महत्वाचा अपडेट- १२ हजारांवर शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचा मुहूर्त निघाला! – Schedule for Teachers Transfers Announced!

मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचा सातवा टप्पा लवकरच सुरू होणार आहे. याबाबत प्रधान सचिव यांनी महाराष्ट्रातील सर्व शिक्षणाधिकारी यांच्यासोबत बैठक घेऊन सूचना निर्गमित केल्या आहेत. त्यामुळे आंतरजिल्हा बदलीचा मुहूर्त सापडल्याचा दावा प्रहार शिक्षक संघटनेने केला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षक संवर्गाची मागील तीन वर्षांपासून रखडलेली आंतर जिल्हा बदलीप्रक्रिया तत्काळ सुरू करण्यात यावी, अन्यथा प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने मुंबई आझाद मैदानावर प्रखर आंदोलनाचा इशारा प्रहार शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष महेश ठाकरे यांनी ग्रामविकास मंत्री व ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिवांना दिला होता. आंतरजिल्हा बदलीचा सातवा टप्पा कार्यान्वित करण्यापूर्वी सर्व जिल्हा परिषदांना शिक्षक संवर्गाचे रोस्टर अद्ययावत करण्याच्या कालमर्यादित सूचना द्याव्यात, पेसा क्षेत्रातील जिल्ह्यात शासननिर्णयानुसार पेसा क्षेत्रात २० टक्के व नॉन-पेसा क्षेत्रात ८० टक्के रिक्त पदे आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेकरिता उपलब्ध करून देण्यात यावी. 

 

आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेत उर्दू माध्यमाच्या शिक्षकांना आरक्षित पदावर उमेदवार उपलब्ध न झाल्यास ती पदे शिक्षक भरतीप्रमाणे खुल्या प्रवर्गाकरिता परावर्तित करण्यात यावी, आंतरजिल्हा बदलीप्रक्रियेसाठी ३१ मे २०२६ अखेर पर्यंतचे रिक्त पदे गृहीत धरण्यात यावी, आंतरजिल्हा बदलीप्रक्रियाकरिता स्वतंत्र वेळापत्रक निर्गमित करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या होत्या. जिल्हा परिषद शिक्षकांची आंतरजिल्हा बदलीप्रक्रिया रखडली होती. निवेदनाची सकारात्मक दखल घेऊन ग्रामविकास विभागाने आंतरजिल्हा बदलीबाबत कार्यवाही सुरू केल्याने बदली प्रतीक्षेतील १२ हजारांवर शिक्षकांना न्याय मिळणार असल्याचे समाधान आहे. मात्र पाठपुरावा सुरूच राहील.


 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीचे वेळापत्रक जाहीर केलेले नाही. जिल्हा परिषदेतर्फे कोणत्याही सूचना नाहीत. बदलीसाठी रिक्त जागांची घोषणाही केलेली नाही अन् थेट बदली पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे शिक्षक संभ्रमित झाले आहे. संवर्ग एक व दोनमध्ये असणाऱ्या शिक्षकांनी बदलीतून सूट हवी आहे का, याबाबतचे होकार व नकार भरण्याच्या सूचना बदली पोर्टलवर शनिवारी सायंकाळी जाहीर केल्या आहेत. रविवारअखेर ही मुदत देण्यात आली आहे. प्रशासनाचे स्पष्ट आदेश व बदली वेळापत्रक अधिकृत जाहीर न झाल्याने शिक्षक वर्ग कमालीचा गोंधळला आहे. संवर्ग एक व दोन चे फार्म भरतांना ओटीपी व ई-मेलवर पिंट न येणे या अडचणी आल्यात त्या दूर होणे आवश्यक असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

 

जिल्हा परिषद शाळेतील प्राथमिक शिक्षकांच्या बदलीच्या सात टप्प्यांचे २८ एप्रिल ते ३१ मे पर्यंतचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर केले होते. मात्र, आंतरजिल्हा आपसी बदली झालेल्या काही शिक्षकांनी ऑनलाइन बदलीसाठी सेवाज्येष्ठता धरावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याशिवाय नवीन संचमान्यता आदेशाविरोधात अनेक जिल्ह्यांतील शिक्षकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. १६ जूनपर्यंत संचमान्यतेबाबत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या पार्श्वभूमीवर बदली प्रक्रिया अजूनही प्रत्यक्षात सुरू झाली नाही.

ऑनलाइन बदली प्रक्रियेनुसार बदलीपात्र, बदली अधिकारपात्र व सेवाज्येष्ठ शिक्षकांची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यानंतर समानीकरणासाठी रिक्त पदे ठेवून बदलीसाठी निव्वळ रिक्त जागा घोषित कराव्या लागतात. ही यादी घोषित करण्यापूर्वीच संवर्ग एक व दोनमधील शिक्षकांना बदलीसाठी होकार व नकार देणे बदली पोर्टलवर अचानक घोषित केल्याने शिक्षक वर्ग पुरता गोंधळला आहे. संवर्ग एक व दोनमधील बदलीइच्छुक शिक्षकांची यादी जाहीर करण्यासाठी व यादीतील शिक्षकांवर काही आक्षेप असतील तर ती प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी हे अर्ज भरून घेतले जात असावेत, असे शिक्षक शैलेन्द्र दहातोंडे यांनी सांगितले.


जिल्ह्यात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया यंदाही जून महिन्यात सुरू होणार आहे. दरवर्षीप्रमाणे शिक्षक बदल्यांवर जिल्हा परिषदेचा भर राहणार असून, यावर्षी ती काही विलंबाने का होईना पण निश्चितपणे पार पडणार आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे एक हजार शिक्षकांची पदे रिक्त आहेत, ज्यामुळे बदल्यांद्वारे या जागा भरल्या जाणार आहेत.

 

न्यायालयीन स्थगितीचा अडथळा, पण मार्ग मोकळा!
राज्यातील काही शिक्षकांनी नवीन संचमान्यतेसंदर्भात न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे काही काळासाठी बदल्यांची प्रक्रिया थांबली होती. मात्र, न्यायालयाने नवीन संचमान्यतेस स्थगिती दिल्यामुळे आता जुनी संचमान्यता ग्राह्य धरून रिक्त जागांच्या आधारावर बदल्या राबवण्यात येणार आहेत.

पावसाळी बदल्या – शिक्षकांच्या सहनशीलतेची परीक्षा
बदल्यांची प्रक्रिया जून महिन्यात सुरू होणार असली तरी, प्रत्यक्ष बदलीनंतर शिक्षकांना त्यांच्या नवीन शाळांमध्ये पावसाच्या तडाख्यात रूजू व्हावे लागणार आहे. कारण १६ जून रोजी उन्हाळी सुट्टी संपत असून, त्याआधी बदली प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे पावसात शिक्षकांची धावपळ ठरलेली आहे.

बदली पोर्टलवर माहिती दुरुस्तीसाठी संधी
प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात बदली पोर्टलवर माहिती दुरुस्ती करण्याची संधी देण्यात आली आहे. यामुळे विशेषतः दुर्गम भागात कार्यरत शिक्षकांना त्यांच्या आवडीच्या शाळांकडे बदली मिळवण्यासाठी पहिला प्रयत्न करता येईल. ही माहिती अचूक भरणे हा पुढील टप्प्यांतील यशाचा पाया ठरणार आहे.

संवर्गानुसार बदली – न्याय्य पद्धतीला प्राधान्य
शिक्षक बदल्यांसाठी संवर्ग १ ते ५ अशा गटांनुसार प्रक्रिया राबवली जाणार आहे. संवर्ग १ मध्ये अपंग, विधवा, गंभीर आजारी, अपंग मूल असलेले शिक्षक, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले आदींचा समावेश आहे. तर संवर्ग २ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरणास प्राधान्य दिले जाईल. ही वर्गवारी बदल्यांतील पारदर्शकतेसाठी उपयुक्त ठरणार आहे.

