Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे रिक्त! – Rural Hospital Vacancies

Rural Hospital Vacancies

Gramin Rugnalaya Bharti 2023

Rural Hospital Vacancies : Eleven posts, including three medical officers, are lying vacant in the rural hospital of Murud, which is affecting the health service and the vacant posts should be filled immediately. Such a demand is gaining momentum among citizens. The hospital, which is located in Nabab Kalin in Murud, receives a large number of patients from remote areas of the city and talukas, but due to medical officers and inadequate staff, they find it difficult to treat.

 

मुरुडच्या ग्रामीण रुग्णालयात तीन वैद्यकीय अधिका-यांसह अकरा पदे रिक्त असल्याने याचा आरोग्य सेवेवर परिणाम होत असून तातडीने रिक्त पदे भरण्यात यावीत. अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे. मुरुड मध्ये नबाब कालिन असलेल्या या रुग्णालयात शहरासह तालुक्यातील दुर्गम भागातील रुग्ण मोठ्या संख्येने येतात मात्र वैद्यकीय अधिकारी व अपु-या कर्मचा-यांमुळे त्यांना उपचारासाठी अडचणीचे होते. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिका-यांसह अकरा पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत अधिकारी-कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे रिक्त पदे तातडीने व कायमस्वरूपी भरण्यात यावीत, अशी मागणी नागरिक, रुग्ण तसेच नातेवाईकांकडून होत आहे. ग्रामीण रुग्णालयातील तीन वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त झाली आहेत तर काही कर्मचा-यांचा अस्थायी सेवेचा कार्यकाळ डिसेंबर अखेर संपुष्टात येत असल्याने रुग्णालयातील एक अधिपरिचारिका, एक औषध निर्माण अधिकारी, चार कक्षसेवक, एक सफाई कामगार आणि दंत सहायक (वर्ग 4) अशी एकूण अकरा पदे रिक्त झाली आहेत. कर्मचारी नियुक्त न केल्यामुळे रुग्णसेवेत अनियमिता, तसेच आपत्तीजनक स्थिती ओढवल्यास निर्णय घेताना अडचणीचे होते.

हंगामी तत्त्वावर, तसेच कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत असल्याने बाह्य रुग्णसेवेवरही याचा परिणाम होत आहे. ग्रामीण रुग्णालयात दररोज किमान 100 रुग्णांची तपासणी होते. याठिकाणी 30 खाटांची क्षमता आहे. शासनाच्या संबंधित अधिकारी वर्गाने यात तातडीने लक्ष पुरवून वैद्यकीय अधिका-यांसह रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत. अशी मागणी नागरिकांतून जोर धरीत आहे.


These posts include Staff Nurse, X-ray Technician, Lab Technician, Lab Assistant, Junior Clerk, Outpatient Clerk, Surgery Department Worker, Blood Bank Assistant, Casualty Department Assistant, Blood Bank Technician, Dietitian, ECG Technician, Sepoy, Wardboy and Sweeper. Deputy Director of Health Department Radhakishan Pawar said in the order.

जिल्ह्यातील पाबळ, मलठण, यवत, इंदापूर, बावडा, भिगवण येथील उपजिल्हा रुग्णालयांत आता कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळाची भरती करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने यासाठी नाशिक येथील महाराष्ट्र विकास ग्रुप या खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. ही कंपनी जिल्ह्यातील ७ रुग्णालयांत ११३ पदे भरणार असून, एक वर्षाच्या करार तत्त्वावर या नियुक्त्या असतील.


स्टाफ नर्स, एक्स रे तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ, लॅब सहायक, कनिष्ठ लेखनिक, बाह्यरुग्ण लेखनिक, शस्त्रक्रिया विभाग कामगार, ब्लड बँक सहायक, अपघात विभाग सहायक, ब्लड बँक तंत्रज्ञ, डायटिशन, ईसीजी तंत्रज्ञ, शिपाई, वॉर्डबॉय आणि सफाई कामगार अशा पदांचा यात समावेश आहे, असे आरोग्य विभागाचे उपसंचालक राधाकिशन पवार यांनी आदेशात म्हटले.


Gramin Rugnalaya Sangli Bharti 2023

Rural Hospital Vacancies : Only five people are working in the rural hospital. As 25 posts are vacant and the health system is ineffective, patients have turned their backs on this hospital. Further details are as follows:-

माडग्याळ (ता. जत) येथील ग्रामीण रुग्णालयात केवळ पाच जणांवर कामकाज सुरू आहे. २५ पदे रिक्त असल्यामुळे आरोग्य यंत्रणा कुचकामी ठरत असल्याने रुग्णांनी या रुग्णालयाकडे पाठ फिरविली आहे. 

येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक, वैद्यकीय अधिकारी वर्ग दोनची तीन पदे, तर अधिपरिचारिका तीन, कनिष्ठ लिपिक दोन, औषध निर्माण एक, प्रयोगशाळा वैज्ञानिक एक, शिपाई एक, कक्षसेवक चार, सफाई कामगार दोन, काउन्सलर एक, सुरक्षा रक्षक तीन अशी एकूण २५ पदे रिक्त आहेत. येथील कार्यभार जत येथील डॉ. इरकर यांच्याकडे आहे. जत रुग्णालयातील कामकाज जास्त असल्याने त्यांना माडग्याळला जाने शक्य होत नाही. रुग्णालयात डॉक्टर व कर्मचारी नसल्याने रुग्णाची गैरसोय होत आहे.

Rural Hospital Vacancies

Gramin Rugnalaya Bharti 2022- Vacancy Details

  • वैद्यकीय अधिकारी- 03
  • अधिपरिचारिका-03
  • कनिष्ठ लिपिक-02
  • औषध निर्माण-01
  • प्रयोगशाळा वैज्ञानिक-01
  • शिपाई-01
  • कक्षसेवक-04
  • सफाई कामगार-02
  • काउन्सलर-01
  • सुरक्षा रक्षक-03

Rural Hospital Vacancies | Gramin Rugnalaya Bharti 2022

Rural Hospital Vacancies : Half of the posts are vacant in Murud Rural Hospital. A total of 27 posts have been sanctioned in Murud Rural Hospital; However, 14 of them are vacant. Further details are as follows:-

मुरूड ग्रामीण रुग्णालयात तब्बल निम्मी पदे रिक्त आहेत. रुग्णालयातील कामाचा भार अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांवर येत असल्याने त्यांची त्रेधातिरपिट उडत आहे. ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होत असल्याने ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत, अशी मागणी होत आहे.

  • मुरूड ग्रामीण रुग्णालयात एकूण २७ पदे मंजूर आहेत; मात्र त्यापैकी १४ पदे रिक्त आहेत.
  • गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक कायमस्वरूपी नियुक्त न केल्यामुळे रुग्णसेवेत अनियमिता, तसेच आपत्तीजनक स्थिती ओढवल्यास निर्णय घेताना वैद्यकीय अधिकाऱ्यांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
  • डॉ. बागुल यांच्या सेवानिवृत्तीनंतर गेल्या साडेतीन वर्षांपासून मुरूड ग्रामीण रुग्णालयात कोणत्याही एम. डी. वा एम. एस. प्रावीण्यप्राप्त अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
  • सद्य:स्थितीत डॉ. विजय हाडबे, तसेच डॉ. अमित मोरे यांच्यावर एल. के. बी. व फातिमा बेगम या रुग्णालयांचीही जबाबदारी आहे.
  • डॉक्टर्स हंगामी तत्त्वावर, तसेच कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येत असल्याने बाह्य रुग्णसेवेवरदेखील परिणाम होत असतो.

MBBS doctors assigned to rural hospitals are appointed on contract basis; However, due to non-appointment of full time medical superintendent permanently, the working medical officer of Alibag District Hospital, Dr. Padole has the additional charge of Medical Superintendent of Murud Rural Hospital.

मुरूड ग्रामीण रुग्णालयातील स्थिती

एकूण पदे २७

रिक्त पदे १४

  • रिक्त पदांची आकडेवारी
  • वैद्यकीय अधिकारी वर्ग १
  • वैद्यकीय अधिकारी १
  • अधिपरिचारिका ५
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ १
  • औषध निर्माण अधिकारी १
  • कक्ष सेवक ४
  • सफाई कामगार १

उपचारांसाठी शहरात धाव

मुरूडसारख्या डोंगरदऱ्यांच्या तालुक्यात सुसज्ज आरोग्यसेवेची आवश्यकता आहे. याच ग्रामीण रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात सरासरी १०० ते १२० रुग्णांची तपासणी व औषध योजना होत असे; मात्र अलीकडे तज्ज्ञ डॉक्टर्स नसल्याने येथील रुग्णांना अलिबाग, रोहा अथवा पुणे, मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी धाव घ्यावी लागते. गोरगरीबांना हा खर्च परवडत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

रिक्त जागांविषयी कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावा यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक रायगड यांच्याशी वैद्यकीय अधीक्षक डॉ. पाडवे प्रयत्न करीत आहेत.
– डॉ. विजय हाडबे


Rural Hospital Vacancies : मेहकर: तालुक्यातून येथील ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. परंतू ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक पदासह अनेक महत्त्वाचे पद रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालयाला रिक्त पदाचे ग्रहण लागल्याने कर्मचाऱ्यांना काम करताना अनेक अडचणी निर्माण होत आहेत.

 

स्थानिक ग्रामीण रुग्णालयात दररोज ग्रामीण भागातील गरीब व गरजू रुग्ण उपचारासाठी येतात. परंतू रुग्णालयात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची रिक्त पदे अनेक वर्षापासून भरले गेले नाही. कोरोना विषाणू संसर्ग येण्यापूर्वी या रुग्णालयात ३०० ते ४०० पर्यंत रोज येणाऱ्या रुग्णांची नोंद होत होती. मात्र आता फक्त १०० च्या आत येणाऱ्या रुग्णांची नोंद आहे. या रुग्णालयात महत्वाचे पद वैद्यकीय अधीक्षक यांचे आहे. या रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सारंग हे दोन ते तीन वर्षांपूर्वी रुजू झाले होते. रुजू झाल्यानंतर परत ते त्यांच्या गावी गेले असून मागील दोन वर्षापासून ते रुग्णालयातच आले नाहीत. ते रजेवर गेल्याचे सांगण्यात आलेले आहे. वैद्यकीय अधीक्षक या महत्त्वाच्या पदावर डॉक्टर नसल्याने रूग्णालयात नियंत्रण ठेवणारा कोणीच दिसत नाही. डॉक्टर श्याम ठोंबरे हे प्रभारी म्हणून काम पाहत आहेत.

१७ पदे रिक्त

वैद्यकीय अधीक्षक पदासोबतच नर्स परिचारिका पद चार, एन.आर.एच.एम लसीकरण दोन, एन. बी. एस. यू. एक, आर.बी.एस.के एक, वैद्यकीय अधिकारी एक, आयुष्य वैद्यकीय अधिकारी दोन, सिकल टेक्निशन एक, दंतचिकित्सक, लॅब असिस्टंट, स्त्री रोग तज्ञ, बाल रोग तज्ञ, भूलतज्ञ प्रत्येकी एक असे एकूण १७ पदे रिक्त आहेत.

मशीन धूळखात

रुग्णालयात बाल रोग तज्ञ, भूलतज्ञ व स्त्री रोग तज्ञ म्हणून काही डॉक्टर काम पाहत असले तरी आतापर्यंत त्यांना रुजू करण्यात आलेले नाही. गेल्या काही महिन्यापासून त्यांना वेतन सुद्धा देण्यात आले नाही. रुग्णालयात एक्स रे नवीन मशीन व इतर साहित्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. मात्र आतपर्यंत याकडे लक्ष देण्यात आले नाही.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

3 Comments
  1. Vidys says

    I am staff nurse

  2. kalpesh jain says

    senior lab technician Job

    4 year experience

  3. Durga vakil pawara says

    RANM nurs sathi job

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड