सांगली जिल्ह्यात ५७६ पदांची शिक्षक भरती होणार! – Sangli Shikshak Bharti 2024
Sangli Shikshak Bharti 2024
Sangli Shikshak Bharti 2024 – Teachers have not been recruited for many years. This led to D.Ed. Students were focused on recruitment. Finally, the government has approved zilla parishad recruitment. As a result, the recruitment process for 576 posts will start by publishing an advertisement in the next 15 days for Sangli Shikshak Bharti 2024. The state education department had decided to recruit teachers a few days ago. Accordingly, the movement has accelerated. In the zilla parishad, the education department is working on a system to balance the data. All the information regarding recruitment by the administration will soon be recorded on the holy portal. Sources said the recruitment advertisement will be released later.
गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती झाली नव्हती. यामुळे डी.एड. विद्यार्थ्यांचे भरतीकडे लक्ष लागून होते. अखेर शासनाने जिल्हा परिषद भरतीला मान्यता दिली आहे. यामुळे ५७६ पदांसाठी येत्या पंधरा दिवसांत जाहिरात प्रसिद्ध करून भरतीची प्रक्रिया चालू होणार आहे. राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षक भरती करण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार हालचाली गतिमान झाल्या आहेत. जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागामध्ये आकडेवारीचा ताळमेळ लावण्यासाठी यंत्रणा कामाला लागली आहे. प्रशासनाकडून भरतीच्या अनुषंगाने सर्व माहिती लवकरच पवित्र पोर्टलवर नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर भरती जाहिरात प्रसिद्ध होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमामध्ये ६९४ शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. तसेच कन्नड ८८ आणि उर्दू ४०, अशा एकूण ९२२ जागा रिक्त आहेत. शासन निर्णयानुसार रिक्त जागांच्या ७० टक्के जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे मराठी माध्यमामध्ये ४८६, कन्नड ६२ आणि उर्दू २८, अशा एकूण सुमारे ५७६ जागांवर शिक्षकांची भरती होणार आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅रेल्वे ग्रुप D भरती आता होणार ५८,२४२ जागांसाठी, १० वी पास उमेदवारांना नोकरीची मोठ्ठी संधी!
✅अर्ज सूरु-नागपूर महानगरपालिकेत नर्स, सहायक, अन्य 245 पदांकरिता भरती सूरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ITBP अंतर्गत १०वी पास उमेवारांना संधी, 619 रिक्त पदांची जाहिरात प्रकाशित!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
गेल्या ११ वर्षांत भरती नाही
२०१२ पासून शिक्षक भरतीवर बंदी घालण्यात आली आहे. तसेच २००५ पासून शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही. केवळ २०१९ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत काही जागा भरण्यात आल्या. मात्र, या भरतीमध्ये काही पदांचा गुंता झाला होता. कित्येक वर्षे भरतीच झाली नसल्याने अनेक शाळेत एका शिक्षकास दोन वर्ग सांभाळण्याची वेळ आली. यातून गुणवत्ता ढासळत आहे. मात्र, पुढील काही दिवसांत हा प्रश्न निकालात निघणार आहे.
Comments are closed.