समान संधीसाठी १४% जागा रिक्त ठेवण्याचा निर्णय
तालुकास्तरावर समानीकरणानुसार १४ टक्के पदे रिक्त ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्व भागांमध्ये समतोल राखला जाईल. प्रत्येक तालुक्यात बदल्याच्या पात्र शाळांची व शिक्षकांची यादी लवकरच प्रसिद्ध होणार आहे, ज्यावरून बदल्यांचा पुढील आराखडा तयार केला जाईल.

अवघडातून सुगम शाळेकडे वाटचाल
दुर्गम, डोंगराळ, वनवस्ती आणि साधनसंपत्तीअभावी असलेल्या अवघड शाळांची यादी २०२२ साली तयार करण्यात आली होती. त्यामध्ये ६५० शाळांचा समावेश आहे. यंदाच्या बदल्यांमध्ये ही यादी प्रभावीपणे वापरण्यात येणार असून, त्यामुळे अनेक शिक्षकांना सुगम शाळांमध्ये बदल्यांची सुवर्णसंधी मिळणार आहे.

बदल्यांची वेळ, बदल्यांचे रूप – शिक्षकांसाठी निर्णायक टप्पा
मागील वर्षी रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे एक हजार शिक्षकांची बदल्या पार पडल्या होत्या. यंदाही तितक्याच बदल्यांचा अंदाज व्यक्त होत आहे. बदल्यांसाठी शिक्षकांनी इच्छित शाळांची नावे भरायची असून, नंतर विभागीय समन्वयानुसार अंतिम यादी प्रसिद्ध होणार आहे. या बदल्यांमुळे अनेक शिक्षकांचे आयुष्यच बदलणार आहे.

राज्य सरकारने जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी सुधारित धोरण १८ जून २०२४ रोजी जाहीर केले आहे. या बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पोर्टलद्वारे राबवली जाणार असून, शिक्षण विभागाने राज्यस्तरावर वेळापत्रक निश्चित केले आहे. त्यानुसार बदली पात्र आणि बदली अधिकार प्राप्त शिक्षकांची यादी तयार केली जात असून, अंतिम यादी २८ फेब्रुवारीपर्यंत जाहीर केली जाणार आहे. Schedule for Teachers Transfers

बदल्या प्रक्रियेसाठी ऑनलाइन पोर्टल
राज्य सरकारने बदल्यांसाठी निश्चित केलेल्या ऑनलाइन पोर्टल प्रणालीमुळे प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत होणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी शिक्षकांना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी तालुकास्तरीय गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या आणि विशेष कक्ष स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत.

खोटी माहिती दिल्यास निलंबनाची कारवाई!
बदली प्रक्रियेत खोटी किंवा दिशाभूल करणारी माहिती भरून लाभ घेण्याचा प्रयत्न केल्यास, संबंधित शिक्षकाचे निलंबन करण्यात येईल आणि त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली जाईल. तसेच, तालुकास्तरीय समितीलाही जबाबदार धरले जाईल, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम यांनी दिला आहे. त्यामुळे बदलीसाठी योग्य आणि सत्य माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

बदल्या प्रक्रियेचे वेळापत्रक
१ जानेवारी ते २८ फेब्रुवारी – बदली पात्र शिक्षकांची यादी प्रसिद्धी, हरकती व पडताळणी
१ ते ३१ मार्च – समानीकरणांतर्गत रिक्त पदे निश्‍चित करणे
१ ते २० एप्रिल – बदलीसाठी नियुक्त यंत्रणेस माहिती देणे
२८ एप्रिल ते ३१ मे – विशेष संवर्ग, बदली अधिकार प्राप्त व बदली पात्र शिक्षकांसाठी रिक्त जागांची घोषणा आणि बदल्या

शिक्षकांनी दक्षता घ्यावी
बदल्या प्रक्रियेबाबत संपूर्ण वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून, शिक्षकांनी कोणत्याही दिशाभूल करणाऱ्या कागदपत्रांचा वापर करू नये. राज्यसरकारने निश्चित केलेल्या ऑनलाइन प्रक्रियेनुसार पारदर्शक बदल्या केल्या जातील, अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी दिली.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड