आरटीई प्रवेशप्रक्रियेचा मुहूर्त ठरला: डिसेंबरपासून सुरुवात; पालकांची प्रतीक्षा संपली: यंदा वेळेत होणार प्रवेश – RTE Admission Alternative Link – RTE Admission 2025 @ student.maharashtra.gov.in

RTE Admission 2025 @ student.maharashtra.gov.in

RTE Admission 2025

RTE Admission 2025: खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मोफत प्रवेशासाठी राबवली जाणारी आरटीई प्रवेशप्रक्रिया यावर्षी १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीसह सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांची नोंदणी जानेवारी महिन्यात सुरू होईल, तर प्रवेशासाठीची लॉटरी मार्च महिन्यात काढली जाईल. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदाच जून-जुलै महिन्यात संपूर्ण प्रवेशप्रक्रिया पूर्ण होईल, ज्यामुळे आरटीई अंतर्गत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे वर्ग वेळेत सुरू करता येणार आहेत. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकार कायद्याअंतर्गत इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये २५ टक्के जागा आर्थिक दुर्बल घटक आणि आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठीची आरटीई प्रवेशप्रक्रिया ऑनलाइन स्वरूपात राबवली जाते. यावर्षीची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी शासनाने पाठविलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी पत्राद्वारे कळविले की, १८ डिसेंबरपासून शाळा नोंदणीस सुरुवात होईल आणि जून-जुलै महिन्यापर्यंत प्रवेशप्रक्रिया पूर्ण केली जाईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

डिसेंबर महिन्यात सीबीएसई शाळांमध्ये प्रवेशप्रक्रिया सुरू होत असताना, आरटीई प्रवेशप्रक्रियेच्या मुहूर्ताला मात्र विलंब होत होता. मात्र यंदा २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के प्रवेशप्रक्रिया डिसेंबर महिन्यातच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १५ डिसेंबर रोजीच पूर्वतयारी कार्यशाळा घेण्यात येणार आहे, जी पूर्वी १५ जानेवारीला नियोजित होती. विशेष म्हणजे, अंतिम प्रवेशप्रक्रिया पूर्ण होण्याची अंतिम तारीख १० एप्रिलऐवजी १० मार्च करण्यात आली आहे.

२०२४-२५ शैक्षणिक वर्षातील प्रवेशप्रक्रिया अनेक कारणांमुळे लांबली होती. आधी चुकीच्या निर्णयांमुळे, नंतर न्यायालयीन प्रकरणांमुळे आणि पुनप्रक्रियेमुळे वेळेत प्रवेश न झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. शाळांनाही २५ टक्के जागांवर प्रवेश देण्याचा ताण सहन करावा लागला, आणि पालकांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे यंदा तरी प्रवेशप्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, अशी मागणी वारंवार करण्यात येत होती.

गेल्या वर्षाचा अनुभव:
अमरावती जिल्ह्यातील २३२ शाळा आरटीई प्रक्रियेसाठी पात्र ठरल्या होत्या. या शाळांमध्ये २३९६ जागांसाठी ६६२६ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २३०० विद्यार्थ्यांची सोडत निघाली, मात्र फक्त १५१३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले. अनेक जागा रिक्त राहिल्या. यंदा मात्र प्रक्रिया एक महिना आधी सुरू होणार असल्याने उर्वरित जागांवरील प्रवेशही व्यवस्थित होण्याची शक्यता आहे. यासाठी शिक्षण विभागाने शाळांना नोंदणीसाठी आवाहन केले आहे.


शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत. आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नसून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (RTE) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत प्रवेश जाहीर झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी दोन वेळा मुदतवाढ देऊनही जागा रिक्त राहिल्या आहेत. आता प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार नसून, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना रिक्त जागांवर प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

 

सुरुवातीला २३ ते ३१ जुलै या कालावधीत प्रवेशासाठी मुदत देण्यात आली होती- मात्र प्रवेशाचा टक्का कमी असल्याने आधी ५ ऑगस्टपर्यंत आणि त्यानंतर ८ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. मात्र गुरुवारी सायंकाळपर्यंत ५९ हजार ११२ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले होते. त्यामुळे जवळपास ४५ हजार जागा रिक्त राहिल्या आहेत. याबाबत माहिती देताना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी म्हणाले, आरटीईच्या प्रवेशासाठी पुन्हा मुदतवाढ दिली जाणार नाही. रिक्त जागांचा आढावा घेऊन प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी दिली जाणार आहे. त्यासाठी तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून येत्या दोन ते तीन दिवसांत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील.

 


 

 

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेला आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. या प्रवेश प्रक्रियेतील ५० हजारांहून अधिक जागा अजूनही रिक्त असून प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रवेशासाठी ८ ऑगस्टपर्यंत संधी मिळाली आहे.

यंदा राज्यातील ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी २ लाख ४२ हजार ५१६ अर्ज दाखल झाले होते त्यातन ९३ हजार ९ विद्यार्थी प्रवेशास पात्र ठरले. सुरुवातीला शिक्षण विभागाने या प्रवेशासाठी २३ ते ३१ जुलैपर्यंतची मुदत दिली होती. या कालावधीत ३९ हजार ४०८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. त्यानंतर ५ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर प्रवेश घेणाऱ्यांची संख्या ५३ हजार २०० पर्यंत पोहोचली आहे

 


RTE अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के रिक्त जागांवर प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाइन लॉटरीद्वारे प्रवेश जाहीर झालेल्या ९३ हजार विद्यार्थ्यांपैकी सुमारे ५० हजार विद्यार्थ्यांच्या पालकांनी कागदपत्रे पडताळणी पूर्ण केली असून शाळांमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. प्रवेश घेण्यासाठी आज सोमवारी (दि.५ ऑगस्ट) शेवटची संधी असून त्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद!

राज्यात आरटीई अंतर्गत ९ हजार २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ रिक्त जागांसाठी २ लाख ४२ हजार ५१६ अर्ज प्राप्त झाले होते. २० जुलै रोजी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या ९३ हजार ९ विद्यार्थ्यांची यादी आरटीई पोर्टलवर  २१७ शाळांमध्ये १ लाख ५ हजार २४२ रिक्त जागांसाठी २ लाख ४२ हजार ५१६ अर्ज प्राप्त झाले होते. २० जुलै रोजी आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी निवड झालेल्या ९३ हजार ९ विद्यार्थ्यांची यादी आरटीई पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर दि. २३ जुलैपासून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे पडताळणी आणि प्रवेश निश्चित करण्यास सुरुवात झाली. राज्यातील अनेक जिल्ह्यांत दि.२५ आणि २६ जुलै रोजी अतिवृष्टी झाल्यामुळे प्रवेश प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे शिक्षण संचालनालय कार्यालयाकडून प्रवेश घेण्यासाठी मुदत ५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आली होती. प्रतीक्षा यादीतील ७१ हजार २७६ विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची संधी देण्यात येणार आहे.


 

✅2024 RTE प्रवेशासाठी लागणारी सर्व आवश्यक कागदपत्र – RTE Admission 2024 Documents list

त्यामुळे बालकांच्या प्रवेशासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पालकांची प्रतीक्षा अखेर संपणार आहे. ही शिक्षण हक्क कायद्यानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी खासगी शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. या जागांवरील प्रवेशासाठी शिक्षण णि विभागातर्फे दरवर्षी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेची ऑनलाइन सोडत शुक्रवारी काढण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी ‘सकाळ’शी बोलताना दिली.
राज्यातील नऊ हजार २१७ शाळांमधील एक लाख पाच हजार ३९९ जागांवरील प्रवेशासाठी दोन लाख ४२ हजार ९९७ अर्ज आले आहेत. प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या बालकांच्या पालकांची उत्सुकता आता संपणार आहे. ऑनलाइन सोडत जाहीर झाल्यानंतर प्रवेश मिळालेल्या बालकांच्या प्रवेश अर्जात नमूद केलेल्या मोबाईल क्रमांकावर प्रवेशाबाबत मेसेज पाठविण्यात येईल. तसेच आरटीई पोर्टलवरही बालकांच्या लॉगिनमध्ये प्रवेशासाठी मिळालेल्या शाळेचा तपशील दिसू शकणार आहे

अधिक माहितीसाठी: https://student.maharashtra.gov. in/adm_portal/Users/rte_index_new

RTE Admission Process 2024

आरटीई कायद्यातील जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त जागांवर प्रवेश मिळावा, यासाठी ऑनलाइन माध्यमातून प्रवेश अर्ज करण्यास पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे. दि. २९ मे रोजी रात्री ८ वाजेपर्यंत आरटीई पोर्टलवर दोन लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले असून, अर्ज करण्यासाठी आता शेवटच्या दोन दिवसांचा कालावधी उरला आहे. 

आठवडाभरात आरटीईचे दी लाख अर्ज प्राप्त राज्य शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलास उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त जागांवर दि. १७ मे पासून ऑनलाइन प्रवेश अर्जास सुरुवात झाली. गत एक आठवड्यात १ लाख ५६ हजारपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत.

आरटीईच्या जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त २५ टक्के जागांची माहिती आरटीई पोर्टलवर अद्ययावत करीत पुन्हा नव्याने प्रवेश प्रक्रिया सुरू होताच पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. शुक्रवार दि. २४ मे रोजी रात्री आठ वाजेपर्यंत १ लाख ५६ हजार ५५० अर्ज प्राप्त झाले होते. तर पुणे जिल्ह्यांत १७ हजार ५९६ रिक्त जागांसाठी सर्वाधिक रिक्त जागांच्या दुप्पट ३३ हजार अर्ज आले होते. पालकांना येत्या ३१ मे पर्यंत https://student.maharashtra.g ov.in/adm_portal संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज करता येणार आहेत.

राज्यातील ९ हजार १९७ शाळांमध्ये १ लाख ४ हजार ७३५ जागा रिक्त आहेत. त्यासाठी पहिल्या आठ दिवसातच दीड लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. पुढील एक आठवड्याच्या कालावधीत सरासरी तेवढेच अर्ज प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑनलाइन अर्ज प्रक्रिया संपल्यानंतर नियमाप्रमाणे यंदाही लॉटरी पध्दतीने विद्यार्थ्यांची निवड करावी लागणार आहे.

  • राज्य शासनाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलांना उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. शिक्षण विभागाने आरटीईच्या जुन्या नियमावलीनुसार खासगी शाळांमधील रिक्त २५ टक्के जागांची माहिती आरटीई पोर्टलवर अद्ययावत केली आणि दि. १७ मेपासून नव्याने ऑनलाइन माध्यमातून अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली.
  • पहिल्या चार दिवसांतच प्रवेश अर्जानी एक लाखांचा टप्पा गाठला होता. एक आठवड्यानंतर दि. २४ मेपर्यंत दीड लाख अर्ज प्राप्त झाले होते. त्यानंतर दि. २९ मे रोजी रात्री ८ वाजेपर्यंत अर्जांची संख्या २ लाख १ हजार ३८३ एवढी झाली होती.
  • राज्यातील ९ हजार १९७ शाळांमध्ये १ लाख ४ हजार ७३५ जागा रिक्त आहेत. पालकांना येत्या ३१ मेपर्यंत https://student.maharashtra.g ov.in/adm_portal संकेतस्थळावरून प्रवेश अर्ज करता येणार आहेत.
  • अर्ज करण्यासाठी मुदतवाढीची शक्यता? – राज्य शासनाने केलेल्या आरटीईतील बदलामुळे पालकांना दोन वेळा प्रवेश अर्ज करण्याचा नाहक त्रास सहन करावा लागला. जुन्या नियमानुसार अर्ज करण्यास येत्या ३१ मेपर्यंत मुदत दिली असून, शेवटचे दोन दिवस शिल्लक आहेत… पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता आणखी काही दिवस मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी होत आहे.
  • या जिल्ह्यांत सर्वाधिक अर्ज
    • जिल्हा | रिक्त जागा | प्राप्त अर्ज (दि. २९ मेपर्यंत)
    • पुणे – १७ हजार ५९६ – ४१ हजार १५०
    • नागपूर – ६ हजार ९२० – १७ हजार ८१९ ११ हजार ३७७ १६ हजार ४९४ ४ हजार ४५१ १२ हजार ३८० ५ हजार २७१ १२ हजार १६४
    • ठाणे – ११ हजार ३७७ – १६ हजार ४९४
    • छत्रपती संभाजीनगर – ४ हजार ४५१ – १२ हजार ३८०
    • नाशिक – ५ हजार २७१ – १२ हजार १६४

