JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

RTO मध्ये लवकरच सुरु होणार ४६१ पदांची मोठी भरती प्रक्रिया ! RTO Bharti 2026 Maharashtra

RTO Maharashtra Recruitment 2026

RTO Bharti 2026 : There is a shortage of over 700 officers in the Maharashtra Transport Department (RTO), leading to increased pressure on existing staff and delays in public services. Recently, 331 Assistant Motor Vehicle Inspectors (AMVI) were promoted to Motor Vehicle Inspectors (MVI), creating many vacant positions. Out of the 2,352 approved posts in the department, only 1,852 are currently filled. Additionally, around 35% to 40% of clerk positions remain vacant. With the rising number of vehicles in the state, the workload related to vehicle registration, licenses, fitness and pollution checks, accident investigations, and road safety enforcement is growing rapidly, but manpower is insufficient

राज्य परिवहन विभागाने ४६१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (एआयएमव्ही) पदे भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. अलीकडेच झालेल्या पदोन्नती प्रक्रियेत ३२८ एआयएमव्हीना निरीक्षक पदावर बढती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या अंमलबजावणीसाठी एआयएमव्हीची संख्या कमी पडत असल्याने प्रस्ताव पाठवल्याचे अधिकारी म्हणाले. परिवहन विभागामध्ये एकूण १,१५८ एआयएमव्ही पदे मंजूर आहेत, तर त्यापैकी सध्या ७८५ पदे भरलेली आहेत. त्यामुळे अजूनही ३० टक्के पदे रिक्त आहेत. फील्डवरील कामकाजाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना अधिक सक्षम सार्वजनिक सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी ही पदे भरणे आवश्यक असल्याचे अधिकारी म्हणाले. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स  आणि सर्व जिल्ह्याच्या जाहिराती वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

RTO Maharashtra Bharti 2026

यासोबतच सहायक आरटीओ कॅडरमध्ये अद्याप काही पदे रिक्त आहेत. मंजूर १८३ पदांपैकी १४०हून अधिक पदे भरली गेली असून, सुमारे ४२ पदे अद्याप रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी २१ पदांसाठी जाहिरात काढण्यात आली असून, ५१ उमेदवार प्रशिक्षण घेत आहेत. अधिकाऱ्यांनी सांगितले की, मनुष्यबळ वाढल्यानंतर आरटीओकडून रस्ते सुरक्षा मोहिमा अधिक तीव्र करण्यात येतील. इंटरसेप्टर वाहने, रडार प्रणाली, वेगमर्यादा तपासणी आणि नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र पथके स्थापन केली जाणार आहेत. वेळेवर मंजुरी आणि भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यास नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळतील आणि रस्ते सुरक्षेतही वाढ होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

 

 


महाराष्ट्र परिवहन विभागात (RTO) ७०० हून अधिक अधिकाऱ्यांची कमतरता आहे, ज्यामुळे कार्यरत कर्मचाऱ्यांवर ताण वाढला आहे आणि नागरिकांना सेवा मिळण्यात विलंब होतो आहे. अलीकडेच ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांना (AMVI) पदोन्नती देऊन मोटार वाहन निरीक्षक (MVI) करण्यात आले, त्यामुळे अनेक पदे रिक्त झाली आहेत. एकूण २,३५२ मंजूर पदांपैकी फक्त १,८५२ पदे सध्या कार्यरत आहेत. याशिवाय, ३५ ते ४० टक्के लिपिक पदे अद्याप भरली गेलेली नाहीत. राज्यातील वाहनसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे, वाहन नोंदणी, परवाने, फिटनेस व प्रदूषण तपासणी, अपघात चौकशी आणि रस्ता सुरक्षा यांसारख्या कामांवर मनुष्यबळ अपुरे पडत आहे. 

सध्या राज्यात ५८ RTO कार्यालये कार्यरत असून, दररोज हजारो नागरिक विविध सेवांसाठी भेट देतात. मात्र, डेप्युटी RTO, असिस्टंट RTO, MVI, AMVI आणि लिपिक यांसारखी शेकडो पदे रिक्त असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढतो आहे आणि कामकाजात विलंब होतो आहे. रिक्त पदे तातडीने भरावीत, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे. परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी सांगितले की, रिक्त पदे भरण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

याशिवाय, मीरा-भाईंदरसह ८ नवीन RTO कार्यालयांची स्थापना नुकतीच करण्यात आली असून, यासाठी २२१ नवीन नियमित पदे आणि २१ वाहनचालक (बाह्य यंत्रणेतून) भरतीस मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, या नव्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती काही प्रमाणात सध्याच्या RTO कार्यालयांमध्ये करावी लागणार असल्यामुळे विभागावरचा भार अधिक वाढण्याची शक्यता आहे.

🚗 परिवहन विभागात (RTO) ७०० अधिकाऱ्यांची कमतरता!

सध्याची परिस्थिती:
राज्याच्या परिवहन विभागात मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असून, त्यामुळे प्रशासनावर ताण वाढला आहे.
अलीकडेच ३३१ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) यांना पदोन्नती देऊन मोटार वाहन निरीक्षक (IMVI) करण्यात आले. त्यामुळे अनेक पदे रिक्त राहिली आहेत.

📊 रिक्त पदांची आकडेवारी:

एकूण मंजूर पदे (RTO विभागात): 2,352

  • भरलेली पदे: 1,852
  • रिक्त पदे: 500 पेक्षा अधिक
  • क्लार्क पदे: 35-40% रिक्त
  • संपूर्ण राज्यात रिक्त पदे (उच्च अधिकाऱ्यांपासून खालीपर्यंत): 700+

⚠️ मनुष्यबळ अपुरं – कामावर ताण

राज्यात वाहनांची संख्या वाढत असतानाही, वाहन नोंदणी, परवाने, फिटनेस व प्रदूषण तपासणी, अपघात चौकशी, रस्ते सुरक्षा, व वाहतूक नियमांची अंमलबजावणी यासाठी पुरेसे अधिकारी उपलब्ध नाहीत.

परिणाम:

  • अधिकारी व कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण
  • अनेक महत्वाची कामे रखडत आहेत
  • नागरिकांना सेवा मिळण्यात विलंब

🏢 58 आरटीओ कार्यालयांमध्ये कामाचा भार वाढला

सध्या राज्यात 58 RTO कार्यालये कार्यरत आहेत.
दररोज हजारो नागरिक वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, फिटनेस व प्रदूषण चाचणीसाठी येतात.
मात्र, डेप्युटी RTO, असिस्टंट RTO, IMVI, AMVI आणि क्लार्क पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत.

📢 संघटनांची मागणी – रिक्त पदे तातडीने भरा!

कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी केली आहे.
परिवहन विभागाने यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला असल्याची माहिती परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी दिली.

🆕 ८ नवीन RTO कार्यालये आणि २२१ कर्मचाऱ्यांची भरती

नुकत्याच स्थापन करण्यात आलेल्या 8 नवीन RTO कार्यालयां (उदा. मीरा-भाईंदर, ठाणे) साठी,

  • 221 नवीन पदांना मंजुरी देण्यात आली आहे
  • 21 वाहनचालक बाह्य यंत्रणेतून नियुक्त
  • पण या नव्या कर्मचाऱ्यांचा पुरवठा सध्याच्या RTO कार्यालयांना करावा लागणार असल्याने,
    या भरतीचा ताणही विभागावरच पडणार आहे.

⊂OLD Update⊃

RTO Bharti 2024 Maharashtra: Employment opportunities are also available in other fields including driving in Germany. Accordingly, 10 thousand youth will be selected from Maharashtra in the first phase. Applications of drivers are being taken by Regional Transport Department. This will be selected. After that they will be given training like left hand drive driving, German language teaching etc. free of charge. The cost of this will be borne by the state government. After the training is completed, the companies in Germany will provide the driver with an appointment letter and then the driver will move to Germany. –

कोणत्याही क्षेत्रामध्ये भरती निघाल्यास त्यासाठी लाखो इच्छुकांचे अर्ज दाखल होतात. आता राज्य सरकारने परदेशात रोजगारांच्या संधी उपलब्ध करून दिली आहे. जर्मनीतील बाडेन बुटेनबर्गमध्ये महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवले जाणार आहे. त्यामध्ये वाहनचालकांचा समावेश आहे. इच्छुक वाहनचालकांना प्रशिक्षित करण्याची जबाबदारी परिवहन विभागाकडे सोपविण्यात आली आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर राज्यातील वाहनचालक जर्मनीला जाण्यास सज्ज होतील. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स  आणि सर्व जिल्ह्याच्या जाहिराती वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

How To Apply For Germany Driver Job 2025

महाराष्ट्रातील तरूण-तरूणींना जर्मनीत रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी २०२४ मध्ये सामंजस्य करार केला. यानुसार बाडेन-गुटेनबर्ग या राज्यास कुशल वाहनचालक पुरविण्यासाठी परिवहन विभागाने जिल्हास्तरावर सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी व सर्व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जनजागृती करीत आहेत. प्रकल्पाअंतर्गत जर्मनीस जाण्यासाठी इच्छुक वाहनचालकांसाठी राज्य सरकारने क्यूआर कोड सुरू केला आहे. इच्छुकांना या क्युआर कोडवर स्कॅन करून त्यावर दिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबतचा अर्ज भरावा, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

पथदर्शी प्रकल्प

वाहनचालकांना जर्मनीत पाठवण्याबाबत पथदर्शी प्रकल्प तयार केला असून यासाठीची यंत्रणा, प्रशिक्षण व्यवस्था, कार्यपद्धती निश्चित केली आहे. तसेच जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय व तांत्रिक समित्या तयार केल्या आहेत. त्यानुसार बस, रेल्वे, ट्राम, मेट्रो, ट्रक, हलकी व जड वाहने चालवण्यासाठी चालकांची निवड केली जाईल. त्यानुसार त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. तर, पुणे येथील एका संस्थेद्वारे जर्मनी भाषा शिकवली जाईल, असे परिवहन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात १० हजार तरुणांची निवड

महाराष्ट्रातून पहिल्या टप्प्यात १० हजार तरूणांची निवड केली जाईल. यामध्ये वैद्यकीय क्षेत्र, हॉटेल व्यवस्थापन, स्थापत्य सेवा या क्षेत्रांशी संबंधित असलेल्या तरुणांची निवड केली जाणार आहे. जर्मनीत वाहन चालकांची कमतरता असून सुमारे चार लाख वाहनचालकांची आवश्यकता आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहनचालकांचे अर्ज घेतले जात आहेत. यातून निवड करण्यात येईल. त्यानंतर त्यांना डाव्या बाजूकडील स्टेअरिंगचे वाहन चालवणे, जर्मन भाषा शिकवणे आदी प्रशिक्षण मोफत दिले जाईल. याचा खर्च राज्य सरकार करेल. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जर्मनीमधील कंपन्या वाहनचालकांना नियुक्ती पत्र प्रदान करतील आणि त्यानंतर वाहनचालक जर्मनीला जाईल.


Regional Transport Office Maharashtra Bharti 2025

परिवहन विभागात अनेक पदे रिक्त, कधी भरणार रिक्त पदे

राज्यात प्रादेशिक परिवहन अधिकारी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी अशा २६ जागांवर अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसेच चार ठिकाणी आरटीओ अधिकारीच नाही, येथे रामभरोसे कारभार सुरू असल्याचे विदारक चित्र प्रादेशिक परिवहन विभागात निर्माण झाले आहे. राज्य शासनाला महसूल देणारा विभाग म्हणून प्रादेशिक परिवहन विभागाची ख्याती आहे; मात्र ‘की पोस्ट’वर अधिकारी नियुक्त नसल्याने अतिरिक्त कार्यभारावर आरटीओ कार्यालयांचे कामकाज सुरू आहे. अमरावती व नागपूर या दोन्ही प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाची जबाबदारी रामभाऊ गीते यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील ११ जिल्ह्यातील आरटीओशी संबंधित कामकाज हाताळताना गीते यांना मोठी कसरत करावी लागते. राज्य शासनाने नोव्हेंबर २०२३ मध्ये मोटार वाहन निरीक्षक, वाहन निरीक्षक यांच्या बदल्या केल्या आहेत; परंतु ३० टक्के पदे रिक्त ठेवण्यात आल्यामुळे चांद्यापासून बांद्यापर्यंत आरटीओच्या नियमित कामकाजावर परिणाम होत आहे.

 

पदोन्नती रखडली, कामे वाढली
प्रादेशिक परिवहन विभागात आरटीओ, डेप्युटी आरटीओ, एआरटीओ या श्रेणीत पदोन्नती रखडली आहे. त्यामुळे पदोन्नतीशिवाय
वरिष्ठ पदांची जबाबदारी हाताळावी लागत आहे. यात बहुतांश मोटार वाहन निरीक्षक, वाहन निरीक्षकांना सुद्धा पदोन्नतीची प्रतीक्षा आहे. मनुष्यबळाची वानवा ही मोठी समस्या आहे.

आरटीओत नवीन आकृतीबंध लागू
राज्याच्या प्रादेशिक परिवहन विभागात नवीन आकृतीबंध लागू करण्यात आला आहे. यात जुने ४०० पदे खारीज करून नव्याने
काही पदांना अपग्रेड करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन बदली प्रक्रिया राबविताना ७० टक्के कर्मचाऱ्यांंची पदे अपग्रेड झाली
आहेत; मात्र आजही आरटीओ, डेप्युटी आरटीओ, एआरटीओ या पदावरील अधिकाऱ्यांना पदोन्नतीची आस आहे.

या आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे आहे अतिरिक्त कार्यभार
जितेंद्र पाटील (मुंबई), दिनकर मनवर( मुंबई), संदेश चव्हाण (मुंबई), प्रकाश जाधव (मुंबई), अशोक पवार (मुंबई पश्चिम), विनय अहिरे (मुंबई पूर्व), अभय देशपांडे (पनवेल), दीपक पाटील (कोल्हापूर), प्रदीप शिंदे (नाशिक), स्टीव्हन अल्वारीस (धुळे), संजय मेत्रेवार (संभाजीनगर), रामभाऊ गीते (नागपूर), गजानन नेरपगार (लातूर), विनोद साळवी (कल्याण), नंदकिशोर काळे (सिंधुदुर्ग), अर्चना गायकवाड (सोलापूर), राजेंद्र केसकर (बारामती), उर्मिला पवार (श्रीरामपूर), विनाेद सगरे (सांगली), ज्ञानेश्वर हिरडे (यवतमाळ), हर्षल डाके (नागपूर शहर), मोहम्मद समीर (वर्धा), स्वप्निल माने (बीड), अनंता जोशी (हिंगोली), प्रकाश जाधव (मुंबई) या आरटीओच्या अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार आहे. तसेच मुंबई येथील परिवहन आयुक्त कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, मुंबई मध्य, ठाणे आणि पुणे येथील उपप्रादेशिक परिवहन अधिकारीपद निरंक असल्याची माहिती आहे.

 

 


RTO Bharti 2025 Maharashtra

Info of Maharashtra RTO Recruitment 2025 |Maharashtra RTO Bharti 2025

Name of the OrganizationMaharashtra Public Service Commission (MPSC)
Name Of The DepartmentMotor Vahan Vibhag, Maharashtra
Name Of The PostsRoad Transport Officer Posts
 Number Of VacanciesTo be Announced

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड