Rojgar Mahakumbh Maharashtra Youth Jobs
नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींसाठी आनंदाची बातमी आहे! युवकांच्या हाताला काम आणि त्यांच्या कौशल्यांना योग्य संधी मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ’ आयोजित करण्यात येणार आहे. या महाकुंभाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या एकाच व्यासपीठावर येणार असून, हजारो युवकांना थेट रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. याबाबतची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांचा सहभाग
आयटीपासून बँकिंग क्षेत्रापर्यंत, विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी तरुणांना मिळणार आहे! राज्यस्तरीय रोजगार महाकुंभात आयटी, मॅन्युफॅक्चरिंग, सर्व्हिस सेक्टर, बँकिंग आणि एमएसएमई क्षेत्रांतील शेकडो उद्योजक व आस्थापने सहभागी होणार आहेत. या महाकुंभात कॉर्पोरेट कंपन्यांमधील विविध रिक्त पदांसाठी थेट मुलाखती घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे. तसेच, उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रता आणि कौशल्यानुसार योग्य नोकरीची निवड करता यावी, यासाठी व्यापक नोंदणी प्रक्रिया राबविण्यात येणार असून, क्यूआर कोड (QR Code) सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कौशल्य विकास आणि पूर्व-रोजगार प्रशिक्षण
नोकरी मिळवण्यासोबतच मुलाखतीत आत्मविश्वासाने सामोरे जाण्याची तयारीही आता रोजगार महाकुंभातून करून घेता येणार आहे! उमेदवारांचा आत्मविश्वास वाढवणे आणि त्यांना मुलाखतीसाठी सक्षम बनवण्याच्या उद्देशाने विशेष पूर्व-रोजगार मार्गदर्शन व कौशल्य विकास सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. उद्योगजगताच्या बदलत्या गरजांनुसार युवकांना प्रशिक्षित करणे, तसेच शिक्षण आणि रोजगार यांमधील दरी कमी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे पात्र तरुण-तरुणींनी या रोजगार महाकुंभात सहभागी होऊन उपलब्ध संधींचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















