महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर !!

MH SET 2020 Result

MH SET 2020 Result

SET Exam : SET Result 2021 – The result of the Maharashtra State Eligibility Test has been announced under Savitribai Phule Pune University. Candidates can view their results on setexam.unipune.ac.in. The set test was conducted by Pune University for the states of Maharashtra and Goa on December 27, 2020.  

MH SET 2020 Result – SET Result 2021: महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा (Maharashtra State Eligibility Test, SET) चा निकाल जाहीर करण्यात आला आहे. उमेदवार आपले निकाल setexam.unipune.ac.in वर पाहू शकतात. पुणे विद्यापीठाकडून महाराष्ट्र आणि गोवा राज्यासाठी २७ डिसेंबर २०२० रोजी सेट परीक्षा घेण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. एकूण ६१,११४ उमेदवार उपस्थित होते, यापैकी ४,११४ उमेदवार SET परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. पुणे विद्यापीठाच्या संकेतस्थळावर निकाल उपलब्ध आहे.

निकाल कसा बघायचा?

  • उमेदवारांनी http://setexam.unipune.ac.in/ वर जा.
  • या नंतर MH SET निकालाच्या लिंक वर क्लिक करा.
  • यानंतर नवी विंडो स्क्रीन पर दिसेल. यानंतर ड्रॉप डाउन मधून MH SET परीक्षेची तारीख निवडा.
  • यानंतर आवश्यक ती माहिती भरून सबमीट करा आणि निकाल डाऊनलोड करा.

सेट परीक्षेची तारीख जाहीर; कधी होणार परीक्षा जाणून घ्या…

SET Exam : Maharashtra SET Exam will be on 27th December  : राज्य पात्रता परीक्षा अर्थात सेट परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे. सेट परीक्षेचे रजिस्ट्रार आणि मेंबर सेक्रेटरी यांनी अधिकृत संकेतस्थळावर परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. वेळापत्रकानुसार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे घेण्यात येणारी सेट परीक्षा २७ डिसेंबर रोजी होणार आहे.

महाराष्ट्र सेट परीक्षा महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी होते. यापूर्वीच्या नियोजित वेळापत्रकानुसार ही परीक्षा २८ जून रोजी होणार होती. मात्र कोविड १९ महामारी आणि त्यामुळे जाहीर झालेला लॉकडाऊन यामुळे ही परीक्षा लांबणीवर पडली होती.

ज्या उमेदवारांनी सेट परीक्षेसाठी नोंदणी केली आहे, ते अधिकृत संकेतस्थळावर जाऊन परीक्षेसंदर्भातील माहिती, वेळापत्रक डाऊनलोड करू शकतात. संकेतस्थळाची लिंक या वृत्ताच्या अखेरीस देण्यात येत आहे. यासोबतच परीक्षेच्या तारखेची माहिती देणाऱ्या परिपत्रकाची लिंकही या वृत्तात देण्यात येत आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांसाठी घेण्यात येणारी सेट परीक्षा २८ जून २०२० रोजी होणार होती. मात्र आता ही परीक्षा २७ डिसेंबर २०२० रोजी होणार आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व ताज्या माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.’


SET Exam 2020 May be Conducted in December : SET Exam: असिस्टंट प्रोफेसर पदासाठी आवश्यक राज्यस्तरीय पात्रता परीक्षा लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.

SET Exam : सहायक प्राध्यापक पदासाठी अनिवार्य असलेली राज्यस्तरीय पात्रता परीक्षा (सेट) डिसेंबरमध्ये होण्याची चिन्हे आहेत. करोना प्रादुर्भाव, अंतिम वर्षाची परीक्षा ऑक्‍टोबरमध्ये आणि नवीन शैक्षणिक वर्ष नोव्हेंबरमध्ये सुरू होणार आहे. त्यामुळे सेट परीक्षा डिसेंबरपर्यंत लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यात सेट परीक्षा घेतली जाते. ती नियोजित वेळापत्रकानुसार २८ जून रोजी होणार होती. त्यासाठी जवळपास सव्वालाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज भरले. मात्र, करोनामुळे परीक्षा पुढे ढकलली. अद्यापपर्यंत सेट परीक्षेची तारीख निश्‍चित करण्यात आलेली नाही. त्यामुळे सेट परीक्षा कधी होणार, अशी विचारणा विद्यार्थ्यांकडून होत आहे.

राज्यात करोना संसर्गाचे संकट कायम असून, सर्व विद्यापीठे अंतिम वर्षाच्या परीक्षेच्या तयारीत आहेत. त्याची परीक्षा ऑक्‍टोबर महिन्यात होत आहेत. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने १ नोव्हेंबरपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू करण्याचे आदेश दिले. ऑक्‍टोबर-नोव्हेंबरमध्ये ‘यूपीएससी’च्या परीक्षा होणार आहेत. त्यामुळे सेट परीक्षेच्या केंद्रासाठी महाविद्यालये डिसेंबर महिन्यात उपलब्ध होतील. त्यामुळे सेट परीक्षा डिसेंबर अखेरपर्यंत घेण्याचे नियोजन असल्याचे सूत्रांनी सांगितले.

‘नेट’ झाल्यानंतर ‘सेट’चे नियोजन

पुणे विद्यापीठाला सेट परीक्षा याच महिन्यात घ्यायची होती. मात्र, नेटची परीक्षा झाल्यानंतर सेट परीक्षा घेतल्यास योग्य ठरेल, अशी विद्यापीठाची भूमिका होती. त्यामुळे नेट परीक्षा झाल्यानंतर सेटची परीक्षेसाठी नियोजन करण्यात येणार आहे. मात्र, सद्य:स्थितीत ऑफलाइन परीक्षेच्या दृष्टीने नियोजन सुरू आहे. सेट परीक्षा ऑनलाइन की ऑफलाइन याचा निर्णय अद्याप ठरलेला नाही, असेही सेट विभागाने स्पष्ट केले.

‘सेट’ला अर्ज करण्याची लिकं सुरू करा

राज्यात विविध प्रवेश परीक्षा लांबल्याने, प्रशासकीय यंत्रणेकडून या परीक्षांसाठी अर्ज करण्याला साधारण दोन दिवसांची मुदतवाढ दिली. सीईटी सेलनेसुद्धा दोन दिवस अर्ज करण्याची लिंक सुरू केली होती. ‘एनटीए’नेसुद्धा नेट परीक्षेसाठी अर्ज करण्याला मुदतवाढ दिली होती. या पार्श्वभूमीवर सेट परीक्षेसाठी अर्ज करण्याला एक संधी देण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून होत आहे.

सोर्स : म. टा.Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड