे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
Public Health Department

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड