दहावीच्या गुणांच्या आधारावर रेल्वेत मिळणार नोकरी, तरुणांसाठी सुवर्णसंधी

SECR Recruitment 2020

SECR Recruitment 2020 : रेल्वेत नोकरी शोधत असाल तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. आपल्याला परीक्षेविनाच रेल्वेमध्ये नोकरी मिळू शकणार आहे, ही कोरोना काळातील सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे बिलासपूरने ट्रेड अप्रेंटिससाठी बंपर रिक्त जागांवर भरती काढल्या आहेत. ज्यासाठी इच्छुक उमेदवार 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. या नोकरीबद्दल तपशीलवार जाणून घेऊया..

परीक्षा न घेता निवडले जाणार

रेल्वेत 432 पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. ज्यामध्ये दहावीच्या गुणांच्या आधारावर नोकरी मिळणार आहे. या पदांवर भरती आयटीआय कोर्सच्या गुणांवर आणि दहावीच्या गुणांवर आधारित असेल. दहावी आणि आयटीआयच्या उमेदवारांच्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार केली जाईल आणि त्यानंतर या नोकरीत उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करा

या भरतींसाठी उमेदवारांना 30 ऑगस्टपर्यंत ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. इच्छुक उमेदवार अप्रेंटिसशिप इंडिया डॉट कॉमच्या माध्यमातून या पदांसाठी अर्ज करू शकतात. या भरतींमध्ये 164 पदे अनारक्षित आहेत. तर 44 ईडब्ल्यूएस, 120 ओबीसी, 69 एससी, 35 एसटी प्रवर्गासाठी आरक्षित आहेत. या भरती विविध ट्रेडसाठी होणार आहेत. अप्रेंटिसच्या भरती आहेत म्हणून त्यांची कोणतीही परीक्षा होणार नाही.

पात्रता आणि वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणा-या उमेदवारांकडे पदा संबंधित ट्रेडमध्ये दहावी मार्कशीट व आयटीआय प्रमाणपत्र आवश्यक आहे. उमेदवाराचे कमाल वय 24 वर्षे असावे. वय 01.07.20पर्यंत ग्राह्य धरलं जाईल. ओबीसी प्रवर्गासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादा तीन वर्षे, अनुसूचित जाती जमातीच्या उमेदवारांसाठी पाच वर्षे आणि वेगळ्या-अपंग व्यक्तींसाठी दहा वर्षे सवलत देण्यात आली आहे. या पदांसाठी तपशीलवार जाणून घेण्यासाठी उमेदवारांना सूचना अवश्य पाहा. निवड झालेल्या उमेदवारांचे एक वर्षाचे प्रशिक्षण घेतले जाईल. छत्तीसगड सरकारच्या नियमांनुसार त्यांना एक वेतन मिळणार आहे.

अधिक माहिती करिता येथे क्लिक करा – https://mahabharti.in/south-east-central-railway-recruitment-2020/

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Vidya Shelake says

    Link kuthe ahe

  2. Nirmala Ashok Tambe says

    How to login

  3. Jayshri says

    Sir link send karu na sir

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड