राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा मंगळवारपासून सुरू झाला आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टलवर २० मार्चपर्यंत स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, या टप्प्यात नक्की किती शिक्षकांची भरती होणार, हे स्पष्ट नसल्याने टीएआयटी पात्र उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र या टप्यात भरपूर पदे भरण्यात येणार असल्याचे समजते. हि भरती म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी पर्वणीच आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक भरतीकडे डीएड आणि बीएड धारकांचे लक्ष लागले आहे. २०२३-२४ नंतर आता दुसऱ्या टप्प्यात भरती सुरू झाली असून, ‘टीएआयटी-२०२२’ मधील गुणांच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. या टप्प्यात उमेदवारांना नवीन नोंदणी, तसेच मागील स्वप्रमाणपत्र दुरुस्ती करण्याची संधी मिळणार आहे.
शिक्षक भरती ही रिक्त पदे, इयत्तांचा गट, विषय, अध्यापनाचे माध्यम, आरक्षण आणि गुणांच्या आधारे होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुलाखतीशिवाय निवड प्रक्रिया पार पडेल, तर खासगी संस्थांमध्ये मुलाखतीसह किंवा मुलाखतीशिवाय निवड पर्याय उपलब्ध असेल, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. शिक्षक भरती जाहिरातींकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले असून, संस्थांना १५ मार्चपर्यंत जाहिराती अपलोड करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र, भरतीसाठी येणाऱ्या जाहिरातींचे प्रमाण कमी असल्याने उमेदवारांमध्ये नाराजी आहे, असे दिसून येते.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















