SET Exam Date
SET Exam Date : राज्यभरातील हजारो उमेदवारांची प्रतीक्षा संपली असून, महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) घेण्यासाठी परीक्षा यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदा तब्बल १ लाख १७ हजार ७६८ उमेदवारांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली असून, राज्यातील १८ शहरांमधील २९४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पार पडणार आहे. येत्या रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. परीक्षेची तयारी पूर्ण झाली असून, उमेदवारांना प्रवेशपत्रेही उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रभाकर देसाई यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा (सेट) देणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेपूर्वी प्रवेशपत्र डाउनलोड करून त्यावरील सर्व तपशील तपासून घेणे आवश्यक आहे. परीक्षेच्या दिवशी कोणताही गोंधळ किंवा अडचण टाळण्यासाठी उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील माहितीची आधीच खात्री करून घ्यावी. यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत लॉगिनमध्ये जाऊन आपले प्रवेशपत्र डाउनलोड करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रवेशपत्रावरील परीक्षा केंद्र, बैठक क्रमांक आणि इतर तपशील काळजीपूर्वक तपासावेत. तसेच परीक्षा केंद्रावर जाताना प्रवेशपत्र सोबत ठेवणे अनिवार्य आहे.
प्रतिबंधित साहित्य नको
परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक साहित्याची तयारी आधीच करून ठेवणे गरजेचे आहे. परीक्षा केंद्रावर वेळेत पोहोचण्यासोबतच प्रवेशपत्र आणि आवश्यक साहित्य जवळ ठेवणे, तसेच परीक्षा नियमांचे पालन करणे महत्त्वाचे ठरणार आहे. परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी बॉलपेन आणि पाण्याची बाटली सोबत ठेवावी. याशिवाय, अनावश्यक कागदपत्रे किंवा नियमांनुसार प्रतिबंधित साहित्य परीक्षा केंद्रावर नेणे टाळावे. केंद्रावरील सूचनांचे काटेकोर पालन करून निर्धारित वेळेपूर्वी उपस्थित राहावे, जेणेकरून शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळता येईल.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















