महाराष्ट्रात 11,587 शेतकरी मित्रांची मेगा भरती; पात्रता फक्त 12वी पास; 30% जागा महिलांसाठी-जिल्हानिहाय किती पदे? संपूर्ण यादी येथे पाहा ! Shetkari Mitra Bharti 2026

Shetkari Mitra Recruitment 2026

Shetkari Mitra Bharti 2026: महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी!! गरजू उमेदवारांना आता मिळणार कृषी विभागात थेट नोकरी!कृषी विभागाच्या आत्मा (Agricultural Technology Management Agency – ATMA) योजनेअंतर्गत ‘शेतकरी मित्र’ निवडीसाठी सन 2026-27 च्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांनुसार महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 11,587 शेतकरी मित्रांची निवड करण्याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. शेतकरी आणि कृषी विभाग यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून शेतकरी मित्र काम करणार असून, त्यांना दरमहा ₹1,500 मानधन म्हणजेच वर्षाला ₹18,000 मानधन देय राहणार आहे. या भरती बद्दल ( Shetkari Mitra Bharti 2026) अधिक माहिती खाली जरूर जाणून घ्या आणि आपल्या मित्रांना देखील शेअर करा

शेतकरी मित्र म्हणजे काय? Maharashtra Shetkari Mitra Bharti 2026

शेतकरी मित्र हा आत्मा यंत्रणा, कृषी विभाग आणि गावपातळीवरील शेतकरी यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करणार आहे. त्यामुळे अनुभवी, प्रयोगशील आणि कृषी क्षेत्रात आवड असलेल्या शेतकऱ्यांची निवड करण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन कृषी तंत्रज्ञान स्वीकारणारा, त्याचा प्रसार करण्यासाठी स्वतःहून वेळ देणारा आणि इतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन कृषी विस्ताराचे काम करणारा शेतकरी या भूमिकेसाठी अपेक्षित आहे.

Maharashtra Shetkari Mitra Bharti 2026

शेतकरी मित्रासाठी किमान पात्रता

मार्गदर्शक सूचनांनुसार शेतकरी मित्र ( Maharashtra Shetkari Mitra Bharti 2026) होण्यासाठी पुढील किमान पात्रता आवश्यक आहे:

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे आणि कमाल 60 वर्षे असावे.
  • संबंधित सहायक कृषी अधिकाऱ्याच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी आणि शेतकरी असणे आवश्यक आहे.
  • उमेदवाराविरुद्ध कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झालेला नसावा.
  • शैक्षणिक पात्रता किमान 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • सोशल मीडिया हाताळण्याचे किमान कौशल्य असणे आवश्यक आहे.
  • शेतकरी मित्राने दररोज किमान 2 तास कृषी विभागाचे काम करणे आवश्यक आहे.
  • शेतकरी मित्राने ही भूमिका केवळ मानधन मिळविण्याचे साधन म्हणून पाहू नये, अशी स्पष्ट अपेक्षा मार्गदर्शक सूचनांमध्ये व्यक्त करण्यात आली आहे.

पूर्ण माहिती आणि PDF

महिलांसाठी 30 टक्के सहभाग अनिवार्य

शेतकरी मित्रांच्या निवडीत 30 टक्के महिलांची निवड करणे अनिवार्य करण्यात आले आहे. हा सहभाग निश्चित करण्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्यांनी त्यांच्या तालुक्यातील एकूण गावांपैकी 30 टक्के गावे लॉटरी पद्धतीने केवळ महिलांसाठी राखीव करावीत, असे निर्देश आहेत.

शेतकरी मित्रांची निवड कशी होणार?

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित सहायक कृषी अधिकाऱ्यांच्या मुख्यालयाच्या ग्राम कृषी विकास समितीकडे (GKVS) सादर करायचे आहेत. ज्या गावांमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन झालेली नाही, त्या गावांनी ती तातडीने स्थापन करून निवड प्रक्रिया राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

शेतकरी मित्रांची निवड कशी होणार?

इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज संबंधित सहायक कृषी अधिकाऱ्यांच्या मुख्यालयाच्या ग्राम कृषी विकास समितीकडे (GKVS) सादर करायचे आहेत. ज्या गावांमध्ये ग्राम कृषी विकास समिती स्थापन झालेली नाही, त्या गावांनी ती तातडीने स्थापन करून निवड प्रक्रिया राबवावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

उमेदवारांची निवड शैक्षणिक पात्रतेच्या प्राधान्यक्रमानुसार केली जाणार आहे:

  1. पदव्युत्तर पदवीधारक
  2. पदवीधारक
  3. पदविकाधारक
  4. बारावी उत्तीर्ण
  5. दोन किंवा अधिक उमेदवारांची सर्वोच्च शैक्षणिक पात्रता समान असल्यास त्या पात्रतेमध्ये सर्वाधिक गुण मिळवलेल्या उमेदवाराची निवड केली जाईल.

निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने

ग्राम कृषी विकास समिती प्राप्त अर्जांची छाननी करेल आणि ठरावाद्वारे शेतकरी मित्राची निवड अंतिम करेल. निवड प्रक्रियेची माहिती पुढील ग्रामसभेसमोर ठेवणे तसेच प्राप्त अर्ज, गुणवत्ता यादी आणि निवडीचे निकष ग्रामपंचायतीच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. प्रत्येक मंजूर सहायक कृषी अधिकारी पदासाठी एक शेतकरी मित्र निवडण्यात येणार आहे. निवड कालावधी दोन वर्षांचा असेल. मात्र ही निवड आत्मा योजनेअंतर्गत उपलब्ध निधीच्या अधीन राहील आणि सक्षम प्राधिकरणाला कोणत्याही टप्प्यावर निवड रद्द करण्याचा अधिकार राहील. तसेच, एकदा शेतकरी मित्र म्हणून निवड झालेल्या व्यक्तीची पुन्हा शेतकरी मित्र म्हणून निवड करता येणार नाही. उमेदवार हा संबंधित कार्यक्षेत्रातीलच असणे बंधनकारक आहे.

शेतकरी मित्रांची प्रमुख कामे

शेतकरी मित्रांना गावपातळीवर विविध कृषीविषयक कामे करावी लागणार आहेत. त्यामध्ये पुढील प्रमुख जबाबदाऱ्या आहेत:

— महिला/पुरुष शेतकरी गट FIG, पीकनिहाय शेतकरी गट CIG आणि महिला अन्न सुरक्षा गट FSG तयार करण्यास मदत करणे.
— गटांची क्षमता बांधणी, मूल्यांकन व सर्वेक्षणास सहाय्य करणे.
— नैसर्गिक शेती आणि आत्मा योजनेंतर्गत शेतीशाळेसाठी लाभार्थी निवडणे.
— शेतीशाळा राबविण्यास मदत करणे आणि सर्व वर्गांना उपस्थित राहणे.
— ग्रामसभेत सहभागी होऊन कृषी व कृषी संलग्न विभागांच्या योजनांची माहिती देणे.
— नैसर्गिक शेतीचा गावपातळीवर प्रचार व प्रसार करणे.
— कृषी तंत्रज्ञान व माहितीचा प्रसार करणे.
— तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बोलावलेल्या बैठकीस उपस्थित राहणे.
— आत्मा योजनेंतर्गत प्रात्यक्षिकांच्या तुलनात्मक नोंदी ठेवणे.
— शेतकरी प्रशिक्षणाच्या आयोजनासाठी पूर्वतयारी व सहाय्य करणे.
— कृषी विभागाच्या विविध योजना, मोहिमा, डिजिटल शेतीशाळा व इतर कार्यक्रमांचा प्रचार-प्रसार करणे.
— तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीने दिलेली कामे पार पाडणे.
— आपल्या कार्यक्षेत्रात शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करणे.

निवडीनंतर प्रशिक्षण आणि ओळखपत्र

  • शेतकरी मित्रांची निवड झाल्यानंतर तालुका किंवा जिल्हास्तरावर प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. आवश्यकतेनुसार कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापीठ आणि कृषी संशोधन केंद्र येथे क्षेत्रभेटी व सहलींचे आयोजन केले जाऊ शकते.
  • कृषी विभागामार्फत शेतकरी मित्रांना आत्मा योजनेंतर्गत कार्यरत असल्याचे ओळखपत्र देण्यात येईल. कार्यकाळ संपल्यानंतर हे ओळखपत्र तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक राहील.
  • दोन वर्षांचा कार्यकाळ, पण कामगिरीच्या आधारे पुढील वर्षाची संधी
  • शेतकरी मित्रांची निवड दोन वर्षांसाठी असली तरी पहिल्या वर्षानंतर त्यांच्या कामाचे वार्षिक मूल्यांकन केले जाईल.
  • वार्षिक मूल्यांकनात एकूण 125 गुण असतील. त्यापैकी तांत्रिक बाबींसाठी 100 गुण आणि नाविन्यपूर्ण/उल्लेखनीय कामासाठी 25 गुण असतील.

तांत्रिक मूल्यांकनात प्रमुखतः पुढील बाबींचा समावेश आहे:

  • शेतीशाळा वर्गांचे आयोजन व उपस्थिती
  • FIG/CIG/FSG गट स्थापना
  • गट सर्वेक्षण
  • ग्रामसभेतील उपस्थिती
  • लक्षांकाच्या तुलनेत साध्य केलेल्या टक्केवारीनुसार गुण देण्यात येतील. 91 ते 100 टक्के साध्य झाल्यास 100 गुण, तर 81-90 टक्के साध्य झाल्यास 80 गुण, 71-80 टक्के साध्य झाल्यास 60 गुण आणि पुढील प्रमाणात गुणांकन केले जाईल.
  • 75 किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या शेतकरी मित्रांची सेवा पुढील एका वर्षासाठी सुरू ठेवली जाईल. 75 पेक्षा कमी गुण मिळाल्यास सेवा पुढे सुरू ठेवण्याबाबत पात्रता राहणार नाही आणि त्यांच्या जागी नवीन शेतकरी मित्राची निवड केली जाऊ शकते.

गैरवर्तन किंवा गुन्हा आढळल्यास कारवाई

शेतकरी मित्र नादार घोषित झाला, गैरवर्तन करताना आढळला किंवा त्याच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल झाल्याचे निदर्शनास आले, तर ग्राम कृषी विकास समितीच्या ठरावानुसार त्याला तातडीने पदावरून काढून टाकता येईल.

तसेच शेतकरी मित्रांना कृषी विभागात कायमस्वरूपी नियुक्तीचा कोणताही दावा करता येणार नाही.

दरमहा ₹1,500 मानधन

शेतकरी मित्रांना दरमहा ₹1,500, म्हणजेच वार्षिक ₹18,000 मानधन देय राहील. याव्यतिरिक्त कोणतेही अतिरिक्त मानधन, प्रवास खर्च किंवा इतर भत्ते देय राहणार नाहीत.

मानधनासाठी शेतकरी मित्रांनी दर तीन महिन्यांनी कामाचा अहवाल तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करणे आवश्यक आहे. अहवालाची पडताळणी व प्रमाणित केल्यानंतर मानधनाची प्रक्रिया केली जाईल. तीन महिन्यांचे एकत्रित मानधन वर्षातून चार टप्प्यांत देण्यात येईल आणि SNA स्पर्श प्रणालीद्वारे देयक केले जाईल; रोखीने मानधन देण्यात येणार नाही.

दर तीन महिन्यांनी कामाचा आढावा

शेतकरी मित्रांच्या दर तीन महिन्यांनी बैठका घेण्यात येणार आहेत. या बैठकीत एका सत्रात हंगामपूर्व प्रशिक्षण आणि दुसऱ्या सत्रात मागील कालावधीतील कामाचा आढावा घेतला जाईल. त्याचवेळी पुढील तीन महिन्यांसाठी करावयाच्या कामांचे लक्षांक निश्चित केले जातील.

जिल्हानिहाय शेतकरी मित्र निवडीचे लक्ष्य

आत्मा योजनेअंतर्गत 2026-27 साठी जिल्हानिहाय शेतकरी मित्र निवडीचे लक्ष्य एकूण 11,587 निश्चित करण्यात आले आहे. विभागनिहाय आणि जिल्हानिहाय तपशील पुढीलप्रमाणे आहे.

जिल्हानिहाय शेतकरी मित्र निवडीचे लक्ष्य

अ.क्र.विभागजिल्हाशेतकरी मित्र लक्ष्य
1ठाणे विभागठाणे123
2ठाणे विभागपालघर198
3ठाणे विभागरायगड311
4ठाणे विभागरत्नागिरी363
5ठाणे विभागसिंधुदुर्ग249
ठाणे विभाग एकूण1,244
6नाशिक विभागनाशिक546
7नाशिक विभागधुळे210
8नाशिक विभागनंदुरबार243
9नाशिक विभागजळगाव495
नाशिक विभाग एकूण1,494
10पुणे विभागअहिल्यानगर629
11पुणे विभागपुणे614
12पुणे विभागसोलापूर536
पुणे विभाग एकूण1,779
13कोल्हापूर विभागसातारा475
14कोल्हापूर विभागसांगली362
15कोल्हापूर विभागकोल्हापूर374
कोल्हापूर विभाग एकूण1,211
16छत्रपती संभाजीनगर विभागछत्रपती संभाजीनगर368
17छत्रपती संभाजीनगर विभागजालना334
18छत्रपती संभाजीनगर विभागबीड423
छत्रपती संभाजीनगर विभाग एकूण1,125
19लातूर विभागलातूर297
20लातूर विभागधाराशिव287
21लातूर विभागनांदेड408
22लातूर विभागपरभणी295
23लातूर विभागहिंगोली181
लातूर विभाग एकूण1,468
24अमरावती विभागबुलढाणा408
25अमरावती विभागअकोला250
26अमरावती विभागवाशिम206
27अमरावती विभागअमरावती447
28अमरावती विभागयवतमाळ461
अमरावती विभाग एकूण1,772
29नागपूर विभागवर्धा235
30नागपूर विभागनागपूर369
31नागपूर विभागभंडारा164
32नागपूर विभागगोंदिया173
33नागपूर विभागचंद्रपूर346
34नागपूर विभागगडचिरोली207
नागपूर विभाग एकूण1,494
महाराष्ट्र एकूण11,587

महत्त्वाचे मुद्दे एकाच नजरेत

योजनाआत्मा योजना
पद/भूमिकाशेतकरी मित्र
सन2026-27
एकूण लक्ष्य11,587
किमान वय25 वर्षे
कमाल वय60 वर्षे
शैक्षणिक पात्रताकिमान 12वी उत्तीर्ण
महिलांसाठी सहभाग30 टक्के अनिवार्य
दैनिक कामकिमान 2 तास
निवड कालावधी2 वर्षे
मानधन₹1,500 प्रति महिना
वार्षिक मानधन₹18,000
वार्षिक मूल्यांकन125 गुण
पुढील वर्षासाठी आवश्यक गुणकिमान 75
महाराष्ट्रातील एकूण लक्ष्य11,587

Download Maharashtra Shetkari Mitra Recruitment 2026 PDF

Table of Contents



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड