Sahayak Pradhyapak Bharti 2026
Sahayak Pradhyapak Bharti 2026 : महाविद्यालयीन शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर! राज्यातील मान्यताप्राप्त अशासकीय अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहायक प्राध्यापकांच्या तब्बल ५ हजार १२ रिक्त पदांच्या भरतीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. ही भरती प्रक्रिया पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने पार पाडण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने शिक्षण संस्थांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार, उमेदवारांच्या मुलाखतींचे सीसीटीव्ही चित्रीकरण करून ते जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच पदभरतीत कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार किंवा अनियमितता आढळल्यास संबंधित शिक्षण संस्थेवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
सहायक प्राध्यापक भरती प्रक्रियेत पारदर्शकतेला सर्वोच्च प्राधान्य; विद्यापीठांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संबंधित विद्यापीठांनी मुलाखत प्रक्रियेसाठी स्पष्ट गुणांकन निकष निश्चित करून त्याचे स्वतंत्र प्रपत्र तयार करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच प्रत्येक उमेदवाराची शैक्षणिक पात्रता अचूक असल्याची आणि संपूर्ण निवड प्रक्रिया शासनाच्या नियमानुसार पार पडल्याची खातरजमा केल्यानंतरच अंतिम निवड यादीला मान्यता द्यावी, असेही बजावण्यात आले आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेत कोणतीही अनियमितता होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याची जबाबदारी विद्यापीठांवर असणार आहे.
सहायक प्राध्यापक भरतीत पारदर्शकतेची जबाबदारी आता निवड समितीच्या खांद्यावर! मुलाखतीची संपूर्ण प्रक्रिया निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याची प्रमुख जबाबदारी संबंधित निवड समितीवर निश्चित करण्यात आली आहे. याशिवाय संबंधित शिक्षण संस्था, विद्यापीठ, निवड समितीचे सदस्य तसेच शासन प्रतिनिधी यांच्यावरही पदभरती प्रक्रिया नियमानुसार आणि पारदर्शकपणे पार पाडण्याची सामूहिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