???? अर्ज करा


RTE Admission New Rule 2024

शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार (आरटीई) अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या सुधारित ऑनलाइन प्रवेशप्रक्रियेला १७ मेपासून सुरुवात झाली असून, ३१ मेपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

यापूर्वी पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन पालिका शिक्षण विभागाने केले आहे. यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असला तरी त्याचा या प्रवेशप्रक्रियेत विचार केला जाणार नाही. त्यामुळे नव्याने अर्ज करणे बंधनकारक आहे, असे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे .पालकांनी http:// student.maharashtra. gov.in/adm_portal या संकेतस्थळावरून अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी. आर्थिक वर्षामध्ये ज्या पालकांचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे, ते आरटीई प्रवेशासाठी पात्र आहेत. प्रवेशप्रक्रियेकरिता १० शाळांची निवड करावी लागणार आहे.

‘अर्जप्रक्रिया सुरू – अंतिम मुदतवाढ जाहीर’ :

मुंबईतील ३१९ पात्र शाळांत ‘आरटीई’ च्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी पाच हजार ६७० जागा उपलब्ध आहेत. यापूर्वी २०२४-२०२५ या वर्षाकरिता ‘आरटीई’ २५ टक्के प्रवेशप्रक्रियेसाठी पालकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते. मात्र, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, ही प्रक्रिया स्थगित करण्यात आली होती. त्यामुळे यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केला असला, तरी बालकांच्या पालकांनी नव्याने प्रवेश अर्ज करणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अर्जाचा २०२४-२५ या वर्षाच्या सुधारित आरटीई प्रवेशप्रक्रियेसाठी विचार केला जाणार नाही. प्रवेशप्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांनी दिली आहे.. अर्ज ३१ मे पूर्वी करा.

 

आवश्यक कागदपत्रे
निवासी पुरावा, जन्मतारखेचा पुरावा, जातीचा दाखला, वार्षिक उत्पन्नाचा दाखला, दिव्यांग मुलांसाठी वैद्यकीय प्रमाणपत्राचा पुरावा, अनाथ बालकांसाठी आवश्यक कागदपत्रे, एचआयव्हीबाधित असल्यास आवश्यक कागदपत्रे, घटस्फोटित महिला पालक असल्यास आवश्यक कागदपत्रे, न्यायप्रविष्ठ असलेल्या घटस्फोट प्रकरणातील महिला, विधवा महिला असल्याची आवश्यक कागदपत्रे.
मुदतीत अर्ज करा अर्ज प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर
लॉटरी पद्धतीने प्रवेश दिले जातील. तसेच रिक्त जागा राहिल्या असतील तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा संदेश पाठवला जाईल. यानंतरही जागा रिक्त राहिल्या असतील तर दुसऱ्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याबाबतचा संदेश पाठवला जाईल. कागदपत्रे तपासणी करण्याकरिता राज्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात येणार आहे. पालकांनी एसएमएसवर अवलंबून न राहता पोर्टलवरील सूचनांचे पालन करावे. मुदतीनंतर जागा रिक्त असेल तरीही कोणत्याही परिस्थितीत प्रवेश दिला जाणार नाही. मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जाची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही.

RTE Admission 2024 @ student.maharashtra.gov.in: शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी शिक्षण हक्क अधिनियम (आरटीई) अंतर्गत महानगरपालिका, सरकारी आणि खासगी प्राथमिक शाळांमध्ये २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेस १६ एप्रिलपासून सुरुवात झाली. त्याची मुदत मंगळवार, ३० एप्रिलपर्यंत होती. मात्र पालिकेने या प्रक्रियेस १० मेपर्यंत मुदतवाढ दिली असून पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी अर्ज करावेत, असे आवाहन महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात आले आहे. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !
आरटीईअंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्यार्थ्याच्या घरापासून १ किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जातात. त्यानुसार मुंबईतील १३८३ पात्र शाळांमधील आरटीईच्या २५ टक्के मोफत प्रवेशासाठी २९ हजार ०१४ जागा उपलब्ध आहेत. या प्रवेशासाठी पालकांना राज्य शासनाच्या https:// student.maharashtra. gov.in/adm_portal या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येतील.
प्रवेश प्रक्रियेच्या अर्जासोबत कोणत्याही प्रकारची कागदपत्रे अपलोड करण्याची आवश्यकता असणार नाही, अशी माहिती शिक्षणाधिकारी (प्राथमिक) राजेश कंकाळ यांनी दिली आहे. तसेच या प्रक्रियेसाठी १० मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याचेदेखील कंकाळ यांनी सांगितले.


How Many Applications Filed Under Rte 

RTE Admission 2024:  शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) प्रवेश प्रक्रियेत शिक्षण विभागाकडून यंदा बदल करण्यात आला. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आलेल्या प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रवेशांसाठी उपलब्ध जागांच्या १० टक्केही नोंदणी झालेली नाही. नोंदणीसाठी ३० एप्रिलपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेअंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांना प्रवेश दिला जातो. आतापर्यंत या प्रवेश प्रक्रियेत खासगी शाळांतील २५ टक्के जागा आरटीईसाठी राखीव होत्या. मात्र, यंदा या प्रवेश प्रक्रियेत बदल करून विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून एक किंवा तीन किलोमीटर परिसरातील शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि खासगी अनुदानित शाळांचा पर्याय उपलब्ध नसल्यास खासगी स्वयंअर्थसहाय्यित शाळांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. या बदलाला पालक संघटनांकडून विरोध करण्यात आला आहे. या प्रकरणी न्यायालयात दाद मागण्यात आली आहे.

आरटीई संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार राज्यभरातील ७६ हजार ५३ शाळांमध्ये मिळून ८ लाख ८६ हजार ४११ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आतापर्यंत सुमारे ४७ हजार विद्यार्थ्यांच्या अर्जांची नोंदणी झाली आहे. गेल्या वर्षीपर्यंत प्रवेशासाठी एक लाख जागांसाठी दुपटीपेक्षा जास्त नोंदणी होत होती. मात्र यंदा खासगी स्वयंअर्थसहाय्यित विशेषतः इंग्रजी माध्यमाच्या शाळांचा पर्याय विद्यार्थ्यांना उपलब्ध होत नसल्याने पालकांनी या प्रवेश प्रक्रियेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे.


Changes In RTE Admission Rules – Know Here 

RTE Admission 2024 : महाराष्ट्र शासनाच्या बदललेल्या शिक्षण हक्क कायद्याच्या (आरटीई) नियमांमुळे इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळेत प्रवेशाची वाट कठीण झाली आहे. त्यामुळे, पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या नव्या नियमांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान देण्यात आले आहे. न्यायालयाने राज्य शासनाला नोटीस बजावून दोन आठवड्यांत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहे. RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

शिक्षण हक्क कार्यकर्ते वैभव कांबळे, वैभव एडके, राहुल शेंडे, अनिकेत कुत्तरमारे यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली. याचिकेनुसार, आरटीई अंतर्गत वंचित, दुर्बल, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकांतील विद्यार्थ्यांना २५ टक्के राखीव जागांवर प्रवेश दिले जातात.

शालेय शिक्षण विभागाने यंदा आरटीई प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल केला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या निवासस्थानापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत प्रवेश देण्यात येणार आहे.

याआधी हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश, उत्तरप्रदेश आदी राज्यांत खासगी शाळांत मुभा देणारे नियम तेथील सरकारने तयार केले. मात्र, तसे नियम हे उच्च न्यायालयाने रद्द केल्याचा दाखला न्यायालयाला देण्यात आला. २००९ च्या शिक्षण हक्क कायद्यानुसार खासगी विनाअनुदानित शाळांना मुभा देता येत नाही.

खासगी शाळांना वेळेत परतावा दिल्यास त्यांचा देखील विरोध होणार नाही. राज्य सरकारचे नवे नियम बेकायदेशीर व अन्यायकारक असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. याचिकाकर्त्यांतर्फे वरिष्ठ विधिज्ञ जयना कोठारी यांनी बाजू मांडली. त्यांना ॲड. दीपक चटप, ॲड. पायल गायकवाड, ॲड. ऋषिकेश भोयर यांनी सहकार्य केले.

…तर शासकीय शाळेत प्रवेश
आरटीई अंतर्गत उपलब्ध शाळा नसल्यास स्वयंअर्थसहाय्यित खासगी शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. नुकतेच आरटीईचे ऑनलाइन अर्ज सुरू झाले आहे. या नियमांची अंमलबजावणी झाल्यास विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. नव्या नियमांमुळे श्रीमंतांच्या मुलांसाठी इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळा तर गरीब मुलांसाठी शासकीय शाळा, अशी वर्गवारी तयार होईल, असा दावाही याचिकाकर्त्यांनी केला आहे.


RTE Admission Form 2024 @student.maharashtra.gov.in

शिक्षण हक्क कायदा (RTE) अंतर्गत ऑनलाइन अर्ज करण्यास दि. १६ एप्रिलपासून सुरुवात झाली आहे. यंदा पालकांकडून अत्यल्प प्रतिसाद मिळत असून, गत सहा दिवसात केवळ २४ हजार ७८३ अर्ज आले आहेत. गतवर्षी पहिल्या चार दिवसांत राज्यातून तब्बल ९४ हजारांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले होते.

आरटीईअंतर्गत खासगी तसेच विनानुदानित शाळांमध्ये वंचित, आर्थिक दुर्बल तसेच सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटकातील बालकांना २५ टक्के जागांवर मोफत प्रवेश दिला जातो.

येत्या ३० एप्रिलपर्यंत ऑनलाइन माध्यमातून प्रवेश अर्ज करता येणार आहेत. राज्य शासनाने आरटीई कायद्यात बदल केला आहे. शाळांसह जिल्हा परिषद आणि अनुदानित शाळांनीही नोंदणी केली आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांमध्ये प्रवेश मिळणार नसल्याने पालकांकडून दुर्लक्ष केले जात आहे.


RTE Admission 2024: The much awaited RTE admission process started from Tuesday. At present, the process of filling applications from parents has started on the RTE portal. However, the portal still shows the academic year 2023-24, causing confusion among parents. Govt launched RTE portal, but forgot to correct academic year. According to the new rules, if there is no subsidized school, government school, local body school within a distance of one kilometer from the student’s home, then they will be admitted to a private school within one kilometer

बहुप्रतीक्षित आरटीई प्रवेश प्रक्रियेस मंगळवारपासून सुरुवात झाली. सध्या आरटीई पोर्टलवर पालकांकडून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, पोर्टलवर अजूनही शैक्षणिक वर्ष २०२३-२४ दाखवत असल्याने पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शासनाने आरटीई पोर्टल सुरू केले, मात्र शैक्षणिक वर्ष दुरुस्त करण्यास विसरले आहे. नव्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या घरापासून एक किलोमपर्यंतच्या अंतरादरम्यान अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल, तर एक किलोमीटरच्या अंतरावरील खासगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.RTE प्रवेश प्रक्रियेबद्दलच्या सर्व अपडेट्स साठी महाभरती अँप आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून ठेवा, म्हणजे आम्ही सर्व अपडेट्स आपल्याला पाठवत राहू. धन्यवाद !

या शाळांची निवड करताना शासकीय शाळा, अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व शेवटी खासगी शाळा या प्राधान्यक्रमानुसार प्रवेश दिला जाणार आहे. मागीलवर्षी राज्यभरातील ८ हजार ८२८ शाळांमध्ये १ लाख १ हजार ९६९ जागा प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. दरवर्षी डिसेंबर-जानेवारीतच प्रवेश प्रक्रिया सुरू होत असते. परंतु, यंदा तब्बल तीन महिने उशिराने प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे; तसेच यंदा राज्यातील ७५ हजार ९७४ शाळांमधील ९ लाख ७२ हजार ८२३ जागांवर विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया आरटीई पोर्टलवर सुरू आहे. पोर्टलच्या स्टेटसबारमध्ये २०२४- २५ असे असायला हवे. मात्र, अजूनही २०२३-२४ वर्ष अशी नोंद दिसत आहे. शासनाच्या वेबसाइटवर अशी चक दिसन येत असल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

३० एप्रिलपर्यंत नोंदणी प्रक्रिया

आरटीईअंतर्गत दुर्बल, वंचित, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या मागासवर्ग घटकांकरिता विद्याथ्यांच्या घरापासून एक किलोमीटर अंतरावरील खासगी शाळेत २५ टक्के आरक्षित कोट्यातून मोफत प्रवेश दिले जाणार आहेत. त्यासाठी शासनाच्या पोर्टलवर नोंदणी प्रक्रिया सुरू असून, ती ३० एप्रिलपर्यंत चालणार आहे.
RTE Portal – शाळा नोंदणी प्रक्रिया
Detais. Address RTE Details vacancies Ferwerd to BEO

नोंदणीला पालकांचा थंड प्रतिसाद
आरटीई प्रवेशासाठी पालकांचा मोठा कल हा खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे असतो. पण, यावेळी अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचाही आरटीई प्रवेश प्रक्रियेत समावेश झाला, असंख्य पालकांना जवळच्या भागातील इंग्रजीच्या खासगी शाळा आणि त्यांची नावे ऑनलाइन नोंदणीत मिळत नसत्याच्या तक्रारी पालक शिक्षण विभागाकडे करत आहेत. यंदा आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील २ हजार ८३६ शाळांमध्ये ३६ हजार १४३ जागा उपलब्ध असताना मागील दोन दिवसांपासून केवळ ६७० पालकांनी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे. जागांसाठी पालकांचा ऑनलाइन नोंदणीला प्रतिसाद कमी मिळत असल्याने ही नोंदणी प्रक्रिया पुढील काही महिने सुरू ठेवावी लागेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.
येत असल्यामुळे पालकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.

 

image not found RTE २५% ऍडमिशन साठी पालकांकरीता सूचना: Click Here to download

पालकांकरीता सूचना (2024-2025)

1)  आर.टी.ई. प्रवेश प्रक्रिया 2024-2025  या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावा.

2) पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि google location पुन्हा पुन्हा तपासून पाहावे .पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्या शिवाय अर्ज सबमिट करू नये.

3)  आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्मदाखल्या वरीलच जन्म दिनांक लिहावा.

4) १ कि.मी, १ ते ३ कि.मी अंतरावर शाळा निवडत असताना कमाल १० च शाळा निवडाव्यात.

5) अर्ज भरत असताना  आवश्यक कागदपत्र   पालकांनी तयार ठेवावेत. लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी.

6) अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला आहे असे समजले तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा.

7) एका पालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये. एकाच बालकाचे  २ अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे  दोन्ही अर्ज बाद होतील व ते अर्ज  लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत.

8)  अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक , अर्जात लिहिलेला  मोबाइल नंबर आणि अर्जाची प्रत स्वत: जवळ लॉटरी प्रक्रिया होईपर्यंत जपून ठेवावी.

9) अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल.

10) अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो Recover Password यावर क्लिक करून रिसेट करावा .

11) RTE २५ % प्रवेश 2024-2025 या वर्षाकरिता पालकांनी ओंनलाईन अर्ज भरण्याची मुदत 30/04/2024 पर्यंत राहील.

12) दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगत्वाचे प्रमाण पत्र 40% आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल.

13) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे .

14) सन 2024-2025 या वर्षाकरिता निवासी पुरावा म्हणून बँकेचे पासबूक दिल्यास फक्त राष्ट्रीय कृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे.

15) अर्ज भरताना location चुकू नये म्हणून google वर पत्ता टाकून ते lattitude,longitude प्रवेश अर्जावर टाकल्यास location चुकणार नाही.

16) जर तुम्हाला १ किमी च्या अंतरावर अनुदानित/सरकारी शाळा उपलब्ध असल्यास तुम्हास Self Finanace school सिलेक्शन साठी उपलब्ध नसेल व Self Finanace school not available असा मेसेज दिसेल.

 

image not found बालकाच्या जन्मतारखेबाबत : दिव्यांग बालकाचा अर्ज भरत असताना जन्मतारखेबाबत काही समस्या आल्यास त्वरित [email protected] OR [email protected] वर इमेल पाठवावा.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

13 Comments
  1. Sunil shinde says

    Lockdown madhe mulacha 1 age vaaya gela 1st standred takachya hota.karan waiting list madhe naav asun massage ala nai.jya school madhe selected Jala thya school madhe gethly nai.thithle teacher manthat date sampaly.karan.mi 2 divas agother hotho.

  2. Santosh says

    वयोमर्यादा किती आहे हे सांगा

  3. Arun waman Khaire says

    2017 मध्ये प्राथमिक वर्ग करिता प्रवेश मिळवला असून आज पर्यंत माझ्या मुलीला सात्पनिक वर्तणूक देतात अनेक तक्रारी करून सुद्धा कोणताही अधिकारी शाळेवर कारवाई करण्यास तयार नाही शिक्षण विभाग हे भ्रष्टाचाराचा बाजार झालेला आहे नुसते कागदी घोडे नाचवत असतात न्याय मात्र काहीच नाही

  4. Arun waman khaire says

    शिक्षण विभागाने आर्थिक दुर्बल वंचित घटका अंतर्गत येणाऱ्या बालकांना विनाअनुदानित शाळेमध्ये नुसते प्रवेश देऊन उपयोग नाही प्रवेश दिल्यानंतर विनाअनुदानित शाळा उपयोग शाळेमार्फत सुविधा देतात की नाही हेही बघणे गरजेचे आहे प्रवेश देऊन बालकांना हक्क मिळत नाही

  5. अभिजित says

    वार्षिक उत्पन्न एक लाख पेक्षा जास्त आहे पण मुलगी दत्तक घेतली आहे आम्ही आरटिई ऍडमिशन मधे बसू शकतो का?

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड