शिक्षक, कर्मचारी पदाची लवकरच भरती सुरु

Shikshak Bharti 2021

Shikshak Bharti 2021: राज्यातील वरिष्ठ अनुदानित महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची माहिती सादर करावी, असे आदेश उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने यांनी सर्व विभागीय सहसंचालकांना दिले आहेत.

राज्यातील अनुदानित महाविद्यालयील शिक्षक, कर्मचाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. यापूर्वी 40 टक्‍के रिक्‍त पदे भरण्यास परवानगी दिली होती. मात्र, त्यातील सर्व पदेही भरलेली नाहीत. त्यातच करोनामुळे शासनाने काटकसरीचे धोरण अवलंबिले असून नवीन पद भरतीला निर्बंध घातले असून याबाबत वित्त विभागाने 4 मे 2020 रोजी आदेशही काढले आहेत.

 

शिक्षक, कर्मचाऱ्यांच्या रिक्‍त पदांची भरती त्वरीत सुरू करण्याची मागणी होत आहे. विविध संघटनांकडून आंदोलनाचे इशारेही देण्यात आले आहेत. दरम्यान, कोणत्या महाविद्यालयात किती पदे रिक्‍त आहेत याचा आढावा घेण्यासाठी माहितीची जमवाजमव सुरू झाली आहे. 1 ऑक्‍टोबर ही तारीख निश्‍चित करून 2018, 2019, 2020 या वर्षातील विद्यार्थी संख्येच्या आधारावर अनुज्ञेय, कार्यरत व रिक्‍त पदांची माहिती एकत्रित करण्यात येणार आहे.
उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सांमत यांनी महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांची 100 टक्‍के पदे टप्प्पाटप्प्याने भरण्याबाबत विचार केला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे रिक्‍त पदांची माहिती जमा करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. 25 फेब्रुवारीपर्यंत माहिती सादर करण्यासाठी मुदत दिली आहे. विभागीय सहसंचालकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालयांना माहिती सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सर्व महाविद्यालयांनी माहिती जमा झाल्यानंतर त्याचा अहवाल तयार करून उच्च शिक्षण संचालक कार्यालयामार्फत शासनाकडे सादर करावा लागणार आहे.

जिल्हा परिषद अंतर्गत शाळांमध्ये विषय पदवीधर शिक्षक, उच्चश्रेणी मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व शिक्षक विस्तार अधिकारी यांची शेकडो पदे रिक्त आहेत, त्याचा परिणाम शिक्षक विभागाच्या सनियंत्रण व पर्यवेक्षिय यंत्रणेवर होत आहे.

संवर्गनिहाय रिक्त पदे

 • शिक्षक विस्तार अधिअक्रि : 34
 • केंद्रप्रमुख : 104
 • उच्च श्रेणी मुख्याध्यापक : 38

विषय पदवीधर शिक्षक

 • भाषा विषय शिक्षक : 76
 • विज्ञान विषय शिक्षक : 10
 • समाजशास्त्र : 9

Shikshak Bharti 2021


बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये लवरकच 133 अतिथी शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तर राज्यातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये 3473 अतिथी शिक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय शिक्षण खात्याने घेतला आहे. त्यानूसार बिएडधारकांकडून अर्ज मागिविली जाणार आहेत. 

राज्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. मात्र शिक्षण खाते रिक्‍त जागा भरण्याऐवजी दरवेळी अतिथी शिक्षकांची नेमणुक करुन वेळ मारुन नेत आहे. 2020 मध्ये कोरोनाचे संकट असल्याचे सांगत सरकारी कर्मचाऱ्यांची भरती न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे लवकर शिक्षक भरती होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून यावेळीही विद्यार्थ्यांना शिकविण्याची जबाबदारी अतिथी शिक्षकांवरच असणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्हातील सरकारी माध्यमिक शाळांमध्ये विविध विषयाच्या शिक्षकांच्या जागा रिक्‍त असून या भरती करणे आवश्‍यक बनले आहे. मात्र शाळा सुरु होऊन एक महिन्याचा कालावधी संपल्यानंतर आता अतिथी शिक्षक भरतीचा निर्णय घेण्यात आला आहे.

2020- 21 च्या शैक्षणिक वर्षाकरिता अतिथी शिक्षक भरती होणार असल्याने तीन ते चार महिने नोकरी करण्यासाठी बिएडधारक पुढे येणार का? असा प्रश्‍न निर्माण होणार आहे. माध्यमिक प्रमाणेच सरकारी शाळांमध्येही शिक्षकांच्या जागा रिक्‍त आहेत. मात्र सध्या फक्‍त सरकारी माध्यमिक शाळांमध्येच शिक्षकांच्या जागा भरती केल्या जाणार असून पहिली ते पाचवीपर्यंतच्या शाळा सुरु झाल्यानंतर प्राथमिक शाळांमध्ये अतिथी शिक्षक भरतीचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती शिक्षण खात्यामार्फत देण्यात आली आहे. दरवेळी अतिथी शिक्षकांची नेमणुक केली जाते, परंतु त्यांना वेळेत वेतन देण्याकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे नोकरी करुही वेतनासाठी शिक्षकांना वाट पहावी लागते.

Maharashtra Shikshak Bharti 2021 – Shikshak Bharti 2021 update Pavitra Portal Shikshka Bharti 2021 – Maharashtra Shikshak Bharti Updates for 2021 are declared here. The updates & Details about Shishak Bharti will be updated on this page. As per the latest News Shikshka Bharti is on hold due to Corona effect. But Large number candidates are waiting for this Shikshka Bharti Online registrations process 2021.

३० जानेवारी २०२१ अपडेट – शिक्षण विभागात सरळसेवा भरती होणार आहे. याबाबत शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. शिक्षण खात्यात कनिष्ठ लिपिक पदासाठी 266 पदांची भरती निघाली आहे. त्यामुळे शिक्षण खात्यात नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचानिर्णय घेण्यात आला आहे.

GR COPY
GR COPY FOR REFRENCE

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ व विभागीय मंडळातील कनिष्ठलिपिक संवर्गातील एकूण२६६पदांपैकी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना वगळून इतर प्रवर्गातील ५०% पदांसाठी नियुक्ती देण्यास मान्यता देण्याचानिर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.


Shikshak Bharti 2021 – राज्यातील अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत पवित्र पोर्टलच्या माध्यमातून होणारी शिक्षक भरती पुन्हा आरक्षण बदल झाल्याने लांबली आहे. या भरतीला अजून मुहूर्त सापडेना त्यामुळे उमेदवारांमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने शैक्षणिक संस्थातील शिक्षक भरती पारदर्शी व्हावी या या हेतूने राज्य शासनाने पवित्र पोर्टलची निर्मिती केली. मात्र, या पवित्र भरतीला सुरुवातीपासूनच घरघर लागली, मध्यंतरीच्या काळात शासकीय कोट्यातील 5800 जागा भरल्या उर्वरित जागा 6000 अजून भरणे बाकी आहे. या मध्ये खाजगी शैक्षणिक संस्थांचा मोठा सहभाग आहे.

या भरतीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांच्या आरक्षणामध्ये सामाजिक व शैक्षणिकदृष्टया मागास (SEBC) वर्गातील आरक्षणास अंतरिम स्थागिती दिलेली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाने याचिकांच्या आधारे शासनाने 23 डिसेंबर 2020 मधील तरतुदीनुसार लॉगिन करुन 14 जानेवारीपर्यंत प्रवर्ग बदल करून घेण्यास सांगितले आहे. त्यामुळे ही भरती प्रक्रिया पुन्हा रखडली आहे.

यानंतर आता 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. त्यात बदल झाला तर पुन्हा आरक्षणाचा बदल उमेदवारांना करावा लागणार आहे. याला मोठा कालावधी लागणार असल्याने भरती प्रक्रिया पुन्हा रखडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तरी शासनानेही भरती बाबत ठोस निर्णय घेऊन एकदाचा हा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी उमेदवारांतून होत आहे.

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती व्हावी यासाठी गेले अनेक वर्ष आम्ही संघटनेच्या माध्यमातून लढा देत आहोत. एसीबीसी या प्रवर्गात जे उमेदवार आहेत व ज्यांना ईडब्ल्यूएस या प्रवर्गाचा लाभ घ्यायचा आहे त्यांना 14 जानेवारीपर्यंत लॉगिन करून बदल करावयाची मुदत दिली आहे. बदलाची मुदत 26 जानेवारी अखेर करावी व त्यानंतर ही भरती प्रक्रिया तत्काळ राबवावी. 
– ऍड. परमेश्वर इंगोले-पाटील, राज्य अध्यक्ष, रयत संकल्प डी. एड्‌., बी. एड्‌ संघटना.


महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे २६६ कनिष्ठ लिपिक पदांसाठी फेब्रुवारीमध्ये भरती प्रक्रिया पूर्ण झाली. या परीक्षार्थीच्या वेतनावर होणारा खर्च मंडळ निधीतून होणार असल्याने त्याचा शासनावर कोणताही आर्थिक भार येणार नाही. यामुळे पुढची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी राज्य मंडळाने शालेय शिक्षण विभागाला केली आहे. ही भरती प्रक्रिया ४ मेच्या निर्णयाआधी पूर्ण झाली असतानाही शालेय शिक्षण मंत्री, प्रधान सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाद्वारे टोलवाटोलवी करून उर्वरित कार्यवाही पूर्ण केली जात नसल्याने राज्यातील शेकडो परीक्षार्थीमध्ये प्रचंड असंतोष आहे.

फेब्रुवारीमध्ये २६६ पदांसाठी प्रमाणानुसार १०६७ उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची छाननी करण्यात आली. मात्र, छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निवड यादी मंडळाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यापूर्वीच टाळेबंदी जाहीर झाल्याने नियुक्ती प्रक्रिया रखडली. दरम्यान, वित्त विभागाने ४ मेच्या शासन निर्णयानुसार आर्थिक निर्बंध लागू करून कोणत्याही प्रकारची नवीन पदभरती करू नये असे नमूद केले. मात्र, पदभरतीची प्रक्रिया ही फेब्रुवारी २०२० ला म्हणजे पदभरती बंदीच्या निर्णयापूर्वीच पूर्ण झाली आहे. असे असतानाही राज्य शासनाने शिक्षण मंडळाचा नियुक्ती आदेश ४ मेच्या निर्णयाचा दाखला व वेतनावरील खर्चाचे कारण देत नियुक्तीचा प्रस्ताव धुडकावला. यावर राज्य शिक्षण मंडळाने पुन्हा ८ ऑक्टोबरला शालेय शिक्षण विभागाला पत्र लिहून सदर परीक्षार्थीच्या वेतनावरील होणारा खर्च हा मंडळ निधीतून होणार असल्याने त्याचा शासनावर कोणताही आर्थिक भार नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यामुळे रखडलेली भरती प्रक्रिया पूर्ण करून परीक्षार्थीना नियुक्ती देण्याची मान्यता मागितली. आता तांत्रिकदृष्टय़ा नियुक्ती प्रक्रियेमध्ये कुठलीही आडकाठी नसताना केवळ सरकारच्या अनास्थेपायी शालेय शिक्षण आणि सामान्य प्रशासन विभागाने एकमेकांकडे बोट दाखवत संपूर्ण प्रक्रिया थांबवून ठेवली आहे.

परीक्षार्थीच्या निवेदनाकडे सगळ्यांचे दुर्लक्ष

परीक्षार्थीकडून गत सहा महिन्यांपासून शालेय शिक्षण मंत्री वर्षां गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू, कृषीमंत्री दादा भुसे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आले. परंतु कुणीही या प्रश्नाला गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप परीक्षार्थीनी केला आहे. चौकशीसाठी शिक्षण मंडळाकडे गेले असता ते शिक्षण मंत्र्यांचे नाव पुढे करतात, शिक्षण मंत्री व राज्यमंत्री सचिवांकडे बोट दाखवतात तर सचिव सामान्य प्रशासन विभाग मराठा आरक्षणाची स्थगितीचे कारण सांगून मुख्यमंत्र्यांकडे बोट दाखवतात. अशा स्थितीत न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न या परीक्षार्थीना अस्वस्थ करीत आहे.


वयोमर्यादेची अडचण आलेल्या उमेदवारांना शिक्षक भरतीमध्ये संधी

९ सप्टेंबर २०२० अपडेट – पवित्र संकेतस्थळाद्वारे राबवण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीसाठी खासगी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी वयोमर्यादा लागू करण्यात आलेली होती. त्यामुळे वय जास्त असलेल्या अनेक उमेदवारांना मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत. मात्र, आता महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार ७ ते १७ सप्टेंबर या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम भरून देण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित न केलेल्या, आता नव्याने प्राधान्यक्रम देणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या समांतर आरक्षणाची (उदा. महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू, अनाथ) नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे समांतर आरक्षणामध्ये दुरुस्ती करता येणार नसल्याने उमेदवारांनी समांतर आरक्षणविषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करण्याची सूचना करण्यात आली आहे. जून २०१९ मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित केलेल्या उमेदवारांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे संबंधित उमेदवारांना लॉगिन उपलब्ध होणार नसल्याची माहिती शिक्षण विभागाने पवित्र संके तस्थळाद्वारे दिली आहे.


२५ ऑगस्ट २०२० अपडेट – शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा सुरू करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने शिक्षक भरतीसाठी पावले उचलली आहेत. त्यानुसार पवित्र संके तस्थळावर नोंदणी केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदभरती करण्यासाठी प्राधान्यक्रम भरून निश्चित करण्याची संधी दिली असून, येत्या ३१ ऑगस्टपर्यंत संबंधित उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम नोंदवता येणार असल्याचे पवित्र पोर्टलवर स्पष्ट करण्यात आले.

पवित्र संकेतस्थळावर देण्यात आलेल्या सूचनांनुसार, ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्याने काही उमेदवारांना प्राधान्यक्रम भरता आलेले नाहीत. मात्र आता खाजगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण श्रेणी आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता येणार आहेत. अकरावी, बारावीत ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असलेल्या उमेदवारांना प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत. परंतु असे उमेदवारांना पदव्युतर पदवीला किमान द्वितीय श्रेणी असेल आणि त्याची नोंद पवित्र संकेतस्थळावर केली असल्यास त्यांना प्राधान्यक्रम देता येणार आहेत. नववी, दहावी या गटातील माध्यमिक पदासाठी पदवीस्तरावर उत्तीर्ण; पण ५० टक्क्यांपेक्षा कमी गुण असल्याने प्राधान्यक्रम देता न आलेल्या उमेदवारांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देता येतील. वयाच्या नियमामुळे प्राधान्यक्रम देऊ न शकलेल्या उमेदवारांना महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम नोंद केल्यानंतर भरता येतील. उमेदवारांना समांतर आरक्षणाची नोंद एकदाच करता येणार आहे. जून २०१९ पूर्वी मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम निश्चित के लेल्या उमेदवारांनी नव्याने प्राधान्यक्रम देण्याची गरज नाही. त्यांना लॉगिन उपलब्ध होणार नसल्याची सूचना पवित्र संके तस्थळावर देण्यात आली आहे.

दरम्यान पवित्र संकेतस्थळावर प्रशासकीय सूचना वारंवार दिल्या जातात. मात्र भरती प्रक्रिया पुढे सरकलेली नाही. आता तरी शिक्षण विभागाने तातडीने भरती प्रक्रिया राबवण्याची कार्यवाही करावी अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात आली आहे.

करोनाच्या लॉकडाऊनचा परिणाम मुलाखतीशिवाय शिक्षक भरती प्रक्रियेवर झाला आहे.आता ही प्रक्रिया एप्रिलनंतर होईल, अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

राज्य शासनाने शिक्षक भरतीसाठीचे पवित्र पोर्टल रद्द करावे व शाळांना शिक्षक भरतीचे स्वातंत्र्य द्यावे, असा आग्रह राज्य शिक्षण संस्था महामंडळाने शासनाकडे धरला आहे. प्रलंबित प्रश्‍नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करण्याचा निर्णयही महामंडळाने घेतला आहे.

As you know, Shikshak Bharti 2021is expected for 10,001 Posts in all the districts of Maharashtra. All the vacancies are classified by different management authorities. We have given all the distribution of Vacancies by their Management.

Shikshak Bharti 2021 Vacancy Details 

ManagementNo. of SansthaGrand Total
Zilla Parishad Schools 255152
Municipal Corporation Schools 11563
Nagar Palika Schools 52261
Private Aided – Primary125261
Private Aided – Secondary6123764
TOTAL10,001

 

Maharashtra Shikshak Bharti 2021 Details 

Department Name
Education Department, Maharashtra
Recruitment Name
Teachers Recruitment
Name of PostsShikshak (Teacher)
Total Vacancies10,001
Application ModeOnline
Official Websitemaharashtra.gov.in

Eligibility Criteria For Maha Shikshak Bharti

Educational QualificationD.Ed / B.Ed
Age Limit18 to 43 Years

Vacancy Details

Shikshak (Teacher)10,001

 

Shikshak Bharti 2021 – राज्यात पवित्र पोर्टल मार्फत गेल्या तीन वर्षांपासून शिक्षक भरती प्रक्रिया सुरू आहे. दहा वर्षानंतर होत असलेल्या या भरती प्रक्रियेची डीटीएड, बीएड पदविका, पदवीधारक बेरोजगारांना प्रतीक्षा आहे. मात्र, विविध टप्प्यावर ही प्रक्रिया अडखळली. त्यात आता करोनाच्या प्रादुर्भावाने केलेल्या लॉकडाऊनमुळे ही भरती थांबवण्यात आल्याचे शिक्षण विभागाच्या वेबसाइटवर म्हटले आहे. त्यात असे म्हटले आहे की, मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह पद भरती करोनामुळे सध्या बंद असून, ३१ मार्च दरम्यान परिस्थितीचा आढावा घेऊन योग्य निर्णय घेण्यात येईल. शिक्षक भरती प्रक्रियेत तत्कालीन सरकारने राज्यातल्या २४ हजार जागा भरण्यात येतील असे सांगितले होते. प्रत्यक्षात पाच हजार ते सहा हजार जागाच भरण्याची प्रक्रिया झाली. त्यामध्येही शासकीय पातळीवरच्या संस्थांमधीलच शिक्षक भरती प्रक्रिया झाली. खासगी संस्थांवरील भरतीची प्रक्रिया कधी आणि केव्हा होणार, असा प्रश्‍न अनेक महिन्यांपासून विद्यार्थ्यांना पडला आहे. राज्यात शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६० हजारपेक्षा अधिक आहे तर, अभियोग्यता चाचणी यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दीड लाखांपेक्षा अधिक आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी भरतीची प्रक्रिया होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अशा करण्यात आल्या सूचना

पवित्र प्रणाली मार्फत मुलाखतीशिवाय पदभरतीच्या नऊ ऑगस्टच्या प्रसिद्ध केलेल्या यादीनंतर विषयनिहाय, प्रवर्गनिहाय रिक्त राहिलेली पदे, गैरहजर उमेदवारांमुळे रिक्त राहिलेली पदे, उमेदवार अपात्र ठरल्यामुळे रिक्त राहिलेल्या पदासाठीची निवड प्रक्रिया प्रथम करण्यात येणार आहे. ही कार्यवाही मुलाखतीसाठीची यादी जाहीर करण्यापूर्वी करण्यात येणार आहे. मुलाखतीसह पद भरतीमध्ये उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ज्या उमेदवारांना ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत, त्यांना एमईपीएसच्या नियमानुसार खासगी माध्यमिक शाळेसाठी उत्तीर्ण आणि उच्च माध्यमिक शाळेसाठी किमान द्वितीय श्रेणी असणाऱ्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम द्यावयाचे आहेत.

ज्या उमेदवारांना यापूर्वी अकरावी, बारावीच्या गटांसाठी ५० टक्केपेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत, परंतु असे उमेदवार पदव्युत्तर पदवी किमान द्वितीय श्रेणीमध्ये उत्तीर्ण असतील त्यांना मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम घेण्यात येणार आहेत.

नववी, दहावी या गटातील पदासाठी पदवी स्तरावर उत्तीर्ण परंतु ५० टक्के पेक्षा कमी गुण असल्यामुळे प्राधान्यक्रम आलेले नाहीत, अशा उमेदवाराकडून मुलाखतीसह पदासाठीचे प्राधान्यक्रम देण्यात येणार आहेत. खासगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील रिक्त पदासाठी उच्च वयोमर्यादा लागू करण्यात आली होती. त्यामुळे कमाल वय या कारणास्तव ज्या उमेदवारांना मुलाखतीसह पद भरतीचा पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम देता आलेले नाहीत, त्यांना महाराष्ट्र खासगी शाळातील कर्मचारी (सेवेच्या शर्ती ) नियमावली १९८१मधील तरतुदीनुसार प्राधान्यक्रम देण्यात येणार आहे.

काळजीपूर्वक नोंद गरजेची

या उमेदवारांनी यापूर्वी मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले नाहीत व आता नव्याने मुलाखतीसह पदांचे प्राधान्यक्रम देणार आहेत, त्यांना त्यांच्या समांतर आरक्षणाची नोंद एकदाच करता येईल. त्यामुळे उमेदवारांनी एकदा माहिती सेव्ह केल्यानंतर पुन्हा समांतर आरक्षण दुरुस्त करण्याची सुविधा दिली नसल्याने अशा उमेदवारांनी समांतर आरक्षण विषयक माहिती काळजीपूर्वक नोंद करावी. एकदा माहिती नोंद करून सेव्ह करून येणाऱ्या फॉर्मसमोर ओकेवर क्लिक केल्यानंतर पुन्हा माहितीमध्ये बदल करता येणार नाही. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जून २०१९मध्ये मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या संस्थांचे प्राधान्यक्रम लॉक केलेले आहेत, त्यांनी पुन्हा नव्याने प्राधान्यक्रम देण्याची आवश्यकता नाही.33 Comments
 1. Priyanka yogesh jagtap says

  Pavitra portal shikshak bharticha form kothe bharaycha ani kasa??

  1. MahaBharti says

   Sadhyna Navin arj prakriya suru vhychi aahe, suru zalyavr aamhi Update prakashit karuch…

   Thanks.. Keep Visiting http://www.MahaBharti.in

 2. Mira pawar says

  Keva form application date yenar

 3. Nalini deshmukh says

  Sir ded jhale le parat application karu shaktil ka tet pass napass at nahi na fakt ded ..bed ch pahije ka sir please mala sanga sir

 4. Megharaj says

  When will be next TET exam will be held .plz guide us and reply should b given us..and how can govt arrange the tet ?reply plz

 5. रायबा गावंडा says

  अहो 71/ आहेत तरी घरीच बसलो आहोत हिंदी माध्यमातून

 6. Rupali says

  D.ed zhale ahe tari tet avashyak ahe ka.plz tell me

 7. रामचंद्र सूर्याजी मालुसारे says

  Bped भर्ती आहे का

 8. Virdhaval nandu shinde says

  Sir mala CTET la 53 Mark ahe mi pavitra portla form bharu shakto ka

 9. Ujwala pawar says

  I have completed my post graduation in commerce can i apply for this post.

 10. Sonali says

  Tet pass napas sagle pavitr portal vr form bharu shaktat ka

 11. अमोल सुखदेव जाधव says

  सर मला ctet ला 81 मार्क आहेत

 12. Supriya patil says

  Tet pass asel tarch ha form bharaycha aahe ka sir please sanga

 13. Kalpana mate says

  Sir mala ctet exam December 17 zalelya exam madhe 90marks hote pan mi registration kele nahi tar punha registration karu shakte ka

 14. Jayalaxmi says

  When pavitra portal registration will start???
  Waiting to do registration…? Please let me know about registration again when it will going to come?

 15. Jayshri madhukar dhake says

  Sir maz Msc BEd ahe bharti kdhi suru honar ahe

 16. Ankush says

  Next portal kevha honar tet clear jhalay aahayt taynchay

 17. Raj says

  Kala Shikshak Bharti kadhi karnar

 18. Rambhau kashinath Gode says

  Sir Maj D.ed B.A graduation aahe

 19. अमोल ठोंबरे says

  एम.ए झालोय त्यावर भरती नाही का ?

 20. Snehal kulkarni says

  Application kuthe karchye ani kiti date ahe tyache updates dya

 21. Pranita kale says

  Sir maz pn d.el.ed. zalay mla bhetu shakal ka job

 22. Pranita kale says

  Sir plz answer dya

 23. Dipali patil says

  Sir 12pass la
  pan ahe ka

 24. Savitra pangare says

  Sir mi maza resume kuthe submit krava

 25. Kavita says

  Pavitra portal vr form kuthe bharaycha shikshak bharti sathi. Pls reply

 26. MahaBharti says

  Update lavkarch prakashit karuch….!!

 27. Dipinti yelve says

  D.ed bharti kadhee ahe n kay procedure ahe

 28. Pallavi Jagtap says

  Sir maz M.A,BEd,MEd ahe bharti kdhi suru honar ahe

 29. Prajakta ghawale says

  Bharti kdhi suru honar ahe ani last date ky ahe

 30. Bhagyashri says

  Hello sir,
  CTET 2019 dec pass out ahe 90 marks ahet open madhun tr Abhiyogyata test la apply karu shket ka…. Ki only TET haviye….. Sir plz update…

 31. ROHINI says

  sir me B.COM karun E.C.C.ED KEL AHE

 32. Pallavi Kadam says

  Sir,me registration kelel aahe 2019 madhe.tr mala parat karav lagel ka registration? Aani maza mobile number change zala aahe.tr tyamadhe bond karavi lagel ka?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड