Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सहकार आयुक्तालय भरती शुल्क रद्द करणे बाबत प्रकिया सुरू!। Sahakar Ayukta Bharti 2023

Sahakar Ayukta Bharti 2023 :सव्वाचार हजार परीक्षार्थीना मिळणार परतावा

Sahakar Ayukta Bharti 2023

गेल्या वर्षात सहकार विभागातर्फे गट क संवर्गातील विविध पदांची भरती राबविण्यात आली होती. त्यामध्ये विविध पदांसाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात आले होते. उर्वरित पदांचे शुल्क परतावा देण्याचा निर्णय सहकार आयुक्त कार्यालयाने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील ४ हजार ३७७ उमेदवारांना ४० लाखांचे परीक्षा शुल्क परत मिळणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू करण्यात आली.

‘सहकार भरती २०२३’ अंतर्गत ३०९ पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले होते. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ९०० रुपये परीक्षा शुल्क मोजावे लागले होते. अर्ज प्राप्त उमेदवारांची दि. १४ व १६ ऑगस्ट २०२३ रोजी लेखी परीक्षा घेण्यात आली होती.

सहकारी अधिकारी श्रेणी (१) व सहकारी अधिकारी श्रेणी (२) या पदांसाठी स्वतंत्र अर्ज आणि स्वतंत्र परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते. मात्र, दोन्ही पदांसाठी ‘टीसीएसआयओएन’ कंपनीकडून एकच ऑनलाइन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, लघुटंकलेखक या पदांसाठी स्वतंत्र अर्जासह प्रत्येक पदांसाठी स्वतंत्र परीक्षा शुल्काचा भरणा उमेदवारांनी केला होता. या तिन्ही पदांसाठी एकच परीक्षा घेण्यात आली होती. त्यामुळे संबंधित पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज व परीक्षा शुल्क दुबार / तिबार अदा केलेल्या उमेदवारांचे परीक्षा शुल्क परत करण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारांची यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या sahakarayukta.maharashtra. gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

 

 

उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व टंकलेखक या पदांसाठी स्वतंत्र अर्ज व स्वतंत्र परिक्षा शुल्क उमेदवारांनी भरणा केलेली आहे. तथापी सदर तीनही पदांसाठी एकच ऑनलाईन परिक्षा टी.सी.एस-आय.ओ.एन कंपनीमार्फत आयोजित करण्यात आलेली होती. याप्रमाणे सदर पदांसाठी स्वतंत्रपणे अर्ज व परिक्षा शुल्क दुबार/तिबार अदा केलेल्या उमेदवारांचे परिक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार ज्या उमेदवारांनी सदर पदांसाठी एकपेक्षा जास्त वेळा परिक्षा शुल्क भरणा केलेले आहेत अशा उमेदवारांची यादी सहकार आयुक्त कार्यालयाच्या https://sahakarayukta.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. अधिक माहिती खालील शुद्धिपत्रकात दिलेली आहे. 

 

 


Sahakar Ayukta Bharti 2023 : The recruitment notification declared by Commissioner of Co-operatives and Registrar, Co-operative Societies, State of Maharashtra, Pune and Subordinate Divisional Co-Registrar, Co-operative Societies (Administration) Mumbai / Konkan / Nashik / Pune / Kolhapur / Chhatrapati Sambhaji Nagar / Latur / Amravati / Nagpur under Ex-Secondary Services Selection Board on Establishment of Offices Associate Officers Category 1 in Group C Cadre..Interested and eligible candidates can apply before the last date. More details are given below:-

Commissioner for Cooperation and Registrar, Cooperative Societies Pune is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of the “Associate Officer Category I, Associate Officer Grade II, Auditor Grade II, Assistant Co-Operative Officer/Senior Clerk, High Grade Stenographer, Lower Grade Stenographer and Stenographer” post. There are a total of 309 vacancies available to fill posts. The employment place for this recruitment is Pune. Applicants apply  online mode for Sahakar Ayukta Maharashtra Recruitment 2023. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date for Sahakar Ayukta Application 2023. The last date is the 21st 24th of July 2023. For more details about Sahakar Ayukta Jobs 2023, visit our website www.MahaBharti.in.

Sahakar Ayukta Answer Key Out@sahakarayukta.maharashtra.gov.in

Maharashtra Sahakar Ayuktalay Bharti 2023

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे व अधिनस्त विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था (प्रशासन) मुंबई / कोकण / नाशिक / पुणे/ कोल्हापूर / छत्रपती संभाजी नगर / लातूर/ अमरावती / नागपूर या कार्यालयांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील सहकारी अधिकारी श्रेणी १. सहकारी अधिकारी श्रेणी २ लेखापरिक्षक श्रेणी २. सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक ही 309 पदे सरळसेवेने भरण्याकरता पात्र उमेदवारांकडून सहकार विभागाच्या https://sahakarayikta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने दिनांक ५ जुलै, २०१३ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक २१ २४ जुलै २०२३ रात्री २३.५९ वाजेपर्यंत (मुदतवाढ) अर्ज मागविण्यात येत आहेत. भरती प्रक्रिया संदर्भातील सर्व कार्यक्रम, कार्यक्रमातील बदल, सूचना वगैरे https://sahakarayukta.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येतील. या भरतीचे संपूर्ण अभ्यासक्रम, परीक्षा स्वरूप येथे डाउनलोड करा 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – सहकारी अधिकारी श्रेणी १, सहकारी अधिकारी श्रेणी २, लेखापरिक्षक श्रेणी २, सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक
  • पद संख्या – 309 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज शुल्क – 
    • अमागास – रु. १०००/-
    • मागासवर्गीय/आ.दु.घ/ अनाथ/दिव्यांग /माजी सैनिक- रु.९००/-
  • वयोमर्यादा –
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 24 जुलै 2023 
  • अधिकृत वेबसाईट : sahakarayukta.maharashtra.gov.in

Sahakar Ayukta Vacancy 2023 |Sahakar Ayuktalay Recruitment 2023

पदाचे नाव पद संख्या 
सहकारी अधिकारी श्रेणी १ 42 पदे
सहकारी अधिकारी श्रेणी २ 63 पदे
लेखापरिक्षक श्रेणी २  07  पदे
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक 159 पदे
उच्च श्रेणी लघुलेखक  03 पदे
 निम्न श्रेणी लघुलेखक  27 पदे
लघुटंकलेखक 08 पदे

Educational Qualification For Sahakar Ayukta Recruitment 2023 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
सहकारी अधिकारी श्रेणी १ मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी किमान वितीय श्रेणीत उत्तीर्ण
सहकारी अधिकारी श्रेणी २ मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण
लेखापरिक्षक श्रेणी २  मान्यता प्राप्त विद्यापीठाची वाणिज्य शाखेकडील अॅडव्हान्स अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह बी. कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण किंवा मुंबई विद्यापीठाची फायनान्शिअल अकौंटन्सी व ऑडीटींग या विषयासह वाणिज्य शाखेची बी.कॉम. पदवी किमान व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक  मान्यता प्राप्त विद्यापीठाची कला/वाणिज्य/विज्ञान/विधी/कृषि शाखेतील पदवी उत्तीर्ण
उच्च श्रेणी लघुलेखक  १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

२. १२० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

 निम्न श्रेणी लघुलेखक  १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

२. १०० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

लघुटंकलेखक १. माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

२. ८० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे लघुलेखनाचे आणि ४० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे इंग्रजी टंकलेखनाचे किंवा ३० श.प्र.मि. यापेक्षा कमी नाही इतक्या गतीचे मराठी टंकलेखनाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र

Salary Details For Sahakar Ayukta Bharti 2023 

पदाचे नाव वेतनश्रेणी
सहकारी अधिकारी श्रेणी १ S-१४ : ३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
सहकारी अधिकारी श्रेणी २ S-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लेखापरिक्षक श्रेणी २  S-१३ : ३५४००-११२४०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
सहाय्यक सहकारी अधिकारी/ वरिष्ठ लिपीक S-०८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
उच्च श्रेणी लघुलेखक  S-१५ : ४१८००-१३२३०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
 निम्न श्रेणी लघुलेखक  S-१४ : ३८६००-१२२८०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते
लघुटंकलेखक S-०८ : २५५००-८११०० अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर देय भत्ते

How To Apply For Sahakar Ayukta Maharashtra Recruitment 2023

  • टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) च्या ऑनलाईन अर्ज प्रणालीवर नोंदणी करणे व खाते तयार करणे.
  • खाते तयार केले असल्यास व ते अद्ययावत करण्याची आवश्यकता असल्यास अद्ययावत करणे.
  • सेवा प्रवेश नियमानुसार पात्र असलेल्या पदांसाठीच अर्ज करणे.
  • प्रस्तुत परिक्षा संवर्गनिहाय राज्यामध्ये एकाच वेळी घेण्यात येणार असल्याने एका संवर्गातील पदासाठी एकाच विभागात अर्ज सादर करता येईल. सबब उमेदवारांनी अर्ज सादर करताना विभागाची निवड काळजीपूर्वक करावी.
  • विहित कालावधीत तसेच विहित पध्दतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्ज सादर करणे.
  • परिक्षा शुल्काचा भरणा विहित पध्दतीने करणे.

नावनोंदणी प्रमाणपत्र / कागदपत्रे अपलोड करणे

  1. एस.एस.सी. अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता
  2. आयु प्रमाण पहचान पत्र (मतदाता पहचान पत्र, पैन कार्ड, ड्राइविंग लाइसेंस, पासपोर्ट, | बैंक पासबुक आदि में से कोई एक)
  3. शैक्षणिक योग्यता का प्रमाण आदि
  4. सामाजिक रूप से पिछड़े होने का प्रमाण
  5. आर्थिक रूप से कमजोर वर्ग से संबंधित होने का प्रमाण
  6. वैध नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट
  7. पात्र विकलांग व्यक्ति होने का प्रमाण
  8. योग्य भूतपूर्व सैनिक का प्रमाण
  9. खिलाड़ी आरक्षण के लिए पात्रता का प्रमाण
  10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
  11. अराखीव महिला, खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास
  12. अधिवास प्रमाणपत्र
  13. विवाहित स्त्रियांच्या नावात बदल झाल्याचा पुरावा
  14. मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा
  15. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन
  16. टंकलेखनाचे प्रमाणपत्र (मराठी/ इंग्रजी लागू असल्याप्रमाणे)
  17. लघुलेखनाचे प्रमाणपत्र (लागू असल्याप्रमाणे)
  18. प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
  19. एम. एस. सी. आय. टी. प्रमाणपत्र

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For sahakarayukta.maharashtra.gov.in Recruitment 2023

???? सिलॅबस व परीक्षेचे स्वरूप
पूर्ण माहिती वाचा
???? PDF जाहिरात
https://shorturl.at/qstO1
???????? ऑनलाईन अर्ज करा (लिंक सुरु) https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32665/84026//Index.html
✅ अधिकृत वेबसाईट sahakarayukta.maharashtra.gov.in

 Selection Process  For  Sahakar Ayukta Maharashtra Bharti 2023

  • सर्व पदांसाठी संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चित केलेल्या केद्रांवर घेण्यात येईल.
  • संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • उच्चश्रेणी लघुलेखक, निम्नश्रेणी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदांसाठी परीक्षेमध्ये किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची व्यावसायिक चाचणी घेण्यात येईल. व्यावसायिक चाचणी घेण्याबाबतचे स्थळ, दिनांक व वेळापत्रक यथावकाश संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
  • संगणक आधारीत (Computer Based Examination) परीक्षेसाठी अभ्यासक्रम व इतर तपशील खालीलप्रमाणे राहील


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. MahaBharti says

    Sahakar Ayukta Answer Key Out |

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड